Join us  

ऐन तारुण्यात पायऱ्या चढताना दम लागतो - श्वास फुलतो? ५ गोष्टी; दम लागणं बंद - ताकद वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2024 7:38 PM

Out of Breath Walking Up Stairs: Causes and What To Do : चालताना, धावताना - पायऱ्या चढताना दम लागत असेल तर; वेळीच ५ गोष्टी करा

सकाळी बरेच जण मॉर्निंग वॉक (Morning Walk) किंवा जॉगिंगसाठी जातात (Morning Walk). यामुळे शरीर फिट तर राहतेच. पण जस जसं वय वाढत जातं. तस तसं चालताना किंवा धावताना थकवा लागतो (Health Tips). थकव्यामुळे पायऱ्या चढतानाही त्रास होतो. जर लहान वयातच चालताना हात - पाय दुखत असतील तर, याचा अर्थ जीवनशैलीत बदल करणं गरजेचं आहे (Stairs Walking). चालताना किंवा पायऱ्या चढताना दम लागत असेल तर, उर्जेची पातळी कमी किंवा शारीरिक हालचालींच्या अभावामुळे असे होऊ शकते.

एनसीबीआयच्या अहवालानुसार, 'काही शारीरिक हालचालींनंतर जर श्वास घेण्यास त्रास होत असेल तर, वेळीच सतर्क होणं गरजेचं आहे. अशक्तपणा, लठ्ठपणा, मधुमेह, ताणतणाव, झोप न लागणे किंवा शरीरात पोषक तत्वांची कमतरता यांसारख्या समस्यांमुळे श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळवणे गरजेचं आहे'(Out of Breath Walking Up Stairs: Causes and What To Do).

सकाळी उशिरापर्यंत झोपणे टाळा

जर आपल्याला रोज सकाळी उशिरा उठण्याची सवय असेल तर, ही सवय ताबडतोब बदला. रात्री ठराविक वेळेत झोपण्याचा प्रयत्न करा. सकाळी लवकर उठा. दिवसाची सुरुवात व्यायामाने करा. यामुळे श्वासोच्छवासाची समस्या दूर होईल.

मॉर्निंग वॉक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? शारीरिक - मानसिक तणाव कमी करण्यासाठी..

स्टॅमिना वाढवण्यासाठी या गोष्टी करा

जर आपल्याला जरा चालल्यानंतर किंवा व्यायाम केल्यानंतर थकवा जाणवत असेल तर, एनर्जी लेव्हल वाढवायला हवी. स्टॅमिना वाढवण्यासाठी श्वासोच्छवासाचे व्यायाम, वेट ट्रेनिंग, कार्डियोवॅस्कुलर अॅक्टिव्हिटी करायला हवे. यामुळे आपल्याला उर्जात्मक वाटेल.

हेल्दी डाएट

जंक फूड खाणं टाळा. आहारात फक्त आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा. याशिवाय, स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी, योग्य प्रमाणात पाणी आणि इतर द्रवपदार्थांचे सेवन केले पाहिजे.

'या' सवयींपासून दूर राहा

सिगारेट आणि अल्कोहोलच्या वाईट सवयींमुळे श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो. यामुळे स्टॅमिना कमी होतो आणि व्यक्ती लवकर थकते. सिगारेट आणि अल्कोहोल जास्त प्यायल्याने इतर आजारांचाही धोका वाढतो.

वजन कमी करण्याचे सगळेच फंडे फेल? 'या' चहामध्ये तूप घालून प्या; थुलथुलीत पोट होईल सपाट आणि..

पायऱ्यांचा वापर करा

काहींना पायऱ्या चढताना आणि उतरताना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही की, पायऱ्यांचा वापर करणे टाळावे. पायऱ्या चढल्याने स्नायू मजबूत होतात आणि कॅलरी बर्न होण्यासही मदत होते. ज्यामुळे वेट लॉस, हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमताही वाढते.

टॅग्स :हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स