Lokmat Sakhi >Fitness > सारा अली खान आणि अनन्या पांडे ज्याच्या फॅन, त्या ओरीचा फिटनेस फंडा वाचा..उगीच नाही सेलिब्रिटी त्याच्यावर फिदा..

सारा अली खान आणि अनन्या पांडे ज्याच्या फॅन, त्या ओरीचा फिटनेस फंडा वाचा..उगीच नाही सेलिब्रिटी त्याच्यावर फिदा..

Orry aka Orhan Awatramani Fitness : स्वतःला 'लिव्हर' म्हणवून घेणारा ओरी नक्की आहे तरी कोण? सारा-अनन्याचा आहे एकदम खासम-खास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2023 11:33 AM2023-12-01T11:33:00+5:302023-12-01T11:33:49+5:30

Orry aka Orhan Awatramani Fitness : स्वतःला 'लिव्हर' म्हणवून घेणारा ओरी नक्की आहे तरी कोण? सारा-अनन्याचा आहे एकदम खासम-खास

Orry aka Orhan Awatramani Fitness | सारा अली खान आणि अनन्या पांडे ज्याच्या फॅन, त्या ओरीचा फिटनेस फंडा वाचा..उगीच नाही सेलिब्रिटी त्याच्यावर फिदा..

सारा अली खान आणि अनन्या पांडे ज्याच्या फॅन, त्या ओरीचा फिटनेस फंडा वाचा..उगीच नाही सेलिब्रिटी त्याच्यावर फिदा..

सेलिब्रिटींचा खास दोस्त, प्रत्येक पार्टीची शान ओरहान अवतारमणी उर्फ ओरी (Orry) सध्या सोशल मीडियात प्रचंड चर्चेत आहे. सोशल मिडिया अॅप्स ओपन केलं तर सर्वत्र ओरीचीच हवा आहे. त्याने नुकतंच लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस १७ मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली. या काळात शो ची टीआरपी खूप वाढली. मात्र, नेटकरी बॉलिवूडचा भाग नसतानाही तो सुपरस्टार्सचा बेस्ट फ्रेण्ड झालाच कसा? असा प्रश्न उपस्थित करत आहे.

शिवाय करणने त्याच्या कॉफी विथ कारण (Koffee with Karan) या शोमध्ये सारा आणि अनन्याला 'ओरी नक्की आहे कोण?' असा प्रश्न विचारला असता, 'ओरी मजेदार व्यक्ती आहे, पण तो काय करतो हे आम्हालाही ठाऊक नाही.' असे उत्तर दिले. ओरीचं सोशल मीडिया अकाउंट पाहिल्यास, अगदी रेखापासून ते सलमान खान व आताच्या काळातील कलाकारांसोबत त्याचे फोटो आहेत (Social Viral). पण ओरी दिसायला कुल, स्टायलिश आणि फिट राहतो. दरम्यान, ओरी नक्की आहे कोण? त्याचा फिटनेस मंत्रा काय (Fitness)? पाहूयात(Orry aka Orhan Awatramani Fitness).

ओरीचा फिटनेस मंत्रा

१०० वर्षांची झाली आजी तरीही तिला आपण पन्नाशीत असल्याचं वाटतंय, पाहा आजीची भन्नाट प्रतिक्रिया..नेटकरी म्हणतात..

ओरी सोशल मीडियात अॅक्टिव्ह असतो. तो आपले प्रत्येक अपडेट चाह्त्यांसोबत शेअर करत राहतो. त्याने आपले काही फिटनेस व्हिडिओही शेअर केले आहेत. ओरी फक्त सेलेब्रिटींसोबत फोटो काढण्यासाठी चर्चेत नसून, आपल्या बॉडी आणि फिटनेससाठी फेमस आहे. त्याने आपले काही एक्सरसाईज करतानाचे व्हिडिओ शेअर केले असून, ओरीचे फॅन्स हे व्हिडिओ पाहून नक्कीच मोटीवेट होतील यात शंका नाही.

पुल-अप

ओरी फिट राहण्यासाठी वर्कआउट आणि डाएटवर पुरेपूर लक्ष देतो. तो वेट ट्रेनिंग आणि कार्डिओवर अधिक फोकस ठेवतो. बॅक मसल्स वाढवण्यासाठी ओरी पुल अप्स व्यायाम करतो. या व्यायामामुळे अपर बॉडी शेपमध्ये राहते. शिवाय अपर बॅक आणि मिडल बॅक ते शोल्डर मसल्स निरोगी राहतात. पुल-अप हा एक कंप्लीट व्यायाम प्रकार आहे. पुल-अप करण्यासाठी मुख्यत: पुल-अप रॉडचा वापर केला जातो.

हा व्यायाम करण्यासाठी रॉडच्या खाली उभे रहा. त्यानंतर दोन्ही हात वर उचलताना खांद्याच्या रुंदीपासून काही अंतरावर रॉड पकडा. शरीर वरच्या बाजूला नेत असताना हात आणि शरीर हे एका सरळ रेषेत हवेत. नंतर पाय आपण फोल्डही करू शकता.

डंबेल शोल्डर प्रेस व्यायाम

ओरी अपर बॉडी सुडौल करण्यासाठी डंबेल शोल्डर प्रेस व्यायाम करतो. यामुळे फिजिकल स्ट्रेंथ वाढते. नियमित डंबेल शोल्डर प्रेस व्यायाम केल्याने खांद्याचे स्नायू वाढतात. यासोबतच खांदे आणि बायसेप्स आकर्षक दिसतात.

लेकीसोबत नाताळ साजरा करायचा म्हणून आजारी वडिलांनी काढली विमानाची ६ तिकिटे, लेकीला सुटी मिळाली नाही म्हणून..

हा व्यायाम करण्यासाठी खांद्याच्या रुंदीमध्ये पाय पसरून उभे रहा. खांद्याच्या उंचीवर डंबेल धरा. हात पूर्णपणे पसरेपर्यंत वजन डोक्यापर्यंत न्या व पुन्हा खाली आणा. नंतर ही प्रोसेस पुन्हा करा. आपण याचे ३ सेट करू शकता.

डाएट महत्वाचं

ओरी निरोगी आणि फिट राहण्यासाठी वर्कआउटसह डाएटवर अधिक लक्ष देतो. ओरी नेहमी हेल्दी पदार्थ खाण्यास पसंती दर्शवतो. कारण हेल्दी डाएट फक्त फिट राहण्यासाठी नसून, आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.

Web Title: Orry aka Orhan Awatramani Fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.