Lokmat Sakhi >Fitness > Milind soman : ५५ वर्षीय मिलिंद सोमणनं सांगितल्या रनिंग टिप्स; आजारपणातून बाहेर आल्यानंतरही राहाल फिट

Milind soman : ५५ वर्षीय मिलिंद सोमणनं सांगितल्या रनिंग टिप्स; आजारपणातून बाहेर आल्यानंतरही राहाल फिट

Milind soman's post covid running tips: चाहत्यांनी रनिंगबाबत प्रश्न विचारल्यानंतर मिलिंदनंही चांगला त्यांना प्रतिसाद दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 01:51 PM2021-06-06T13:51:59+5:302021-06-06T14:13:07+5:30

Milind soman's post covid running tips: चाहत्यांनी रनिंगबाबत प्रश्न विचारल्यानंतर मिलिंदनंही चांगला त्यांना प्रतिसाद दिला आहे.

Post covid running tips :Milind soman answers faqs for fans shares he has running everyday post covid running tips | Milind soman : ५५ वर्षीय मिलिंद सोमणनं सांगितल्या रनिंग टिप्स; आजारपणातून बाहेर आल्यानंतरही राहाल फिट

Milind soman : ५५ वर्षीय मिलिंद सोमणनं सांगितल्या रनिंग टिप्स; आजारपणातून बाहेर आल्यानंतरही राहाल फिट

Highlightsवयाच्या 55 व्या वर्षीही मिलिंद आपल्या तब्येतीची पूर्ण काळजी घेतो. कोरोनातून बरं झाल्यानंतर लगेचच त्यांनी धावणं सुरू केलं. जेव्हा आपण दररोज व्यवस्थित धावता तेव्हा पाय, गुडघे मजबूत होतात.

अभिनेता, मॉडल मिलिंद सोमण आपलं एक्टिव्ह लाईफ आणि फिटनेस यामुळे खूप चर्चेत असतो. मार्च महिन्यात मिलिंद सोमणला कोरोना संक्रमण झालं होतं. त्यावेळी त्यानं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती. तुमचा विश्वास बसणार नाही कोरोनाकाळात सतत प्रवासासाठी बाहेर असलेल्या मिलिंद सोमण यांनी जवळपास ३० पेक्षा अधिकवेळा आरटी पीसीआर टेस्ट (RT PCR Test) करून घेतली आहे. वयाच्या 55 व्या वर्षीही मिलिंद आपल्या तब्येतीची पूर्ण काळजी घेतो. कोरोनातून बरं झाल्यानंतर लगेचच त्यांनी (Milind Soman Tips To Improve Running Post Corona) धावणं सुरू केलं. 

मिलिंद पोस्ट कोविडमध्ये एका दिवसाला  ५ ते ६ किलोमीटर धावतो

मिलिंदचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यापासून त्यानं रोज धावायला (Milind Soman running exercise post covid)  सुरूवात केली आहे. दिवसभरात जवळपास ५ ते ६ किलोमीटर  धावण्याचा प्रयत्न करतो.  कोरोनातून बरं झाल्यानंतर त्यानं इन्स्टाग्रामवर फोटोसुद्धा शेअर केला आहे. त्यात त्यानं शर्ट घातलेला नसून स्पोर्ट्स शॉर्ट्स, स्नीकर्स आणि सनग्लासेस लावले आहेत. त्याच्या या फोटोला पत्नी अंकितानंही लाईक केलं आहे.  चाहत्यांनी रनिंगबाबत प्रश्न विचारल्यानंतर मिलिंदनंही चांगला त्यांना प्रतिसाद दिला आहे.

मिलिंद सोमणनं सांगितल्या पोस्ट कोविड रनिंग टिप्स

मिलिंदने खुलासा केला की तो नेहमी आरामदायक चपला वापरतो. "चालण्यासाठी चपला किंवा लुना सँडल घालतो. मला बंद शूज अस्वस्थ वाटतात, मी माझ्या नैसर्गिकरित्या चालण्याचा प्रयत्न करतो. मला मऊ / कडक पृष्ठभागाचा काहीही फरक पडत नाही. टेक्निकचा विषय आहे. हळूवारपणे, योग्यरित्या नियमितपणे धावणे  पाय मजबूत करणं आणि गुडघ्यांसाठी चांगले आहे. "

जेव्हा आपण दररोज व्यवस्थित धावता तेव्हा पाय, गुडघे मजबूत होतात. एकदा आपण धावणे सुरू केले आणि आजारी पडल्यानंतर पुन्हा रिकव्हर झाल्यानंतर पुन्हा हळूहळू धावायला सुरूवात करा. जर तुम्ही नियमित धावाल तरच तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. 

''जर मी पाच ते सहा कि.मी. धावत आहे तर मला एका दिवसात विशेष आहाराची आवश्यकता नाही. होय, रोज जर मी ५० ते ६० कि.मी. चालत असल्यास मला माझ्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मला अधिक खाण्याची आवश्यकता असू शकेल.'' असंही तो म्हणतो

पुढे त्यानं सांगितलं की,  ''मी धावताना कधीही सनस्क्रीन वापरत नाही. धावताना जर ऊन जास्त असेल तर मी फक्त माझ्या तोंडावर दही लावतो. जेव्हा दही सुकल्यानंतर मी माझे तोंड पाण्याने धुतो. यामुळे त्वचा गुळगुळीत होते आणि टॅनिंगचा त्रास होत नाही.

वयाच्या 55 व्या वर्षी मिलिंद आपले आरोग्य आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करतो. तो तरूणांसाठी प्रेरणादायक ठरत असून तो बर्‍याचदा लोकांना कोरोनाची लस घेण्याचे असे आवाहन करत आहे. कारण, तो कोरोनापासून बरा झाल्यानंतर, त्यातील लक्षणे, शारीरिक दुर्बलता जाणवली आहे, अशा परिस्थितीत ते कोरोनाला एक कठीण अनुभव म्हणून  तो त्याच्याकडे पाहतो. 

काही दिवसांपूर्वी शेअर केला होता डाएट प्लॅन

एका फोटोत त्यांच्या हातात एक डीश असून त्यांनी मिल प्लॅन असं कॅप्शन दिलं आहे.  त्यांनी असे लिहिले आहे की,  '' बर्‍याच चाहत्यांनी मला रोज काय खाता म्हणून विचारले आहे म्हणून मी  रोजचं जेवण सोशल मीडिया युजर्स सह शेअर करत आहे.''  ५५ वर्षांच्या अभिनेत्यानं नमुद केलं की, ते आपला दिवस 500 मि.ली. पाणी पिऊन सुरू करतात. त्यानंतर १० वाजता नाष्ता करतात. त्यात नट, पपई, खरबूज आणि सिजनल फळांचा समावेश असतो. 

याशिवाय त्यांना आपल्या आहारात भात, डाळ खिचडी आणि सिजनल भाज्या, फळं, चपात्यांचा समावेश करायला आवडतो. संध्याकाळी ते एक कप गुळाचा काळा चहा येतात. आपल्या फिटनेसचं सिक्रेट लोकांना सांगताना मिलिंद सोमण नमूद करतात की, ते नेहमीच तळलेले पदार्थ, प्रोसेस्ड फूड, पाकीट बंद पदार्थांपासून लांब राहतात. वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदा अल्कोहोलचे सेवन करतात. मिलिंद  यांच्या रात्रीच्या जेवणात डाळ खिचडी किंवा भाज्यांची प्लेट असे हलके जेवण असते. अंथरुणावर झोपण्यापूर्वी गरम पाण्यात  हळद घालून याचे सेवन करतात.
 

Web Title: Post covid running tips :Milind soman answers faqs for fans shares he has running everyday post covid running tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.