Join us  

अनिल कपूरच्या चिरतारुण्याचं सिक्रेट काय? स्वत: अनिल कपूरनेच सांगितला सोपा-स्वस्त डाएट प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2024 4:13 PM

Physical fitness secret behind Anil Kapoor's dashing looks : सत्तरी गाठत आले तरीही अनिल यांना फिट राहणं कसं जमतं बुवा?

तरुणाईला लाजवेल असा फिट आणि तंदुरुस्त अभिनेता म्हणजे अनिल कपूर (Anil Kapoor). 'माय नेम ईज लखन' म्हणत त्यांनी बॉलीवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांचा 'झक्कास' अंदाज प्रत्येकाला आवडतो. ६७ वयात ही इतकं फिट राहणं अनिल कपूर यांना चांगलंच जमलंय. ना चेहऱ्यावर वृद्धत्वाच्या खुणा ना फिटनेसमध्ये काही तडजोड. अनिल अजूनही पूर्वीसारखे हॅण्डसम आणि चार्मिंग दिसतात (Fitness). पण त्यांचे तरुण दिसण्यामागे रहस्य काय? आपल्या 'द एज लेस' तारूण्याचं श्रेय त्यांनी वर्कआउट, डाएट आणि साऊथ इंडियन पदार्थांना दिलंय(Physical fitness secret behind Anil Kapoor's dashing looks).

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अनिल कपूर म्हणतात, 'माझं दाक्षिणात्य पदार्थांवर खूप प्रेम आहे. कदाचित म्हणूनच मी कायम फिट दिसत असेन. मला इडली, डोसा, चटणी, सांबार आणि लोणचे खायला खूप आवडते. इडली-डोसा खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शिवाय यात कमी कॅलरीज असल्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबीही वाढत नाही. त्यातील पौष्टीक गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.'

साऊथ पदार्थांव्यतिरिक्त अनिल फिट राहण्यासाठी काय करतात?

अनिल कपूर यांना दाक्षिणात्य पदार्थ फार आवडतात. त्या व्यतिरिक्त ते आपल्या आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करतात.

- अनिल कपूर धूम्रपान आणि दारू पीत नाहीत. शक्यतो साखर आणि जंक फूड टाळतात.

आवडीचं खा मनापासून, फक्त करा कोमट पाण्याचा ‘हा’ उपाय, वाढलेलं वजन झटक्यात होईल कमी

- अनिल यांचे कुटुंब पंजाबी आहे. त्यामुळे ते आपल्या आहारात नेहमी भाज्या, डाळ आणि इतर धान्यांचा समावेश करतात.

- शिवाय ते दिवसात ३ वेळा नाहीतर, ५ ते ६ वेळा मोजकंच पण हेल्दी पदार्थ खातात.

- नाश्त्यामध्ये अनिल सॅलॅड आणि सॅण्डविच खाण्यास प्राधान्य देतात. यासह फळे देखील खातात.

- दुपारच्या जेवणात ते ब्रोकोली सूप पितात.

ना व्यायाम-ना डाएट, फक्त उकळत्या पाण्यात ४ पैकी १ मसाला घालून प्या, काही दिवसात दिसेल फरक

- तर डिनरमध्ये अनिल सॅलॅड खातात. त्यांना विविध प्रकारचे सॉस खायला आवडते. म्हणून सॅलॅडसोबत ते विविध प्रकारचे सॉस खातात..

टॅग्स :अनिल कपूरफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स