Lokmat Sakhi >Fitness > पनीरपासून बाजरीच्या भाकरीपर्यंत; प्रोटीनसाठी रोजच्या जेवणात हे पदार्थ खातात सेलिब्रिटी

पनीरपासून बाजरीच्या भाकरीपर्यंत; प्रोटीनसाठी रोजच्या जेवणात हे पदार्थ खातात सेलिब्रिटी

What foods are the highest in protein : मलायका आणि फिटनेसमध्ये एक खास कनेक्शन आहे. फिट राहण्यासाठी हेल्दी इटिंग आणि वर्कआउट सेशनवर अभिनेत्रीचा विश्वास आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 02:54 PM2022-06-15T14:54:02+5:302022-06-15T16:41:56+5:30

What foods are the highest in protein : मलायका आणि फिटनेसमध्ये एक खास कनेक्शन आहे. फिट राहण्यासाठी हेल्दी इटिंग आणि वर्कआउट सेशनवर अभिनेत्रीचा विश्वास आहे.

Paneer to millet roti bollywood stars eat these things to increase the protein level in the body | पनीरपासून बाजरीच्या भाकरीपर्यंत; प्रोटीनसाठी रोजच्या जेवणात हे पदार्थ खातात सेलिब्रिटी

पनीरपासून बाजरीच्या भाकरीपर्यंत; प्रोटीनसाठी रोजच्या जेवणात हे पदार्थ खातात सेलिब्रिटी

स्लिम, टोन्ड आणि हेल्दी बॉडी कोणाला नको असते. आपल्यापैकी बहुतेक जण बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फिटनेसनं प्रेरित आहेत. स्टाइलपासून ते फिटनेस टिप्सपर्यंत, बी-टाउन सेलेब्स नेहमीच ट्रेंड सेटर असतात, ते जे काही करतात, त्यांचे चाहते तेच करण्याचा प्रयत्न करतात. (Paneer to millet roti bollywood stars eat these things to increase the protein in the body) जवळपास प्रत्येकाच्या डाएट प्लॅनमध्ये एक गोष्ट कॉमन असते, ती म्हणजे प्रोटीन. प्रथिने आपल्या फिटनेस उद्दिष्टांमध्ये आणि वर्कआउट्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. (What foods are the highest in protein)

निरोगी राहण्यासाठी आपल्याला आहारात दररोज प्रोटीन घेणे आवश्यक आहे. आपल्या आहारात 15 ते 35 टक्के प्रोटीन असले पाहिजे. आपल्या शरीराला प्रथिनांपासून भरपूर अमीनो ऍसिड मिळतात. प्रथिनयुक्त अन्नासाठी काही विशिष्ट अन्नाचे सेवन करावेच लागेल असे नाही, परंतु घरगुती अन्न पदार्थांनीही प्रथिनांचे प्रमाणही वाढवता येते. (Healthy Protein Food Sources) बरेच लोक वनस्पती-आधारित अन्न, प्रथिनेयुक्त फळे आणि दही  यांचे प्रथिने पातळी वाढवण्यासाठी सेवन करतात.  जर तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीच्या फिटनेसने प्रेरित असाल, या लेखात  बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांचे प्रोटीन लेव्हल वाढवण्यासाठी काय खातात ते सांगणार आहोत. (High protein foods vegetarian)

चांगल्या तब्येतीसाठी प्रोटीन का महत्वाचं

प्रथिने मुळात अमीनो ऍसिड असतात, जी शरीराच्या जवळजवळ प्रत्येक पेशीमध्ये असतात. पेशींची दुरुस्ती आणि पोषण करण्यासाठी आपल्या शरीराला प्रथिनांची गरज असते. हे ब्लॉक्स तयार करणे, स्नायू मजबूत करणे आणि हाडांच्या विकासास मदत करते. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करून हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. खरं तर, प्रथिने युक्त आहार घेतल्याने वजन कमी होण्यासच नव्हे तर वजन वाढण्यासही मदत होते.

सारा अली खान

अभिनेत्री सारा अली खानचा वजन वाढण्यापासून ते कमी करण्यापर्यंतचा प्रवास लोकांसाठी प्रेरणादायी आहे. एका मुलाखतीत त्यांनी PCOD मुळे त्यांच्या आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल सांगितले होते. यानंतर, त्यांनी निरोगी आहारासह कठोर व्यायाम पद्धतीचे पालन करून प्रोटीनला आपल्या आहाराचा एक भाग बनवले. प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी तिनं बाजरीची रोटी आणि ब्रेडचे सेवन केले. बाजरीत प्रथिने, फायबर आणि खनिजं असतात, जे संपूर्ण आरोग्याला चालना देते आणि तुम्‍हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं.

(अरे व्वा! या ५ प्रकारच्या भाज्या खा, जीवघेण्या कॅन्सरचा टळेल धोका, तज्ज्ञांचा दावा)

टायगर श्रॉफ 

टायगर श्रॉफ त्याच्या मजबूत शरीरासाठी बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहे. जिममध्ये घाम गाळण्याचा विषय असो की डाएट, टायगर प्रत्येक काम पूर्ण वेळापत्रकानुसार करतो. अभिनेता एक सुनियोजित आहार देखील पाळतो, ज्यामध्ये त्याला अंडी, उकडलेले चिकन वाफवलेले भाज्या आणि ब्रोकोली मासे खायला आवडतात. शरीरातील प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी तो प्रथिने, फायबर, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्सने युक्त नट आणि ड्रायफ्रूट्स खातो.

शाहीद कपूर

शाहिद कपूर त्याच्या सडपातळ शरीरयष्टीसाठी आणि तीव्र कसरत पद्धतीसाठी ओळखला जातो. अभिनेत्याला शाकाहार आवडतो. तो त्याच्या रोजच्या प्रथिनांच्या सेवनासाठी नट, बिया, शेंगा, टोफू, पनीर आणि सोया या पदार्थांचे सेवन करतो. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी तो फळे, भाज्या, ब्रोकोली यांसारख्या हिरव्या पालेभाज्या खाण्यास प्राधान्य देतो.

मलायका अरोरा

मलायका आणि फिटनेसमध्ये एक खास कनेक्शन आहे. फिट राहण्यासाठी हेल्दी इटिंग आणि वर्कआउट सेशनवर अभिनेत्रीचा विश्वास आहे. तथापि, तिच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढविण्यासाठी, ती मल्टीग्रेन टोस्टसह अंड्याचा पांढरा भाग, स्प्राउट सॅलडसह चिकन, नट बटर सँडविचसह ताजी फळे आणि भाज्या खाण्यास प्राधान्य देते.

करीना कपूर खान

करीना कपूर खानला जेवणात खिचडी आवडते. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप चांगले असते. याशिवाय तिची प्रथिने पातळी वाढवण्यासाठी ती तिच्या आहारात बाजरीच्या रोट्या खाते.
 

Web Title: Paneer to millet roti bollywood stars eat these things to increase the protein level in the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.