Lokmat Sakhi >Fitness > दिवाळीपूर्वी वजन कमी करायचंय? आजपासून तातडीने खा ५ पदार्थ, वजन घटेल आणि चेहऱ्यावरही येईल चमचमता ग्लो

दिवाळीपूर्वी वजन कमी करायचंय? आजपासून तातडीने खा ५ पदार्थ, वजन घटेल आणि चेहऱ्यावरही येईल चमचमता ग्लो

Pre-Diwali Diet Plan to shed that extra weight : दिवाळीत फिट आणि फ्रेश दिसायचं तर हे ५ पदार्थ नक्की खा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2023 04:03 PM2023-11-07T16:03:17+5:302023-11-07T16:05:19+5:30

Pre-Diwali Diet Plan to shed that extra weight : दिवाळीत फिट आणि फ्रेश दिसायचं तर हे ५ पदार्थ नक्की खा.

Pre-Diwali Diet Plan to shed that extra weight | दिवाळीपूर्वी वजन कमी करायचंय? आजपासून तातडीने खा ५ पदार्थ, वजन घटेल आणि चेहऱ्यावरही येईल चमचमता ग्लो

दिवाळीपूर्वी वजन कमी करायचंय? आजपासून तातडीने खा ५ पदार्थ, वजन घटेल आणि चेहऱ्यावरही येईल चमचमता ग्लो

सण-उत्सवात आपण सुंदर आणि आकर्षक दिसावे असे सर्वांनाच वाटते. यंदाची दिवाळी १२ नोव्हेंबरला साजरी होणार आहे. अनेकांनी खरेदी आणि इतर तयारी सुरू केली आहे. पण अनेक जण या काळात वाढलेल्या वजनामुळे चिंतीत असतात. खरेदी केलेला ड्रेसमध्ये आपण जास्त लठ्ठ तर दिसणार नाही ना?

दिवाळीसाठी कपडे खरेदी करण्यापूर्वी त्यांना अनेक वेळा विचार करावा लागतो. या काळात वजन कमी करण्यासाठी बरेच जण क्रॅश डाएटला फॉलो करतात. पण याचा थेट दुष्परिणाम आरोग्यावरही होऊ शकतो. जर आपल्याला दिवाळीपूर्वी काही इंचेसने पोटाची चरबी कमी करायची असेल, तर आपल्या आहारात ५ पदार्थांचा नक्कीच समावेश करा(Pre-Diwali Diet Plan to shed that extra weight).

पनीर

द हेल्थ साईट. कॉम या वेबसाईटनुसार, 'जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, आहारात पनीरचा समावेश करा. पनीरमध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. नियमित पनीर खाल्ल्याने शरीराला आवश्यक पौष्टीक घटक मिळतात. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

लटकणाऱ्या आटीपोटामुळे त्रस्त आहात? जीवनशैलीत करा ५ सोपे बदल, काही दिवसात दिसेल आर्श्चकारक फरक

फळ

फळांमध्ये भरपूर फायबर आढळते. जे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते. याव्यतिरिक्त, फळांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. हे शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. जर आपल्याला वजन कमी करायचं असले तर, आहारात संत्री, सफरचंद, लिची आणि चेरी या फळांचा समावेश करा.

ऍपल सायडर व्हिनेगर

वजन कमी करण्यासाठी बरेच जण ऍपल सायडर व्हिनेगरचा ऑप्शन निवडतात. जे वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरते. ऍपल सायडर व्हिनेगरमुळे चयापचय बुस्ट होते. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा ऍपल सायडर व्हिनेगर घालून मिक्स करा. दररोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा.

स्प्राउट्स

वजन कमी करताना बरेच जण आहारात स्प्राउट्सचा समावेश करतात. त्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. हे खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते. शिवाय फॅट्सही बर्न होतात. नियमित स्प्राउट्स खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते. यासाठी आपण सकाळच्या नाश्त्यात अंकुरलेले स्प्राउट्स खाऊ शकता.

वजन कमी आणि पचन सुधारण्यासाठी चिमुटभर हळदीचे २ सोपे उपाय, हळदीचा वापर आरोग्यासाठी वरदान

चिया सिड्स

वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स फायदेशीर ठरते. यामध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. शिवाय सकाळी चिया सीड्स खालल्याने पोट अधिक काळ भरलेले राहते. ज्यामुळे आपण उलट-सुलट खाणे टाळतो. यासाठी एक चमचा चिया सीड्स एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. याचे नियमित सेवन केल्याने वजन नक्कीच कमी होईल.

Web Title: Pre-Diwali Diet Plan to shed that extra weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.