Lokmat Sakhi >Fitness > जीमला जायला वेळ नाही? मग शिल्पा शेट्टी सांगतेय तसं घरच्याघरीच करा 'स्टेप एरोबिक्स वर्कआऊट..'

जीमला जायला वेळ नाही? मग शिल्पा शेट्टी सांगतेय तसं घरच्याघरीच करा 'स्टेप एरोबिक्स वर्कआऊट..'

Fitness Tips: घरचं, मुलांचं, स्वत:चं करता करता जीमला (gym exercise) जायला वेळच मिळत नाही, ही अनेक मैत्रिणींची तक्रार.. यावरचा उत्तम उपाय सांगितला आहे फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 05:38 PM2022-03-15T17:38:52+5:302022-03-15T17:39:51+5:30

Fitness Tips: घरचं, मुलांचं, स्वत:चं करता करता जीमला (gym exercise) जायला वेळच मिळत नाही, ही अनेक मैत्रिणींची तक्रार.. यावरचा उत्तम उपाय सांगितला आहे फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने.. 

No time for gym? Then follow Shilpa Shetty's advice and start step aerobics workout at home | जीमला जायला वेळ नाही? मग शिल्पा शेट्टी सांगतेय तसं घरच्याघरीच करा 'स्टेप एरोबिक्स वर्कआऊट..'

जीमला जायला वेळ नाही? मग शिल्पा शेट्टी सांगतेय तसं घरच्याघरीच करा 'स्टेप एरोबिक्स वर्कआऊट..'

Highlightsस्टेप एरोबिक्सचे काही व्यायाम आपल्याला घरच्याघरी पायऱ्यांचा वापर करून नक्कीच करता येतात. पण त्यासाठी पायऱ्यांची उंची किती आहे आणि अशा पद्धतीचा व्यायाम करण्यासाठी ती योग्य आहे की नाही, हे तपासून घ्या.

सगळ्यांच्या सगळ्या वेळा सांभाळताना, प्रत्येकाला त्याच्या- त्याच्या वेळेनुसार धावायला मदत करताना घरातल्या बाईची खरोखरीच खूप दमछाक होते. त्यात जर ती गृहिणी असेल, तर दुपारचा किंवा सायंकाळचा थोडा तरी वेळ स्वत:साठी काढू शकते. पण वर्किंग वुमनची धावपळ तर आणखीनच वेगळी. घरातल्या सगळ्या मंडळींची सगळी सोय करून तिला स्वत:च्याही वेळा जपायच्या असतात. त्यामुळे जीमला जायला वेळ न मिळणं ही खरोखरीच अनेक महिलांची समस्या अगदीच स्वाभाविक आहे.. म्हणूनच तर जीमला जायला वेळ नसेल, तर घरातल्या घरात काही सोपे व्यायाम करून तुम्ही तुमचा फिटनेस नक्कीच जपला पाहिजे...(benefits of step aerobics workout)

 

फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. शिल्पा इन्स्टाग्रामच्या (instagram share) माध्यमातून बऱ्याचदा योगासनांवर भर देण्याचा प्रयत्न करते. पण यावेळी मात्र तिने स्टेप एरोबिक्स वर्कआऊट हा पर्याय सांगितला आहे. हे वर्कआऊट करण्यासाठी आपण त्यासाठीचं उपकरण विकत घेऊ शकतो किंवा घरात असणाऱ्या पायऱ्यांच्या मदतीनेही आपल्याला स्टेप एरोबिक्स वर्कआऊटचे काही प्रकार करता येतात. 

 

स्टेप एरोबिक्स वर्कआऊटचे फायदे
- पाठ, कंबर आणि पायाच्या स्नायुंचा व्यायाम होण्यासाठी हा वर्कआऊट प्रकार उत्तम मानला जातो.
- स्टेप एरोबिक्स वर्कआऊटचा संगीत हा एक मुख्य भाग आहे. त्यामुळे संगीताच्या तालावर वर्कआऊट करताना जास्त रिलॅक्स होण्याचा आणि त्यामुळेच जास्त फ्रेश होण्याचा अनुभव येतो.
- शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करून वेटलॉस करण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम प्रकार मानला जातो.
- स्टेप एरोबिक्स वर्कआऊट हा कार्डिओ वर्कआऊटचाच एक प्रकार आहे. त्यामुळे cardiovascular health साठी हा उत्तम व्यायाम मानला जातो. 
- हात आणि पाय यांची सूसुत्रता जपण्यासाठी आणि वाढविण्यासाठी हे वर्कआऊट उपयुक्त ठरतं.
- लेग टोनिंगसाठी मदत करणारा व्यायामप्रकार आहे. 

 

घरच्याघरी स्टेप एरोबिक्स वर्कआऊट करताना काळजी घ्या...
- जर तुम्ही स्टेप एरोबिक्स वर्कआऊटसाठी लागणारं इक्विपमेंट आणून व्यायाम करणार असाल तर एक- दोन वेळा फिटनेस एक्सपर्टचे सेशन प्रत्यक्ष अटेंड करा. किंवा इंटरनेटवर त्या संदर्भातले व्हिडिओ बारकाईने पाहून मगच व्यायामाला सुरुवात करा.
- स्टेप एरोबिक्सचे काही व्यायाम आपल्याला घरच्याघरी पायऱ्यांचा वापर करून नक्कीच करता येतात. पण त्यासाठी पायऱ्यांची उंची किती आहे आणि अशा पद्धतीचा व्यायाम करण्यासाठी ती योग्य आहे की नाही, हे तपासून घ्या.
- पायऱ्या खूप गुळगुळीत किंवा टोचणाऱ्या नकोत. यामुळे पायाला त्रास होऊ शकतो.
- जीना जर अगदीच अरुंद असेल तर मोकळेपणाने व्यायाम करता येणार नाही. त्यामुळे शक्यतो थोडी मोकळी, ऐसपैस जागा शोधा. 

 

Web Title: No time for gym? Then follow Shilpa Shetty's advice and start step aerobics workout at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.