बीटात व्हिटामीन्स, मिनरल्ससह अनेक औषधी तत्व असतात. रोज बीट खाणं तब्येतीसाठी उत्तम ठरतं. ठंडीच्या दिवसात बीटाचे सेवन केल्यानं पचनक्रियासुद्धा चांगली राहते. थंडीच्या दिवसात बीट कमी किमतीत चांगल्या प्रकारे उपलब्ध होतात. न्युट्रीशनिस्ट लवनीत बत्रा सांगतात की बीटरुटमुळे चांगले पोषक तत्व मिळतात. बीटरूटमध्ये अत्यंत पौष्टीक आणि आरोग्याला पोषण देणारे गुणधर्म असतात. (Nutritionist lovneet batra shared 5 beetroot benefits helps to control bp and high sugar)
बीटाच्या सेवनाचे फायदे
१) बीटामध्ये प्राकृतिक स्वरुपात नायट्रेट असते. यामुळे शरीरात नायट्रिक ऑक्साईड वाढतं. रक्त वाहिन्यांमध्ये पसरतं आणि ब्लड फ्लो सुधारतो ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं.
२) थंडीच्या दिवसात सांधेदुखीची समस्या वाढते. बीटाचे सेवन फायदेशीर ठरते. कारण यात बीटालेन नावाचे एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. यामुळे सूज येण्याची समस्या नियंत्रणात राहते.
३) बीटात अल्फा लिपोईक एसिड नावाचे एंटी ऑक्सिडेंट असते. जे डायबिटीज फ्रेंडली असते. बीटाच्या सेवनानं रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
४) भरपूर फायबर असते आणि ते तुमच्या आतड्यात चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देते. पचनसंस्थेमध्ये भरपूर निरोगी बॅक्टेरिया असल्यामुळे रोगांशी लढण्यास मदत होते. यासोबतच फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा धोका कमी होतो.
५) बीटरूटमध्ये जस्त, तांबे, लोह आणि जीवनसत्त्वे सी आणि ए सारखी आवश्यक प्रतिकारशक्ती वाढवणारी खनिजे असतात. अशा स्थितीत बीटरूटचे नियमित सेवन केल्यानं शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता सुधारली जाऊ शकते.