नवरात्रीला सगळीकडे फार उत्साहाच आणि जल्लोषाचं वातावरण पहायला मिळत. नवरात्रीत नऊ दिवस गरबा देखील तितक्याच आनंदाने आणि जोशपूर्ण पद्धतीने खेळला जातो. गरबा आणि दांडिया खेळायला आवडणारे प्रत्येकजण नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहात असतात. काहीजण तर दररोज न चुकता गरबा खेळायला जातात. गरबा खेळताना (Do this Stretches after playing Garba) आपण अगदी बेभान होऊन जोशात नाचतो. खरंतर, गरबा हा अतिशय जल्लोषात आणि ऊर्जेने खेळला जाणारा एक लोकप्रिय नृत्यप्रकार आहे. यामुळे गरबा हा अगदी जोरदार खेळला जातो(Tired after Garba, Here is the best stretching to get relaxation).
गरबा खेळत असताना आपल्याला काही वाटत नाही, पण रात्री घरी आल्यावर किंवा दुसऱ्या दिवशी खूप पाय दुखतात. तासंतास असे जोशात नाचल्याने दुसऱ्या दिवशी आपले अंग, पाठ, पाय, मान सगळंच दुखायला लागत. अशावेळी आपण नेमकं काय करावं हे सुचत नाही. जर गरबा खेळून पाय दुखत असतील तर आपण काही सोपे एक्सरसाइज घरच्या घरीच करु शकतो. हे सोपे स्ट्रेचिंग व एक्सरसाइजचे प्रकार केल्याने पाय तर दुखायचे थांबतील सोबतच गरबा खेळून आलेला थकवा देखील कमी होण्यास मदत होईल. गरबा खेळून पाय दुखत असतील तर नेमके कोणते एक्सरसाइज करावेत ते पाहूयात(Post-Garba stretches for instant Leg Relief).
गरबा खेळून पाय दुखल्यावर काय करावे ?
१. वॉर्मअप :- सगळ्यात आधी पाय लांब सोडून मॅटवर पाठ ताठ ठेवून बसा. त्यानंतर आपले दोन्ही हात हलकेच मागे नेऊन आपली बोट जमिनीला टेकवा. आपले हात ताठ ठेवा आणि पाय जमिनीपासून किंचित वर उचलत वर खाली हलवा. दोन्ही पाय एकामागोमाग एक असे वर खाली उचलावेत. असे किमान २० ते ३० वेळा करावे.
२. बटरफ्लाय पोझ :- दोन्ही पाय समोर ठेवून बसा. पाय गुडघ्यातून वाकवून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना चिकटतील असे ठेवा. हात गुडघ्यावर ठेवून गुडघे वरच्या बाजूला उचला. त्यानंतर गुडघे खाली घेऊन जा आणि जमिनीला पायांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे चार-पाच वेळा करा. यानंतर हातांनी पायांचे तळवे पकडा. आता गुडघे वेगानं वर-खाली करत राहा. म्हणजे फुलपाखरांचे पंख जसे वर-खाली होत असतात तसेच हे आसन करावे. पाय आखडणं, पायांना आलेला जडपणा, सुन्न होणं, टाचांचं दुखणं यांसारख्या समस्यांवर हे आसन करणे फायदेशीर ठरते. बटरफ्लाय आसन किमान ३० सेकंद सलग करावे.
गरबा खेळताना खूप घाम येतो-दुर्गंधीही येते घामाची? १ भन्नाट ट्रिक-डिओपेक्षा भारी उपाय...
३. वाईड लेग स्ट्रेच :- यात आपले दोन्ही पाय दोन्ही बाजूला लांब पसरवून घ्यावेत. त्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या बोटांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडून कमरेतून खाली वाकावे. कमरेतून खाली वाकताना आपले कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा. हा एक्सरसाइज केल्याने आपले हात, पाय, पाठ, कंबर स्ट्रेच होऊन त्यावर हलकासा ताण पडतो त्यांचे दुखणे थांबते. २० ते ३० सेकंद हा स्ट्रेचिंग एक्सरसाइज करावा.
गरबा खेळून घाम येतो - मेकअप पसरू नये म्हणून 'असा ' करा वॉटरप्रूफ मेकअपबेस...
४. क्रॉस लेग अँड हीप्स :- यात आपण पायांची मांडी घालतो तसेच मांडी घालण्याच्या स्थितीत बसून घ्यावे. त्यानंतर डावा पाय उजव्या पायावर ठेवून दोन्ही पायांची ढोपरं अगदी बरोबर एकावर एक येतील अशा पद्धतीने बसावे. त्यानंतर आपले दोन्ही हात वर करून थोडेसे मागच्या बाजूला झुकावे आणि हळुहळु पुढे येत आपले हात खाली आणत कपाळ ढोपराला टेकवण्याचा प्रयत्न करावा. हाच एक्सरसाइज परत पुन्हा करून उजवा पाय डाव्या पायावर ठेवावा आणि बाकी संपूर्ण एक्सरसाइज आहे तसाच करून घ्यावा. या एक्सरसाइजमुळे आपले पाय, ढोपर, पायांच्या टाचा दुखण्याचे थांबते.
५. हॅमस्ट्रिंग :- हॅमस्ट्रिंग करताना सगळ्यात आधी दोन्ही गुढघे जमिनीला टेकवून गुढघ्यांवर उभे राहा. आता उजव्या पायाचा गुढघा जमिनीला टेकवून तो गुढघा न उचलता उजवा पाय उचलून तो सरळ रेषेत पुढे आणावा. आता हलकेच पुढे वाकून आपले दोन्ही हात जमिनीला टेकवून घ्यावा. हाच एक्सरसाइज परत डावा पाय उचलून त्यासोबत करावा. हा एक्सरसाइज केल्याने गुडघे, पाय, हात यांचा चांगला व्यायाम होतो. ३० सेकंद हा एक्सरसाइज करावा.
६. रिक्लायनिंग हिप :- रिक्लायनिंग हिप एक्सरसाइज करताना सगळ्यात आधी मॅटवर झोपा. त्यानंतर पाय गुडघ्यात दुमडून पायांचे तळवे जमिनीला टेकवा. आता उजवा पाय वर उचलून तो गुडघ्यात दुमडून डाव्या पायाच्या मांडीवर आडवा ठेवावा. आता या दोन्ही पायांच्या मध्ये चौकोन तयार होईल या चौकोनातून आपला एक हात घालून दोन्ही हातांनी डावा पाय वर उचलून घ्यावा. असाच एक्सरसाइज पुन्हा उजव्या पायासोबत करावा.
७. अँकल रिलीफ :- अँकल रिलीफ करण्यासाठी सगळ्यांत आधी मॅटवर दोन्ही पाय लांब करून बसा. त्यानंतर पायांच्या टाचा जमिनीला टेकवून एका जागी स्थिर ठेवून तळवे पुढे - मागे हलवून घ्यावेत.
अशाप्रकारे आपण हे सोपे स्ट्रेचिंग एक्सरसाइज करु शकता.