Lokmat Sakhi >Fitness > OMG !! फिटनेस क्वीन मलायका अरोरा नेहमी खाते डोनट आणि केक.. तरीही एवढी फिट ?

OMG !! फिटनेस क्वीन मलायका अरोरा नेहमी खाते डोनट आणि केक.. तरीही एवढी फिट ?

डाएट  करायचं,  फिटनेस जपायचा म्हणजे  सगळ्यात आधी  गोड  पदार्थांना हद्दपार  करायचं, असंच  तुम्हालाही  वाटतं  ना ?  मग बॉलीवुडची सुपरफिट अभिनेत्री  मलायका  अरोरा नेहमीच डोनट आणि  केक खाऊनही एवढी  स्लीम- ट्रीम कशी काय  बरं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:43 PM2021-07-07T16:43:37+5:302021-07-07T16:44:14+5:30

डाएट  करायचं,  फिटनेस जपायचा म्हणजे  सगळ्यात आधी  गोड  पदार्थांना हद्दपार  करायचं, असंच  तुम्हालाही  वाटतं  ना ?  मग बॉलीवुडची सुपरफिट अभिनेत्री  मलायका  अरोरा नेहमीच डोनट आणि  केक खाऊनही एवढी  स्लीम- ट्रीम कशी काय  बरं ?

OMG !! bollywood actress Malaika Arora is eating donut and cake...  | OMG !! फिटनेस क्वीन मलायका अरोरा नेहमी खाते डोनट आणि केक.. तरीही एवढी फिट ?

OMG !! फिटनेस क्वीन मलायका अरोरा नेहमी खाते डोनट आणि केक.. तरीही एवढी फिट ?

Highlights खूपच इच्छा होत असेल तर गोड पदार्थ खाण्यास काहीच हरकत नाही. पण त्यानंतर मात्र काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत.

मलायका अरोराकडून फिटनेस मोटीव्हेशन घेऊन डाएटिंग आणि एक्सरसाईज करणाऱ्या लाखो तरूणी  भारतात आहेत. चाळिशीनंतरही फिटनेस कसा जपावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मलायका. तिच्या  फिटनेसचे किस्से तर नेहमीच चर्चिले जातात. हे किस्से वाचून आपल्याला असे वाटते की जंक फुड, आईस्क्रीम, गोड पदार्थ असे काही काही मलायकाने आयुष्यात कधी टेस्ट करून बघितले आहे की नाही ? पण असं काही नाहीए बरं का... मलायकादेखील आठवड्यातून एकदा तिच्या आवडीच्या गोड पदार्थांवर यथेच्छ ताव मारत असते, हे खुद्द तिनेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. 

 

मलायका अरोराने इन्स्टाग्रामवर नुकतीच एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये डोनट आणि केक या पदार्थांचे फोटो असून मलायका त्याचा आस्वाद घेताना दिसते आहे. "Death by donuts" असे कॅप्शन तिने या फोटोला दिले असून हार्टचे इमोजीदेखील तिने टाकले आहेत. तिने शेअर केलेले चॉकलेट केक आणि फ्लफी, स्पाँजी डोनटचे फोटो अतिशय टेम्प्टिंग असून हे फोटो पाहताच कुणालाही चटकन चाखून पाहण्याची इच्छा होईल.

 

गोड पदार्थ खावेत ?
वजन कमी करायचे असेल किंवा फिटनेस जपायचा असेल, तर गोड पदार्थ किंवा जंक फुड अजिबातच खाऊ नये, असे मुळीच नाही. खूपच इच्छा होत असेल तर गोड पदार्थ खाण्यास काहीच हरकत नाही. पण त्यानंतर मात्र काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत असे आहारतज्ज्ञ सांगतात. 

 

या गोष्टी नक्कीच फॉलो करा
१. गोड पदार्थ खायचे असतील तर आठवड्यातून ते शक्यतो एकदाच खा.
२. जर आपल्याला माहिती आहे की आता जेवणानंतर आपण काहीतरी गोड खाणार आहोत, तर जेवण थोडे कमी करा. म्हणजे दोन पोळ्या खाणार असाल तर त्या दिवशी एकच पोळी खा.
३. गोड पदार्थ हे शक्यतो जेवणाच्या आधी खावेत. म्हणजे आपोआपच भूक कमी होते आणि आपण कमी खातो. आपल्याकडे आपण नेमकं उलटं करतो. सगळे जेवण आधी करून घेतो आणि समारोप गोड पदार्थाने करतो. असे करणे खूपच चुकीचे आहे.
४. ज्या दिवशी गोड पदार्थ खाल्ले असतील, त्याच्या दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा अधिक वर्कआऊट करा आणि फिट रहा.

 

Web Title: OMG !! bollywood actress Malaika Arora is eating donut and cake... 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.