Lokmat Sakhi >Fitness > कम्प्युटरवर काम करून मान- खांदे दुखतात? श्री. श्री. रविशंकर सांगतात ५ मिनिटांचा व्यायाम, पटकन आराम मिळेल 

कम्प्युटरवर काम करून मान- खांदे दुखतात? श्री. श्री. रविशंकर सांगतात ५ मिनिटांचा व्यायाम, पटकन आराम मिळेल 

5 Minutes Exercise For Reducing Neck And Shoulder Pain: खांदे मान दुखत असतील, आखडून गेले असतील तर खुर्चीवर बसल्याबसल्या श्री. श्री. रविशंकर यांनी सांगितलेला हा एक सोपा व्यायाम करून बघा...(how to get relief fron neck pain and shoulder pain?) 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2024 01:29 PM2024-08-30T13:29:49+5:302024-08-30T13:33:09+5:30

5 Minutes Exercise For Reducing Neck And Shoulder Pain: खांदे मान दुखत असतील, आखडून गेले असतील तर खुर्चीवर बसल्याबसल्या श्री. श्री. रविशंकर यांनी सांगितलेला हा एक सोपा व्यायाम करून बघा...(how to get relief fron neck pain and shoulder pain?) 

powerful technique for neck and shoulder pain by shri shri ravishankar, how to get relief from neck pain and shoulder pain | कम्प्युटरवर काम करून मान- खांदे दुखतात? श्री. श्री. रविशंकर सांगतात ५ मिनिटांचा व्यायाम, पटकन आराम मिळेल 

कम्प्युटरवर काम करून मान- खांदे दुखतात? श्री. श्री. रविशंकर सांगतात ५ मिनिटांचा व्यायाम, पटकन आराम मिळेल 

Highlightsहा उपाय एवढा सोपा आणि सहज आहे की तो ऑफिसच्या खुर्चीवर बसल्याबसल्याही तुम्हाला करता येईल.

हल्ली बहुतांश लोकांना ८ ते १० तास स्क्रिनवर काम करावं लागतं. लॅपटॉप, कम्प्युटर यांच्यावर सतत नजर खिळवून ठेवताना आपली मान- खांदा एकाच अवस्थेत तासनतास असतो. त्यामुळे मग ते आखडून जातात. दुखतात. किंवा बऱ्याचदा ज्या लोकांचं टू व्हीलर जास्त चालवणं होतं, त्यांनाही मानदुखी, खांदेदुखीचा त्रास होतो (5 Minutes Exercise For Reducing Neck And Shoulder Pain). तुमचा हा त्रास अगदी झटपट कमी करायचा असेल तर श्री. श्री. रविशंकर यांनी सांगितलेला हा एक सोपा उपाय करून बघा. (how to get relief fron neck pain and shoulder pain?)

 

मान- खांदे आखडून गेले असतील तर काय करावे?

हा उपाय एवढा सोपा आणि सहज आहे की तो ऑफिसच्या खुर्चीवर बसल्याबसल्याही तुम्हाला करता येईल.

किचनमधल्या टाईल्स खूपच मेणचट होतात? ५ गोष्टी लक्षात ठेवा- स्वयंपाक घर नेहमीच राहील लख्खं

त्यासाठी सगळ्यात आधी खुर्चीवर ताठ बसा. दोन्ही हात सरळ वर करा. त्यानंतर हातांची बोट काही सेकंद ताणून ठेवा. यानंतर दोन्ही हातांच्या मूठ घाला आणि सोडा असं ३ ते ४ वेळा करा. त्यानंतर तळहात डावीकडे- उजवीकडे याप्रमाणे हलवा असं साधारण अर्धा मिनिट करा.

 

 यानंतर हात खाली करा. दोन्ही हाताची चार बोटं डोक्याच्या मागच्या बाजूला लावा तर अंगठे दोन्ही गालांवर ठेवा. वरचा जबडा आणि खालचा जबडा या मधला जो गालावरचा भाग असतो तिथे तुमचा अंगठा असावा.

किचन ट्रॉली, लाकडी फर्निचर काळपट झालं? काही मिनिटांतच करा चकाचक, बघा सोपा उपाय 

यानंतर बोटांनी डोक्यावर प्रेशर द्या आणि डोळे ३ वेळा क्लॉकवाईज आणि ३ वेळा अँटीक्लॉकवाईज दिशेने फिरवा.

यानंतर मान उजवीकडे- डावीकडे या पद्धतीने प्रत्येकी ३- ३ वेळा फिरवा. हा व्यायाम केल्यानंतर तुम्हाला मानदुखी आणि खांदेदुखी बऱ्याच प्रमाणात कमी झालेली जाणवेल.


 

Web Title: powerful technique for neck and shoulder pain by shri shri ravishankar, how to get relief from neck pain and shoulder pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.