जसजसं वय वाढत जातं तसतसं गुडघेदुखी, कंबरदुखीचे त्रास वाढतात. कारण सुर्यापासून मिळणारं व्हिटामीन डी कमी तापमनामुळे शरीराराल कमी प्रमाणात मिळतं. (Vitamin D Deficiency) यामुळे टेंडन्स, मसल्स आणि आसपासचे टिश्यूज पसरतात. युरिक एसिड वाढल्यानं सांध्यांची हालचाल करण्यास (High Level of Uric Acid) त्रास होतो.
आयुर्वेदीक तज्ज्ञ डॉ. इला यांनी या समस्येपासून घरबसल्या सुटका मिळवण्यासाठी रामबाण उपाय सांगितला आहे. याच्या वापरानं थंडीमुळे जाणवणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. (Oil for Knee Pain) आर्थरायटिसचे रुग्णही या त्रासापासून सुटका मिळवू शकतात. हे तेल घरी कसं बनवयाचं समजून घेऊया. (Ayurvedic doctor ela shared homemade oil for knee pain and joint pain)
हे तेल बनवण्यासाठी लागणारं साहित्य
१) २० ते ३० ml राईचं तेल
२) ६ ते ८ लसूण पाकळ्या
३) ६ ते १० कढीपत्ते
1) मोहोरीमध्ये सेलेनियम नावाचे खनिज मोठ्या प्रमाणात असते यामुळे हाडं बळकट होण्यास मदत होते. याशिवाय यातील एंटीऑक्सिडंट्स, एंटी इंफ्लेमेटरी गुणधर्म वेदना कमी करण्यात प्रभावी ठरतात.
२) लसणाच्या सेवनानं हाडांमधले कॅल्शियम शोषण सुधारतं. यातील सल्फर संयुगांमध्ये दाहक-विरोधी आणि संधिवात-विरोधी प्रभाव असतो, ज्यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो.
3) गुडघ्यांमध्ये सूज आल्याने वेदना ही समस्या असू शकते. अशा स्थितीत कढीपत्ता प्रभावी ठरू शकतो. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे सूज कमी करण्याचे काम करतात.
4) तेल, लसूण, कढीपत्ता एका पातेल्यात १० मिनिटांपर्यंत ब्राऊन होईपर्यंत उकळून घ्या. हे तेल थंड झाल्यानंतर एका भांड्यात काढून घ्या. या तेलानं संपूर्ण शरीराला मसाज करा. हा उपाय रोज केल्यानं काही दिवसात तुम्हाला फायदे पाहायला मिळतील.
5) एक्सपर्ट्स सांगतात की मोहोरीच्या तेलानं नियमितपणे मालिश केल्यानं मासंपेशी, सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळतो. आर्थरायटिसच्या रुग्णांसाठीही हे तेल फायदेशीर आहे. यात ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात. यामुळे सांधेदुखीमुळे उद्भवणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते.