प्रत्येकाला तंदुरुस्त आणि सक्रिय शरीर हवे असते. पण फिट राहण्यासाठी वर्कआउट आणि डाएट या दोन्हीकडे लक्ष देणं गरजेचं आहे (Weight Loss). लोक अनेकदा वर्कआउट करतात (Fitness). पण आहाराचे पालन करणे प्रत्येकाला शक्य नसते. किंवा खाण्यावर कंट्रोल राहत नाही. ज्यामुळे वजन कमी करणं अवघड होऊन जाते (How to lose weight in Marathi).
शिवाय वजन कमी करण्याचा प्रवास अर्धवट राहून जातो. जर आपल्याला नियमित व्यायाम किंवा डाएट फॉलो करायला वेळ मिळत नसेल तर, आहारतज्ज्ञांनी सांगितलेल्या ५ गोष्टी करून पाहा. यामुळे वेट लॉस करणं सोपं होईल. त्यांनी यासंदर्भातील व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामुळे वजन कमी करणं अवघड वाटणार नाही(No Time for Exercise? Here Are 5 Easy Ways to lose Weight).
वेट लॉससाठी ५ गोष्टी फॉलो करा
सॅलड खा
अनेकदा भूक लागल्यावर आपण भरपूर अन्न खातो. त्यामुळे वजन कमी करणे कठीण होते. कारण एकाच वेळी जास्त खाल्ल्याने कॅलरीज बर्न होत नाहीत. त्यामुळे जेवण सुरू करण्यापूर्वी नेहमी सॅलड खा. यामुळे भूक काही प्रमाणात नियंत्रणात राहील. याशिवाय शरीराला अधिक प्रमाणात फायबरही मिळेल. ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होईल.
बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारा कोमट पाण्याचा १ सोपा उपाय; पाण्यात चिमुटभर 'ही' गोष्ट मिसळा
कोमट पाण्यासोबत तूप
कोमट पाण्यात तूप मिसळून घेतल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत होते. तूप चयापचय वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे वजन जलद कमी होते. कोमट पाणी पचनक्रिया वेगवान होण्यास मदत करते. त्यामुळे अन्नाचे पचनही व्यवस्थित होते आणि कॅलरीज बर्न होतात.
हेल्दी पदार्थ खा
खूप भूक लागल्यावर कधीही उलट सुलट पदार्थ खाऊ नका. भूक लागल्यावर अनेक जण जास्त खातात. यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढेल. त्याऐवजी सॅलड खा. शिवाय जेवल्यानंतर एक ग्लास ताक प्या.
स्टेप काउंटवर लक्ष केंद्रित करा
जर आपल्याला व्यायामासाठी वेळ मिळत नसेल तर, चालण्यावर भर घाला. एका दिवसात ७ हजार पावलं चाला. यामुळे शरीर सक्रीय राहील. याशिवाय सतत हालचाल केल्याने वजन कमी करण्यात मदत होईल.
थुलथुलीत पोटामुळे एक पॅन्ट धड होत नाही? रोज खा ५ गोष्टी, पोट होईल कमी
भरपूर पाणी प्या
वजन कमी करण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण डिहायड्रेशनमुळे कॅलरीज बर्न करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे शक्यतो पाण्याचे सेवन करावे. दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाणी प्यायला हवे. यासोबतच आहारात हायड्रेटिंग ड्रिंक्सचा समावेश करा.