Lokmat Sakhi >Fitness > सतत एकाच जागी बसून काम करता? प्रीती झिंटाने सांगितलेला ‘हा’ सोपा व्यायाम लगेच करा...

सतत एकाच जागी बसून काम करता? प्रीती झिंटाने सांगितलेला ‘हा’ सोपा व्यायाम लगेच करा...

For people who ‘sit a lot,’ Preity Zinta has an amazing exercise to keep your back, glutes, and legs strong : Preity Zinta shows ‘amazing exercise’ for people who sit a lot: ‘Keep your back, glutes and legs strong’ : How To Keep Legs, Glutes And Back Strong? Preity Zinta Demos In Ultimate Fitness Video : ऑफिसमध्ये तासंतास एका जागी बसल्याने मान - पाठ अवघडू नये म्ह्णून प्रीती झिंटा सांगते, खास उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2025 11:39 IST2025-04-24T11:34:45+5:302025-04-24T11:39:57+5:30

For people who ‘sit a lot,’ Preity Zinta has an amazing exercise to keep your back, glutes, and legs strong : Preity Zinta shows ‘amazing exercise’ for people who sit a lot: ‘Keep your back, glutes and legs strong’ : How To Keep Legs, Glutes And Back Strong? Preity Zinta Demos In Ultimate Fitness Video : ऑफिसमध्ये तासंतास एका जागी बसल्याने मान - पाठ अवघडू नये म्ह्णून प्रीती झिंटा सांगते, खास उपाय...

Preity Zinta shows ‘amazing exercise’ for people who sit a lot: ‘Keep your back, glutes and legs strong’ | सतत एकाच जागी बसून काम करता? प्रीती झिंटाने सांगितलेला ‘हा’ सोपा व्यायाम लगेच करा...

सतत एकाच जागी बसून काम करता? प्रीती झिंटाने सांगितलेला ‘हा’ सोपा व्यायाम लगेच करा...

आपल्यापैकी बरेचजण ऑफिसमध्ये डेस्क जॉब करतात. डेस्क जॉब म्हटलं की, तासंतास एकाच ठिकाणी बसून काम करणं आलंच. दिवसांतील सलग काही तास एकाच ठिकाणी बसून, फारशी अंग मेहनत न करता काम केल्याने त्याचे काही दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. सतत एकाच ठिकाणी बसून काम केल्याने मान, पाठ, पाय अगदी संपूर्ण शरीर आखडून (Preity Zinta shows ‘amazing exercise’ for people who sit a lot: ‘Keep your back, glutes and legs strong’) गेल्यासारखं होत. यामुळे वरचेवर अंगदुखी - पाठदुखी आणि पायात गोळे येणे यासारख्या समस्या त्रास देतात. ही सगळी शारीरिक दुखणी किंवा सतत एकाच जागी बसल्याने होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा (Preity Zinta) हिने एक खास एक्सरसाइज सांगितला आहे(For people who ‘sit a lot,’ Preity Zinta has an amazing exercise to keep your back, glutes, and legs strong).

प्रिती झिंटा सध्या बॉलिवूडपासून दूर असूनही, ती तिच्या फिटनेसची तितकीच बारकाईने काळजी घेत असल्याचे दिसते. प्रिती नेहमीच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन फिट आणि तंदुरुस्त राहण्यासाठीचे तिचे खास फंडे, तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकतेच प्रितीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून, दिवसभर एकाच जागी बसून डेस्क जॉब करणाऱ्यांसाठी एक खास एक्सरसाइज शेअर केला आहे. तिने सांगितलेला हा एक्सरसाइजचा नवीन प्रकार केल्याने मान, पाठ, पाय तसेच संपूर्ण शरीराला आराम मिळतो. इतकेच नव्हे तर सतत एकाच जागी बसल्याने आखडून गेलेली मान - पाठ - पाय - कंबरेचा व्यायाम होतो. यामुळे सतत एकाच जागी बसल्याने संपूर्ण शरीर आखडून जाण्याची समस्या दूर होते. 

प्रिती झिंटा सांगते खास एक्सरसाइज... 

सतत एकाच जागी बसून डेस्क जॉब करणाऱ्यांची मान, पाठ, कंबर, पाय सतत अवघडलेलेच असतात. यासाठी अशा लोकांसाठी पाठ, पोट आणि पाय मजबूत ठेवण्यासाठी हा खास एक्सरसाइज आहे, अशी कॅप्शन देत तिने तिचा जिम मधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. प्रितीने शेअर केलेल्या व्यायाम प्रकाराचे नाव Glute Bridge (ग्लूट ब्रिज) असे आहे. ती हा व्यायाम प्रकार जिममधील स्टॅबिलिटी बॉलच्या मदतीने करत आहे. 

एक चूक आणि वजन वाढेल भराभर, तज्ज्ञ सांगतात वेटलॉससाठी खाण्याची योग्य पद्धत - वजनात दिसेल फरक...

यासाठी सर्वात आधी जमिनीवर पाठ टेकवून सरळ रेषेत झोपावे. त्यानंतर आपल्या पायांच्या खालच्या भागात शक्यतो तळव्यांच्या खाली हा मोठा स्टॅबिलिटी बॉल ठेवावा. त्यानंतर आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून द्यावेत. आता मान आणि पायांच्या खालच्या भागांवर जोर देत हळूहळू संपूर्ण शरीर अलगद वर उचलावे. त्यानंतर पाय गुडघ्यांत वाकवून स्टॅबिलिटी बॉलच्या मदतीने सरळ रेषेत पुढे - मागे करावेत. असे जवळपास १० ते १२ वेळा किंवा तुम्हाला जमेल तेवढा वेळ करावे.    

फराह खान इतकी कशी काय बारीक झाली? फराह सांगते बिनपैशाचा सोपा उपाय, वजन घटले सरसर... 


मलायका अरोराच्या परफेक्ट फिगरचे सीक्रेट, सकाळी 'हा' कपभर चहा पिते रोज...

Glute Bridge एक्सरसाइज करण्याचे फायदे...

ग्लूट ब्रिज या व्यायामाचा प्रभाव नितंबांच्या स्नायूंवर होतो. या व्यायामाच्या मदतीने, कोर स्नायू देखील मजबूत केले जाऊ शकतात. यासोबतच, पेल्विक मसल्स मजबूत होण्यास मदत मिळते. या व्यायामाने ग्लूट मजबूत होतात, सोबतच हिप्स आकारात येतात. याचबरोबर, पाठीच्या स्नायूंना मजबुती मिळवून देण्यासाठी देखील हा एक्सरसाइज करणे फायदेशीर ठरते.

Web Title: Preity Zinta shows ‘amazing exercise’ for people who sit a lot: ‘Keep your back, glutes and legs strong’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.