"फळे खाणं" ही सवय आरोग्यासाठी अतिशय चांगली असते हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आपल्याला रोज एक फळ खाण्याचा सल्ला दिला जातो. आपणही आपल्या आहारात नेहमी एखाद्या तरी फळाचा समावेश करतोच. आपण ही फळं रोजच्या आहारात तर खातोच परंतु ही फळं खाण्याची आपली पद्धत तर चुकत नाही ना... अनेकजण फळे खाऊन झाल्यावर त्याच्या साली टाकून देतात तर काहीजण फळे सालासकट खातात. फळांच्या सालींमध्येही अनेक पोषक घटक असतात. आजकाल फळांवर केमिकल टाकले जाते, त्यामुळे काहीजण फळांच्या साली काढून खातात. परंतु असे करणे आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते.
आजकाल बदलत्या काळानुसार, फळांच्या साली काढून फळ खाण्याचा एक नवा ट्रेंड सुरु झाला आहे. परंतु असे असले तरीही फळांच्या साली खाण्याचा आपल्या शरीराला भरपूर फायदा होतो. फळांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात आणि ते आरोग्यासाठी अनेक प्रकारे उपयुक्त ठरतात. त्याचप्रमाणे फळांच्या सालीमध्येही भरपूर पोषक तत्वांचा खजिना असतो. आपल्या शरीरासाठी फळं जितकी पौष्टिक असतात, तितक्याच त्या फळांच्या साली देखील फायदेशीर ठरतात. अनेकदा आपण फळे खातो परंतु त्यांच्या साली फेकून देतो. असे असले तरीही काही फळांच्या सालीमध्ये आपल्याला नैसर्गिक फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारखे आवश्यक पोषक घटक मिळतात. अशा परिस्थितीत, या फळांच्या साली सोलून खाल्ल्याने आपल्या शरीराला सालींमधील पोषक तत्व ही मिळत नाहीत. त्यामुळे शक्यतो फळांच्या साली न सोलता फळं खाणं हेच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरु शकते(Peeling These 5 Fruits The Wrong Way You Are Losing All The Nutrients).
शक्यतो कोणत्या फळांच्या साली सोलून खाऊ नयेत...
१. पेरु :- पेरु सालीशिवाय खाणे अजिबात योग्य नाही. पेरूच्या सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे त्याचा आरोग्याला फायदा होतो. त्यामुळे पेरु हा नेहमी सालीसकटच खावा.
खूप वर्षे तरुण दिसायचंय-तरुण रहायचंय ? हार्वर्ड विद्यापीठाचा अभ्यास सांगतो ५ गोष्टी न चुकता करा...
२. चिकू :- चिकू खायला अतिशय गोड व चविष्ट लागतो. आरोग्यासाठीही ते फायदेशीर ठरते. चिकूची साल देखील अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण अशी असते. यामध्ये जीवनसत्त्वे, लोह आणि पोटॅशियमसारखे गुणधर्म असतात जे आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. या कारणांमुळे चिकू खाताना शक्यतो त्याची साल न सोलता तो संपूर्ण सालीसकटच खाण्याला प्राधान्य द्यावे.
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी करा ‘उशीचे व्यायाम’! फिट होण्यासाठी पिलो एक्सरसाइजचा पाहा खास प्रयोग...
३. पेर :- आपल्यापैकी काहीलोक पेरची साल सोलून खातात. हे फळ सालीसकट खाणे अधिक फायदेशीर ठरते. पेरच्या सालीमध्ये भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात जे पचनासाठी खूप फायदेशीर ठरतात.
रोज मॉर्निंग वॉकला जाता पण वजन कमीच होत नाही? ५ गोष्टी करा, वजन आणि होईल कमी...
४. सफरचंद :- सफरचंदाची साल अनेकजण सोलून खातात. सफरचंदाच्या सालीत अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे सफरचंद धुवून थेट खावे, त्याची साल काढू नये.
५. पीच :- फक्त पीचच नाही तर त्याची साल देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते. पीच हे फळ साली सोबतच खाणे गरजेचे असते. टक्केवारीनुसार, पीचपेक्षा जास्त फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स हे पीचच्या सालीमध्येच असतात, त्यामुळे शक्यतो पीच हे फळं सालीसकटच खावे.