Join us  

आलिया भट- करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानीचा खास सल्ला, ५ व्यायाम, योगा कधीही-कुठेही.. कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2022 8:05 AM

Fitness Tips by Anushka Parwani: योगा करण्यासाठी योगा मॅटच अंथरली पाहिजे आणि व्यवस्थित बसून किंवा झोपूनच योगा केला पाहिजे, असं तुम्हालाही वाटतं का, मग वाचा सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी यांचा खास सल्ला..

ठळक मुद्देफिटनेससाठी योगा कधीही आणि कुठेही.. असं त्या म्हणत आहेत. बघा या पोस्टमध्ये नेमकं त्यांनी काय सांगितलं आहे..

अनुष्का परवानी हे बॉलीवूडच्या फिटनेस विश्वातलं एक अग्रणी नाव. आलिया भट, करिना कपूर (Alia Bhat, Kareena Kapoor) अशा बड्या स्टार्सच्या फिटनेस ट्रेनर म्हणून अनुष्का परवानी ओळखल्या जातात. त्या सोशल मिडियावरही जबरदस्त ॲक्टीव्ह असून त्यामाध्यमातून त्या नेहमीच फिटनेस विषयी जागृती करण्याचा प्रयत्न करत असतात. आता नुकतीच त्यांनी एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली असून फिटनेससाठी योगा कधीही आणि कुठेही (Yoga anywhere and anytime).. असं त्या म्हणत आहेत. बघा या पोस्टमध्ये नेमकं त्यांनी काय सांगितलं आहे (Fitness Tips by Anushka Parwani)... 

 

योगा करायचा असेल तर एक वेळ ठरवली पाहिजे. व्यवस्थित योगा मॅट किंवा सतरंजी टाकून त्यावरच योगा केला पाहिजे, असं आपण आजवर ऐकत आलो आहोत. योगाचे एक सेशन कमीतकमी अर्ध्या तासाचे तरी असतेच. पण आजकाल प्रत्येक जणच आपापल्या रुटीनमध्ये व्यस्त झाला आहे. त्यामुळे एवढा वेळ व्यायामाला देणे काही जणांना खरोखरंच शक्य नसते, तर काही जणांना वेळ असूनही व्यायामाचा कंटाळा येतो. अशा दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी चालता- बोलता आणि अगदी कधीही- कुठेही करता येतील, असे व्यायामाचे ५ प्रकार अनुष्का यांनी सुचविले आहेत. 

 

योगा कधीही आणि कुठेही.. अनुष्का यांनी सांगितलेले ५ व्यायाम१. पहिला व्यायामयासाठी एखादी खुर्ची, सोफा यांची मदत घ्यावी लागेल. तुमचे दोन्ही हात खुर्चीच्या पाठीवर ठेवा. आता एक पाय गुडघ्यातून दुमडा आणि तो आडवा करून थेट खुर्चीच्या वरच्या आडव्या भागावर ठेवा. मागचा पाय तिरपा करून त्यावर जोर द्या. दुसऱ्या पायाने पुन्हा हाच व्यायाम करा.

World Mental Health Day: डिप्रेशनशी सामना करणारे ८ सेलिब्रिटी, आजार न लपवता हिमतीने केला मानसिक आजाराचा सामना

२. दुसरा व्यायामसोफ्यावर किंवा बेडवर मांडी घालून बसा आणि हात डोक्याच्या मागे करून दोन्ही बाजूंनी कंबरेतून वाका.

 

३. तिसरा व्यायाममांडी घालून सोफ्यावर किंवा बेडवर बसा आणि कंबरेतून एकदा डाव्या बाजूने तर एकदा उजव्या बाजूने वळा. यावेळी मागच्या बाजूची भिंत दिसली पाहिजे, एवढे वरचे शरीर आणि चेहरा वळवावा.

दिवाळीत नवीन मिक्सर खरेदी करण्याचा विचार करताय? परफेक्ट मिक्सर निवडण्यासाठी ५ गोष्टी; वाटणघाटण एकदम सोपं

४. चौथा व्यायामएक पाय उचला आणि एखाद्या उंच टेबलवर किंवा कपाटावर अगदी सरळ रेषेत ठेवा. दोन्ही हातांनी ती वस्तू पकडा आणि तिच्यावर दाब देण्याचा प्रयत्न करा. 

५. पाचवा व्यायामकुठेही मांडी घालून अगदी ताठ बसा आणि डोळे मिटून मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा.

 

टॅग्स :फिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदेव्यायामआलिया भटकरिना कपूर