बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या अभिनयाचं तर कौतूक होतच असतं पण तिने ज्या पद्धतीने स्वत:ला मेंटेन ठेवलं आहे ते पाहूनही अनेकांना आश्चर्य वाटतं. कतरिनासारखी परफेक्ट फिगर मिळविण्यासाठी तर अनेक तरुणी धडपड करत असतात. ती काय खाते, तिचं रुटीन कसं असतं, कोणता व्यायाम करते असे प्रश्नही त्यामुळे अनेकींना पडतात (Katrina Kaif's fitness secret). याच प्रश्नांचं उत्तर आता कतरिनाच्या आहारतज्ज्ञांनी दिलं आहे. कतरिनाच्या डाएटिशियन श्वेता शाह (nutritionist Shweta Shah reveals katrina kaif's diet plan) यांच्या मुलाखतीचा एक छोटासा भाग व्हायरल झाला असून यामध्ये त्यांनी कतरिनाच्या आहाराविषयी बरीच माहिती दिली आहे.(how to get tonned body like Katrina Kaif?)
श्लोका या यु ट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत श्वेता सांगतात की कतरिनाला घरचं अन्नच आवडतं. त्यामुळे फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी तिचा भर घरी तयार केलेल्या जेवणावरच असतो.
खूप काळजी न घेताही झटपट वाढणाऱ्या ५ वेली- बाग होईल हिरवीगार- दिसेल छान
शुटींगसाठी घराबाहेर पडतानाही कतरिना स्वत:चा घरून आणलेला डबा नेहमीच सोबत ठेवते. शिवाय ती आयुर्वेद मानते. त्यामुळे दिवसातून दोन वेळाच जेवण करणं हा तिचा मागच्या कित्येक दिवसापासूनचा नियम आहे. याशिवाय रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे यावरही तिचा भर असतो.
याशिवाय कतरिना नैसर्गिक पद्धतीने बॉडी डिटॉक्स करण्यासाठी कोहळ्याचा ज्यूस दररोज न चुकता पिते. बॉडी डिटॉक्स होण्याच्या क्रियेमध्ये शरीरातील विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर फेकले जातात.
७९ हजारांच्या साडीवर मलायका अरोराने घातलं लटकन ब्लाऊज; त्याचं डिझाईन पाहूनच नेटिझन्स म्हणाले...
यामुळे शरीर आतून स्वच्छ होत जाते आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही त्याचा खूप उपयोग होतो. जर एखाद्या वेळी कोहळा मिळालाच नाही तर डिटॉक्स ड्रिंक म्हणून ती पुदिना, आवळा आणि कोथिंबिरीचा एकत्रित ज्यूस पिते. दिवसाची सुरुवात ती मनुका आणि बडिशेप खाऊन करते. यामुळे पचनक्रिया अधिक चांगली होते. याशिवाय दररोज नियमितपणे व्यायाम तर ती करतेच. फिटनेस टिकविण्यासाठी कतरिना जे काही करते ते खूप काही अवघड नाही. त्यामुळे करून पाहायला हरकत नाही..