Lokmat Sakhi >Fitness > मासिक पाळीत तीव्र वेदना, पोटदुखीने हैराण? करा ५ सोपे व्यायाम; पोटदुखी कमी, मिळेल आराम !

मासिक पाळीत तीव्र वेदना, पोटदुखीने हैराण? करा ५ सोपे व्यायाम; पोटदुखी कमी, मिळेल आराम !

Health tips: पाळी सुरू झाली की सुरुवातीचे दोन दिवस काहीच करू नये असं वाटतं ना? पोटदुखी (menstrual cramps, menstrual pain) असह्य होते.. म्हणूनच तर या त्रासापासून सुटका मिळविण्यासाठी दररोज करा हे सोपे व्यायाम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 06:12 PM2022-02-21T18:12:24+5:302022-02-21T18:14:43+5:30

Health tips: पाळी सुरू झाली की सुरुवातीचे दोन दिवस काहीच करू नये असं वाटतं ना? पोटदुखी (menstrual cramps, menstrual pain) असह्य होते.. म्हणूनच तर या त्रासापासून सुटका मिळविण्यासाठी दररोज करा हे सोपे व्यायाम..

Period hacks: Yogasana, exercise to reduce the menstrual cramps, How to reduce pain during periods? | मासिक पाळीत तीव्र वेदना, पोटदुखीने हैराण? करा ५ सोपे व्यायाम; पोटदुखी कमी, मिळेल आराम !

मासिक पाळीत तीव्र वेदना, पोटदुखीने हैराण? करा ५ सोपे व्यायाम; पोटदुखी कमी, मिळेल आराम !

Highlightsपाळीतही आपली नेहमीची कामे विनाअडथळा करायची असतील, तर हे काही व्यायाम प्रकार करा. पाळीचा त्रास होईल कमी..

मासिक पाळीचे ४ दिवस म्हणजे अगदी नकोनकोसे असतात. यापैकी पहिले दोन दिवस तर अनेक मैत्रिणींसाठी भयंकर आणि परीक्षा पाहणारे असतात.. कारण या दिवसांत काही जणींना पोटदुखीचा एवढा त्रास ( How to reduce pain during periods) होतो की अगदी घरातल्या घरातही चालणे- फिरणे नकोसे वाटू लागते.. अनेक विद्यार्थिनी तर या काळात शाळा- कॉलेजलाही सुटी मारतात. कारण त्यांना होणारा त्रासच इतका जास्त असतो की सुटी घेतल्याशिवाय पर्याय नसतो..

 

आजच्या धकाधकीच्या जीवनात तर घर, ऑफिस, करिअर, शिक्षण या सगळ्या आघाड्यांवर लढताना पाळीचे दान- तीन दिवस ब्रेक घेऊन घरी बसणं अनेक जणींसाठी केवळ अशक्य.. शिवाय या त्रासावर हा काही पर्याय होऊही शकत नाही. त्यामुळेच तर या वेदना कमी करायच्या असतील आणि पाळीतही आपली नेहमीची कामे विनाअडथळा करायची असतील, तर हे काही व्यायाम प्रकार करा. पाळीचा त्रास होईल कमी.. पाळी सुरू असताना तुम्ही हे व्यायाम करू शकता. Glamrs Period Hacks या यु ट्यूब पेजवर हे व्यायाम प्रकार शेअर करण्यात आले आहेत. 

 

१. सुप्त बद्धकोनासन
हा व्यायाम करण्यासाठी तुमच्या कंबरेला आधार देण्यासाठी एक उशी घ्या. ती कंबरेखाली ठेवा आणि पाठीवर झोपा. यानंतर पाय जमिनीवर टेकलेलेच राहू द्या. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवा आणि पायांचे तळवे एकमेकांना जोडा. हात पोटावर ठेवा. श्वास हळूवार घ्या. ही अवस्था एखादा मिनिट टिकविण्याचा प्रयत्न करा. बेडवर झोपल्या झोपल्याही तुम्ही हा व्यायाम करू शकता. 

 

२. उपविष्ट कोनासन
या आसनामुळे पाळीमध्ये होणारी कंबरदुखी आणि पोटदुखी दोन्हीही कमी होईल. हे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ बसा आणि दोन्ही पाय पुढच्या बाजूला असू द्या. आता पायातले अंतर वाढवत न्या. दोन्ही पायांच्या मधल्या जागेतून हात समोर न्या. जेवढे वाकणे शक्य असेल तेवढे वाका. दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडण्याचा प्रयत्न करा. काही सेकंद या अवस्थेत थांबा. ५ ते ७ वेळेस डिप ब्रिथिंग करा. त्यानंतर सावकाश ही अवस्था सोडा.

 

३. बालक्रिडासन
हा व्यायाम करण्यासाठी पाठीवर झोपा. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा आणि गुडघे छातीच्या आजूबाजूला ठैवण्याचा प्रयत्न करा. पायाचे तळवे वरच्या दिशेने असायला पाहिजेत. यानंतर दोन्ही हाताने आतल्या बाजूने पायाचे तळवे पकडा. ८ ते ९ वेळेस डिप ब्रिथिंग करा आणि तेवढा वेळ ही अवस्था टिकवण्याचा प्रयत्न करा. 

 

४. मत्स्यासन
हे आसन करण्यासाठी पद्मासन घालून बसा. यानंतर हाताचे कोपरे जमिनीवर टेकवून पाठही जमिनीला टेका. आता मस्तक जमिनीवर टेकविण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडा. कंबर आणि पाठ जमिनीला टेकणार नाही, अशी तुमच्या शरीराची अवस्था ठेवा. 

 

५. अनंतासन
डाव्या अंगावर झोपा. यानंतर डाव्या हाताचे कोपर जमिनीवर टेकवून त्या हाताच्या तळव्यावर तुमचे डोके ठेवा. उजवा पाय गुडघ्यात वाकवा. उजव्या हाताने पायाचा अंगठा पकडा. आता पाय सरळ वर उचला. १५ ते २० सेकंद ही अवस्था टिकविण्याचा प्रयत्न करा. 

 

Web Title: Period hacks: Yogasana, exercise to reduce the menstrual cramps, How to reduce pain during periods?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.