Lokmat Sakhi >Fitness > पोट कमी करायचंय, डाएट शक्य नाही? फक्त १० रूपयांत मूठभर शेंगदाणे खा-वजन घटवण्याची खास युक्ती

पोट कमी करायचंय, डाएट शक्य नाही? फक्त १० रूपयांत मूठभर शेंगदाणे खा-वजन घटवण्याची खास युक्ती

Peanuts Is Good For Weight Loss : जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी आहारात शेंगदाण्याचा समावेश  करत असाल तर ड्राय  रोस्टेड पीनट्सची निवड करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 10:15 AM2024-04-16T10:15:40+5:302024-04-16T16:25:23+5:30

Peanuts Is Good For Weight Loss : जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी आहारात शेंगदाण्याचा समावेश  करत असाल तर ड्राय  रोस्टेड पीनट्सची निवड करा.

Peanuts Is Good For Weight Loss : Weight Loss Tips Health Tips How to loss Weight Eating Peanuts | पोट कमी करायचंय, डाएट शक्य नाही? फक्त १० रूपयांत मूठभर शेंगदाणे खा-वजन घटवण्याची खास युक्ती

पोट कमी करायचंय, डाएट शक्य नाही? फक्त १० रूपयांत मूठभर शेंगदाणे खा-वजन घटवण्याची खास युक्ती

वजन कमी करण्यासाठी काही लोक व्यवस्थित डाएट करतात डाएट म्हटलं की त्यात प्रोटीन्स आलेच.(Weight Loss Tips)  शेंगदाण्यांचा आहारात समावेश करून तुम्ही वजन कमी करू सकता. यासाठीच जीम ट्रेनर पीनट बटर खाण्याचा सल्ला देतात. शेंगदाण्यांमध्ये फक्त प्रोटीन्स नाही तर हेल्दी फॅट्स, फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. (Peanuts Is Good For Weight Loss) यात आयर्न, फॉलेट, कॅल्शियम, जिंक मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळो कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये राहते. हाय प्रोटीन असल्यामुळे याच्या सेनाने फूड क्रेव्हिग्ससुद्धा नियंत्रणात ठेवात येतात. ओव्हरइंटींगचा धोका कमी होतो. (Weight Loss Tips Health Tips How to loss Weight Eating Peanuts)

नॅशनल  इंस्टीट्यट ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसार शेंगदाण्यांचे सेवन केल्यान वजन कमी करण्याचा प्रवास सोपा होऊ शकतो.  वजन कमी करण्यात शेंगदाणे फायदेशीर ठरतात. यातील हाय प्रोटीन तुम्हाला एनर्जी देते आणि क्रेव्हींग्ंस कंट्रोल होतात (Ref)ज्यामुळे बराचवेळ भूक लागत नाही. पचनक्रिया चांगली राहते. याव्यतिरिक्त शेंगदाण्यात  हेल्दी फॅट्स जसं की अल्फा, लिनोलेनिक एसिड असते. ज्यामुळे वजन नियंत्रणातराहण्यास मदत होते. 

पिनट बटर

पिनट बटर क्रिमी असते ड्राय रोस्ट केल्यानंतर तयार केले जाते. पीनट बटरमध्ये जवळपास ९० टक्के शेंगदाणे असतात. १० टक्के चव आणि बटर यांसारखे टेक्स्चर येण्यासाठी व्हेजिटेबल ऑईल, मीठ, डेक्सट्रोज आणि कॉर्न सिरपचा समावेश असतो.  यात  हाय प्रोटीन्स असतात. 

पीनट ऑईल फायदेशीर

वजन कमी करण्याच्या प्रवासात तुम्ही पीनट ऑईलचा समावेश करू शकता.  यात फॅटी एसिड्सचे इतर तेलांच्या तुलनेत कमी असते. ज्यामुळे फॅट्स वाढण्याची भिती नसते.  यातील लिनोबनानेलिक एसिड आणि ओलिक एसिड कॅन्सरचा धोका कमी करतात.

भाजलेले शेंगदाणे

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी आहारात शेंगदाण्याचा समावेश  करत असाल तर ड्राय  रोस्टेड पीनट्सची निवड करा. वजन कमी करण्यासाठी शेंगदाण्यांचे सेवन फायदेशीर ठरते. यात फ्राईट पीनट, कॅन्डीड पीनट किंवा शुगर कोटेड पीनट्सचा समावेश असतो. 

शेंगदाणे घातलेले पोहे

शेंगदाणे घातलेले पोहे हाय प्रोटीन डाएटचा एक चांगला पर्याय आहेत. शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन्स, फायबर्ससह इतर पोषक तत्व असतात. तर पोहे प्रोटीन आणि कार्बोहायट्रेट्सचा चांगला स्त्रोत आहेत. ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते आणि क्रेव्हिंग्स कंट्रोल करता येते.

Web Title: Peanuts Is Good For Weight Loss : Weight Loss Tips Health Tips How to loss Weight Eating Peanuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.