Lokmat Sakhi >Fitness > व्यायामाला वेळ नाही, झोपेतून उठल्या उठल्या बेडवरच करा 5 स्ट्रेचिंग एक्सरसाइज, दिवसभर राहा फ्रेश

व्यायामाला वेळ नाही, झोपेतून उठल्या उठल्या बेडवरच करा 5 स्ट्रेचिंग एक्सरसाइज, दिवसभर राहा फ्रेश

Fitness Tips: सकाळी झोपेतून उठल्याउठल्या फक्त ४ ते ५ मिनिटे स्वत:ला द्या आणि अगदी बेडवर पडल्या पडल्याच हे ५ स्ट्रेचेस (5 stretches for health) करा.. तुमची मॉर्निंग तर फ्रेश आणि गुड असेलच... पण अख्खा दिवस रहाल एनर्जेटिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2022 01:28 PM2022-03-17T13:28:59+5:302022-03-17T13:29:40+5:30

Fitness Tips: सकाळी झोपेतून उठल्याउठल्या फक्त ४ ते ५ मिनिटे स्वत:ला द्या आणि अगदी बेडवर पडल्या पडल्याच हे ५ स्ट्रेचेस (5 stretches for health) करा.. तुमची मॉर्निंग तर फ्रेश आणि गुड असेलच... पण अख्खा दिवस रहाल एनर्जेटिक!

No time to exercise, just get up from bed and do 5 stretching exercises in just 5 minutes, stay fresh all day | व्यायामाला वेळ नाही, झोपेतून उठल्या उठल्या बेडवरच करा 5 स्ट्रेचिंग एक्सरसाइज, दिवसभर राहा फ्रेश

व्यायामाला वेळ नाही, झोपेतून उठल्या उठल्या बेडवरच करा 5 स्ट्रेचिंग एक्सरसाइज, दिवसभर राहा फ्रेश

Highlightsहे व्यायाम तुम्हाला झोपेतून जाग आल्यावर लगेचच करायचे आहेत. त्यासाठी उठा, योगा मॅट किंवा सतरंजी शोधा, ती टाका.. अशी काहीही कटकट नाही.

व्यायाम तर करायचाय, पण वेळच मिळत नाही.. ही बऱ्याच जणींची तक्रार.. त्यामुळेच तर मग आज करू, नंतर करू, उद्या करू असं म्हणत म्हणत व्यायामाच्या वेळा पुढे ढकलल्या जातात आणि त्या कायम पुढे- पुढेच जात राहतात. म्हणूनच तर हा घ्या एक मस्त पर्याय... फक्त ४ ते ५ मिनिटांचा (stretching exercise for 5 minutes) व्यायाम. व्यायामासाठी एक तास, अर्धा तास द्यायला वेळ नसेल, तर एवढं तरी कराच.. 

 

सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर (instagram share) केली आहे. यामध्ये त्यांनी सकाळची सुरुवात कोणत्या ५ प्रकारच्या व्यायामाने करावी, हे सांगितले आहे. विशेष म्हणजे हे व्यायाम तुम्हाला झोपेतून जाग आल्यावर लगेचच करायचे आहेत. त्यासाठी उठा, योगा मॅट किंवा सतरंजी शोधा, ती टाका.. अशी काहीही कटकट नाही. आपल्याला जाग आली आहे असे जाणवले की तसंच काही मिनिटे बेडवर पडून रहा आणि पडल्यापडल्यास हे ५ व्यायाम करा.. दिवसभर रहाल फ्रेश आणि उत्साही... 

 

सकाळी उठल्यावर करा हे ५ स्ट्रेचेस...
१. पाठीवर झोपा. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा आणि शरीराजवळ घ्या. कंबरेचा भाग आणि जमिन यात अंतर असलेलं आपल्याला नेहमीच जाणवतं. हा कंबरेचा कर्व्ह जो आहे, तो पहिल्या प्रकारच्या स्ट्रेचिंगमध्ये आपल्याला कमी करायचा आहे. यासाठी पाठीने जमिनीवर किंवा बेडवर दाब देण्याचा प्रयत्न करा आणि हा कर्व्ह कमी झाला आहे की नाही, ते स्वत:च तपासा. ५ ते ६ सेकंद हा स्ट्रेच करावा.

२. दुसऱ्या प्रकारच्या व्यायामात दाेन्ही पाय गुडघ्यात दुमडलेले आणि शरीराजवळच असू द्या. आता एक गुडघा तुमच्या पोटावर घ्या आणि त्या अवस्थेत ५ ते ६ सेकंद थांबा. हीच आसनस्थिती आता दुसऱ्या पायानेही करा. एक पाय पोटावर असताना दुसरा तळपाय मात्र जमिनीवर व्यवस्थित टेकलेला असावा.

 

३. तिसरा प्रकार करताना आता दोन्ही गुडघे पोटावर घ्या. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांच्या भोवती असू द्या. ही आसनस्थिती १० ते १५ सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा. यालाच पवनमुक्तासन असेही म्हणतात. 

४. चौथ्या प्रकारचा स्ट्रेच करताना आपल्याला मर्कटासनची अवस्था करायची आहे. यासाठी दोन्ही हा खांद्याच्या सरळ रेषेत दोन्ही बाजूने पसरवा. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवलेले असावेत. यानंतर दोन्ही पाय एकसाथ उजव्या बाजुला वळवा, यावेळी चेहरा डाव्या बाजुला करा. ही आसनस्थिती १० ते १५ सेकंद टिकवल्यानंतर दुसऱ्या बाजुने करावी. म्हणजे पाय डाव्या बाजुला आणि मान उजव्या बाजूला.

 

५. या प्रकारात दोन्ही पाय सरळ ठेवा दोन्ही हात डोक्याच्यावर घ्या. आता पायाचा तळवा पुढच्या दिशेने वाकवून जास्तीतजास्त ताणायचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे वरील बाजूने हात जास्तीतजास्त जाणून वर ओढण्याचा प्रयत्न करा. ही आसनस्थिती देखील काही काळ टिकवा.


 

Web Title: No time to exercise, just get up from bed and do 5 stretching exercises in just 5 minutes, stay fresh all day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.