Join us  

कोण म्हणतं भाताने पोट सुटतं? तज्ज्ञ सांगतात भात शिजवण्याची योग्य पद्धत, वजन वाढणारच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 1:06 PM

Perfect Parboiled Rice : फिट राहण्यासाठी भात खाणं सोडण्यापेक्षा मर्यादीत प्रमाणात भात खाल्ला तर त्याचे अधिकाधिक फायदे मिळतील

भात आणि भाताचे वेगवेगळे पदार्थ लोकांना खायला खूप आवडतात. काही नसेल तरीही डाळ भात किंवा खिचडी बनवली तरी घरातील लोक पोटभर जेवतात.  (Benefits of Parboiled Rice) पण वजन वाढण्याच्या भितीनं आणि पोटाचा घेर वाढण्याच्या भितीनं अनेकजण भात खाणं टाळतात. (Perfect Parboiled Rice) तांदळात कार्ब्सचे प्रमाणही अधिक असते म्हणून भात खाणं अन्हेल्दी मानलं जातं. फिट राहण्यासाठी भात खाणं सोडण्यापेक्षा मर्यादीत प्रमाणात भात खाल्ला तर त्याचे अधिकाधिक फायदे मिळतील. (How to cook perfect para boiled rice)

हेल्दी राहण्यासाठी तुम्ही अर्धवट शिजवलेला भात म्हणजे पारबॉईल्ड राईस खाऊ शकता. यामुळे वजन वाढत नाही आणि अनेक आरोग्य फायदे मिळतात. आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवर याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Perfect Parboiled Rice Recipe)

तांदळाचा हा प्रकार वजन कमी करण्यासाठी उत्तम मानला जातो. यामुळे लठ्ठपणा वाढत नाही आणि रोगप्रतिकारकशक्तीही चांगली राहते. या प्रकारचा भात शिजवण्याच्या ३ स्टेप्स असतात.  सगळ्यात आधी तांदूळ भिजवणं मग शिजवणं आणि नंतर सुकवणं. पारबॉईल्ड राईस साध्या पांढऱ्या भातापेक्षा वेगळा असतो. शिजवण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे याचे टेक्चरही बदलते आणि पोषक मुल्य वाढतात.

पारबॉईल्ड राईस खाण्याचे फायदे

१) पचनक्रिया चांगली राहण्यासाठी हा  भात खायला हवा. यात प्रीबायोटीक मोठ्या प्रमाणात  असतात. यामुळे पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढतात.

२) यात फायबर्स जास्त असतात.  हा भात खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरल्यासारखं वाटतं.

३) यामुळे इंसुलिन सेंसिटिव्हीटी सुधारते कारण ग्लायसेमिक इंडेक्स कमी  होतो. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी हा भात उत्तम पर्याय आहे.

४) जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर हा भात तब्येतीसाठी अतिशय गुणकारी आहे. 

५) पार बॉईल्ड राईसमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते.  हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि केसांची वाढ चांगली होण्यासाठी हा भात फायदेशीर  ठरतो. 

ओटी पोट लटकतंय? पोटाची चरबी घटवेल स्वयंपाकघरातला १ पदार्थ; नियमित खा; सुडौल दिसाल

६) उकडलेल्या तांदळात ब जीवनसत्त्वे देखील चांगली असतात, ज्यामुळे ते हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतात. पारबॉइल्ड राईस बनवताना कोणत्याही प्रकारचं पॉलिशिंग केलं जात नाही आणि त्यातील पोषक तत्वांचे प्रमाणही चांगले राहते. सामान्य तांदळात पॉलिशिंग आणि मिलिंग प्रकियेचा अवलंब केला जातो यामुळे त्यातील पोषक तत्व नष्ट होतात. 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सवेट लॉस टिप्स