Join us  

लोक व्यायाम करत नाहीत आणि बॉडी पॉझिटिव्हिटी बोलतात नुसतं! आश्रमफेम ईशा गुप्ताचे थेट विधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2022 6:01 PM

तब्येत आणि आरोग्य उत्तम हवं तर व्यायामाला पर्याय नाही, त्याशिवाय पॉझिटीव्हीटी येऊ शकत नाही....

ठळक मुद्देज्यांना फिट राहायचं नसतं आणि ते बिनधास्त म्हणतात, ‘कोरोना-वोरोना कुछ नही होता’. ईशा व्यायाम आणि फिटनेसच्या बाबतीत सजग असल्याचे पाहायला मिळते.

ईशा गुप्ता ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आपल्या अभिनयाने सर्वांना परिचित आहेच. पण तिच्या फिगरचे रहस्य असलेल्या फिटनेस आणि हेल्दी लाईफस्टाईलमुळेही ती प्रसिद्ध आहे. माजी मिस इंडिया असलेली ईशा फिटनेसबद्दल अनेकदा वक्तव्य करताना दिसते. जे लोक शरीराच्या सकारात्मकतेबद्दल बोलतात ते स्वत:च्या फिटनेसविषयी बोलू इच्छित नाहीत असा थेट आरोप ती व्यायाम न करणाऱ्या लोकांवर करते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले हवे असेल तर व्यायामाला पर्याय असूच शकत नाही असे ईशाचे म्हणणे आहे.  

(Image : Google)

ईशा म्हणते, “माझे आयुष्यात एकच गणित आहे ते म्हणजे आयुष्यात वय झाल्यावर मला कोणावर अवलंबून राहावे लागेल किंवा मी स्वत:ची स्वत: नीट हालचाली करु शकणार नाही अशी वेळ माझ्यावर येऊ नये. मला माझे माझे खाता-पिता, हिंडता फिरता आणि एन्जॉय करता आले पाहिजे. मी जेव्हा परदेशात जाते तेव्हा वयस्कर महिला मला त्यांच्या जीवनाचा पुरेपूर आनंद घेत असलेल्या दिसतात. त्यांना आपल्या शेपविषयी काहीही घेणेदेणे नसते पण त्या कोणत्याही आधाराशिवाय आयुष्य एन्जॉय करत असतात, मला तसं आयुष्य जगायचंय. इतकंच नाही तर असे अनेक लोक आहेत जे अजिबात व्यायाम करत नाहीत किंवा स्वत:च्या शरीराकडे म्हणावे तसे लक्ष देत नाहीत मात्र ते बॉडी पॉझिटीव्हीटीबद्दल बोलताना दिसतात. 

(Image : Google)

तसंच आपल्या आजुबाजूला असे अनेक जण असतात ज्यांना फिट राहायचं नसतं आणि ते बिनधास्त म्हणतात, ‘कोरोना-वोरोना कुछ नही होता’. अशा लोकांची मानसिकता समजून घेणे मला फार अवघड जाते. त्यामुळे ईशा व्यायाम आणि फिटनेसच्या बाबतीत सजग असल्याचे पाहायला मिळते. ईशा आपल्याला प्रकाश झा यांच्या आश्रम ३ या शोमध्ये सोनियाचा रोल करताना लवकरच दिसणार आहे. तर तिच्यासोबत बॉबी देओल बाबा निरालाच्या भूमिकेत दिसेल. 

टॅग्स :फिटनेस टिप्सइशा गुप्ता