Lokmat Sakhi >Fitness > बैठं काम करून हिप्स मसल्स आखडून जातात? फक्त २ मिनिटांचा व्यायाम, आखडलेले स्नायू होतील मोकळे

बैठं काम करून हिप्स मसल्स आखडून जातात? फक्त २ मिनिटांचा व्यायाम, आखडलेले स्नायू होतील मोकळे

Fitness Tips by Bhagyashree: ८- १० तास सतत बसून काम केल्याने तुम्हालाही असा त्रास जाणवतो का मग अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला हा व्यायाम (exercise) एकदा करून बघितलाच पाहिजे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2022 08:10 AM2022-07-29T08:10:10+5:302022-07-29T08:15:01+5:30

Fitness Tips by Bhagyashree: ८- १० तास सतत बसून काम केल्याने तुम्हालाही असा त्रास जाणवतो का मग अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला हा व्यायाम (exercise) एकदा करून बघितलाच पाहिजे.

Pain in hips muscles due to long sitting hours? 1 simple exercise suggested by actress Bhagyashree to increase mobility of hips muscles. | बैठं काम करून हिप्स मसल्स आखडून जातात? फक्त २ मिनिटांचा व्यायाम, आखडलेले स्नायू होतील मोकळे

बैठं काम करून हिप्स मसल्स आखडून जातात? फक्त २ मिनिटांचा व्यायाम, आखडलेले स्नायू होतील मोकळे

Highlightsअसा त्रास अनेकांना जाणवतो आहे. याच त्रासावरचा उत्तम उपाय सांगते आहे अभिनेत्री भाग्यश्री.

हल्ली प्रत्येकाचंच कामाचं स्वरुप बदललं आहे. अंग मेहनतीपेक्षा बैठ्या कामाचं प्रमाण वाढलं आहे. त्यात कोरोनानंतर अनेक लोकांना वर्क फ्रॉम होम (work from home) देण्यात आलं. ते काही लोकांच्या बाबतीत अजूनही सुरूच आहे. त्यामुळे तर कामाचे तास (long sitting hours) आणखीनच वाढले असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे आता बसल्या बसल्याच हिप्स मसल्स (hips muscles) आखडून जात आहेत. खूप वेळ बसल्यानंतर जेव्हा उठतो, तेव्हा लगेच चालणं शक्य होत नाही. कारण सगळेच स्नायू आखडून गेल्यासारखे वाटतात, असा त्रास अनेकांना जाणवतो आहे. याच त्रासावरचा उत्तम उपाय (exercise to increase mobility of hips muscles) सांगते आहे अभिनेत्री भाग्यश्री.

 

भाग्यश्रीने तिचा हा व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, तो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. पायाचे आखडलेल्या स्नायू मोकळे करण्यासाठी हा व्यायाम खरोखरंच अतिशय गुणकारी ठरणारा आहे. काही साहित्य सोबत घेऊन अगदी घरच्याघरी तुम्हाला हा व्यायाम करता येऊ शकतो. भाग्यश्री म्हणते की या व्यायामाला आयसोलेशन व्यायाम म्हणूनही ओळखलं जातं. आयसोलेशन व्यायाम म्हणजे शरीराच्या एकाच भागावर फोकस करून करण्यात आलेला व्यायाम. या व्यायाम प्रकारात सगळ्यात मुख्य फोकस हिप्स मसल्स आणि पायांचे स्नायू यावर असणार आहे. 

 

कसा करायचा व्यायाम?
- हा व्हिडिओ शेअर करताना भाग्यश्री म्हणतेय की हा व्हिडिओ पाहून व्यायाम किती सोपा आहे, असं तुम्हाला वाटू शकतं. पण जसं जसं तुम्ही तो प्रत्यक्ष करत जाल, तसतसा स्नायुंवर येणारा ताण तुमच्या लक्षात येईल.
- हा व्यायाम करण्यासाठी आपल्याला एक काठी आणि भाग्यश्रीच्या समोर आहे, त्याप्रमाणे साधारणे १५ ते २० सेमीची एखादी वस्तू लागणार आहे.
- आता सगळ्यात आधी गुडघ्यावर बसा. त्यानंतर एक पाय समोर करून त्याचा तळवा जमिनीला टेकवा आणि तो जमिनीशी काटकोनात ठेवा.
- आता जो पाय उभा ठेवला आहे, त्याच्या दुसऱ्या हातात एक काठी घ्या आणि काही अंतरावर ती काठी सरळ उभी ठेवा.

''बॅकपेनने अनेक वर्षे छळलं, पण आता मी त्यावरचा उपाय शोधलाय...'', समीरा रेड्डी सांगतेय कंबरदुखीवरचा इलाज
- आता पाठीचा कणा ताठ ठेवा. जो पाय उभा आहे, त्याच्यासमोर वस्तू ठेवा. पायाव्यतिरिक्त शरीराच्या इतर कोणत्याही भागाची हालचाल न करता पायाने त्या वस्तूला स्पर्श न करता पाय वस्तूच्या एका बाजूने उचलून दुसऱ्या बाजूला ठेवा. पुन्हा पहिल्या बाजूला घ्या.
- ही कृती चार ते पाच वेळा रिपिट करा. पुन्हा दुसऱ्या पायाने अशीच हालचाल करा. 

 

Web Title: Pain in hips muscles due to long sitting hours? 1 simple exercise suggested by actress Bhagyashree to increase mobility of hips muscles.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.