Join us  

Tips to Reduce Extra Fat : शरीरातले विषारी पदार्थ बाहेर काढतील ६ पदार्थ, रोज खा; पोटावरची चरबी झरझर होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 9:09 AM

Tips to reduce extra fat and cleansing body : खाण्यापिण्यात काही बदल करून तुम्ही हे नियंत्रणात ठेवू शकता. वजन कंट्रोल करण्याासह, बॉडी डिटॉक्स करण्यासाठी तुम्हाला हे उपाय फायदेशीर ठरतील.

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.  यामुळे शरीरात टॉक्सिन्स जमा होतात याशिवाय शरीरातील अतिरिक्त चरबीही वाढते. यापासून बचाव करण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांनी पौष्टीक पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. न्युट्रिशनिस्ट शिखा अग्रवाल शर्मा यांच्यामते लठ्ठपणा ही एक मोठी समस्या आहे. लहानांपासून मोठ्यांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तुम्हाला  काही घरगुती उपायांचा  आधार घ्यावा लागेल. (Nutritionist and dietitian shikha told 6 easy and effective tips to reduce extra fat and cleansing body naturally)

वजन घटवण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी फिजिकल एक्टिव्हीजसह हेल्दी डाएटसुद्धा महत्वाचं आहे. जर तुम्ही व्यायामासाठी वेळ काढू शकत नसाल तर तुमचं वजन खूप वाढेल. खाण्यापिण्यात काही बदल करून तुम्ही हे नियंत्रणात ठेवू शकता. वजन कंट्रोल करण्याासह, बॉडी डिटॉक्स करण्यासाठी तुम्हाला हे उपाय फायदेशीर ठरतील.

वजन कमी करण्यासाठी आणि शरीरात साचलेले घाणेरडे पदार्थ काढून टाकण्यासाठी तुम्ही ग्रीन टीचे सेवन केले पाहिजे. ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. वजन कमी करण्यासोबतच, हे पेय रक्तदाब कमी करण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास देखील मदत करते. त्यात साखर किंवा मध घालू नका. अन्यथा कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते.

शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आहारात बदल करण्यासोबतच व्यायामासाठी थोडा वेळ काढा. जर तुम्ही रोज 20 ते 25 मिनिटे व्यायाम केलात तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. यामुळे शरीर तंदुरुस्त राहतेच पण पचनसंस्थाही निरोगी राहते.तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात लिंबू आणि आल्याच्या पेयाने करू शकता.  हे केवळ शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकत नाही तर वजन कमी करण्यास देखील मदत करते. डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस आणि 2 इंच किसलेले आले एक ग्लास कोमट पाण्यात मिसळा. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करेल.

प्रोटिन्स चरबी कमी करण्यासाठीव खूप प्रभावी आहेत. दिवसा तुमच्या आहारात काजू, अंडी, हरभरा, बीन्स, मसूर आणि शेंगा यांचा समावेश करा. यामुळे भूक नियंत्रणात राहील. जे फॅट बर्न करून वजन कमी करण्यास मदत करते. रात्रीच्या जेवणात जड अन्न घेणे टाळा. त्याऐवजी काकडी, गाजर, लेट्युस, स्प्राउट्स, फळे, हिरव्या पालेभाज्या आणि केल (कोबी सारखी दिसणारी जांभळी भाजी) यांचे सॅलेड रात्री खावे. यामुळे शरीराला शक्ती आणि आराम मिळेल. फळे आणि भाज्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. हे एक नैसर्गिक डिटॉक्सिफायिंग एजंट आहे.

वजन कमी करण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी पाण्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. म्हणूनच हवामान कोणतेही असो, दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. यामुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. यामुळे तुम्हाला एनर्जीही मिळेल, तसेच रात्रीची झोपही चांगली मिळेल.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्य