Lokmat Sakhi >Fitness > परिणीती चोप्रानं घटवलं २८ किलो वजन; ५ वेटलॉस सिक्रेट्स, तुम्हीही व्हाल 'फॅट टू फिट',

परिणीती चोप्रानं घटवलं २८ किलो वजन; ५ वेटलॉस सिक्रेट्स, तुम्हीही व्हाल 'फॅट टू फिट',

Parineeti chopra weight loss journey : सुरूवातीला परिणीती खूपच जाड होती नंतर तिनं स्वत:ला मेंटेन केलं.  तिची लाईफस्टाईल, फूड हॅबिट्स बदलून तिनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 03:41 PM2023-05-16T15:41:58+5:302023-05-16T15:48:42+5:30

Parineeti chopra weight loss journey : सुरूवातीला परिणीती खूपच जाड होती नंतर तिनं स्वत:ला मेंटेन केलं.  तिची लाईफस्टाईल, फूड हॅबिट्स बदलून तिनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं.

Parineeti chopra weight loss journey how she shed 28 kg fat to fit diet plan | परिणीती चोप्रानं घटवलं २८ किलो वजन; ५ वेटलॉस सिक्रेट्स, तुम्हीही व्हाल 'फॅट टू फिट',

परिणीती चोप्रानं घटवलं २८ किलो वजन; ५ वेटलॉस सिक्रेट्स, तुम्हीही व्हाल 'फॅट टू फिट',

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रानं १३ मे च्या रात्री आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा (Raghav chadha engagement) यांच्यासह लग्नगाठ बांधली. या दोघांनाही एकत्र दिसल्यानंतर स्पॉट केलं जात आहे. (Parineeti chopra weight loss journey) या दोघांचीही तुफान चर्चा सध्या आहे. परिणीतीनं अनेकदा हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळे स्थान मिळवले आहे. सुरूवातीला परिणीती खूपच जाड होती नंतर तिनं स्वत:ला मेंटेन केलं.  तिची लाईफस्टाईल, फूड हॅबिट्स बदलून तिनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. (Parineeti chopra weight loss journey how she shed 28 kg fat to fit diet plan)

परिणीतीचं वेटलॉस सिक्रेट काय?

हेल्दी फूड हॅबिट्सशिवाय फिटनेस मिळवणं कठीण आहे. परिणीती चोप्रा स्ट्रिक्ट डाएट फॉलो करते.  तिनं हाय फॅट, हाय कार्ब्स आणि गोड पदार्थांपासून स्वत:ला दूर ठेवले. ती पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज असे पदार्थ अजिबात खात नाही.

नाश्ता

परिणीती आपल्या नाश्त्यात ब्राऊन ब्रेड, बटर, अंड्याचा पांढरा भाग, एक ग्लास दूध, ताज्या फळांचा रसांचे सेवन करते. हेल्दी ब्रेकफास्टनं ती आपल्या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवते. 

शरीरात साचलेले घातक पदार्थ बाहेर काढतील ७ डिटॉक्स टिप्स; शरीर होईल स्वच्छ-ग्लोईंग दिसाल

दुपारचं जेवण

ती दुपारच्या जेवणात ब्राऊन राईस, चपाती, डाळ आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करते.  वजन कमी करण्यासाठी ती रात्रीसुद्धा एकदम हलका आहार घेते.

रात्रीचं जेवण

परिणीती  रात्री झोपण्याच्या २ तास आधी रात्रीचं जेवण घेते. यात ती कमी तेलाच्या हिरव्या भाज्या, एक ग्लास दूधाचा समावेश करते. 

डाएट कंट्रोल

डाएट कंट्रोल व्यतिरिक्त परिणीती व्यायामावरही लक्ष केंद्रीत करते. ती नेहमीच जीमच्या बाहेर स्पॉट होत असते.  आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ती नेहमीच वर्कआऊटचे व्हिडिओज, फोटोज शेअर करत असते आणि मेडिटेशन सुद्धा करते. वजन कमी करण्यासाठी  परिणीती सहा महिन्यांपासून स्ट्रिक्ट डाएटवर होती. या डाएट प्लॅनने तिला शर्करायुक्त, उच्च-कार्ब आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ खाण्यापासून प्रतिबंधित केले. 

कंबर-मागचा भाग खूपच वाढलाय? शिल्पा शेट्टी सांगतेय २ योगासनं, स्लिम-फिट राहण्याचं सिक्रेट

तिनं वजन कमी करण्याच्या कालावधीत रात्री 8 नंतर खाणे बंद केले, निरोगी आणि मर्यादित आहार  घेतला. तिने हळूहळू तिची जीवनशैली बदलून सुरुवात व्यायामाला सुरुवात केली. तिला आधी वर्कआऊट अजिबात आवडायचा  नाही. मात्र जेव्हा वजन कमी करायचं ठरवलं तेव्हा तिनं व्यायामाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवले.

Web Title: Parineeti chopra weight loss journey how she shed 28 kg fat to fit diet plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.