प्रिटी झिंटा (Prity Zinta) सध्या बॉलीवूडमध्ये ॲक्टीव्ह नसली तरी सोशल मिडियामध्ये ती खूप ॲक्टीव्ह आहे. आणि नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून ती चाहत्यांच्या कनेक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असते. ती करत असलेली छोटीशी शेती, तिच्या किचन गार्डनमध्ये उगवलेल्या वेगवेगळ्या भाज्या आणि फळे, तिचा व्यायाम किंवा वर्कआऊट अशा अनेक गोष्टी ती चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करते. आता नुकताच तिने एक वर्कआऊट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून जेटलॅगचा त्रास कमी करण्यासाठी ती हा उपाय करते आहे, असं तिने व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. (How to get rid of the jet lag & stiffness in body due to long journey)
प्रिटीने जी पोस्ट शेअर केली आहे, त्यावरून असं दिसत आहे की तिने नुकताच प्रवास केला असून ती मुंबईला आली आहे. त्यासाठी तिला तब्बल २४ तासांचा प्रवास सलग करावा लागल्याने तिला जेटलॅगचा त्रास तर होताेच आहे,
कॅमेरासमोर जायचं नसतं तेव्हा फक्त १० मिनिटांत तयार होते प्रियांका चोप्रा, बघा कसा करते फास्ट मेकअप
पण मान- पाठ- कंबर आखडून गेल्याने शरीरात एक प्रकारचा stiffness आला आहे. त्यामुळे जेटलॅग आणि बाॅडी स्टिफनेस म्हणजेच शरीर आखडून जाणं हे दोन्ही त्रास कमी करण्यासाठी तिने थेट सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला यांची भेट घेतली आणि त्यांच्या मदतीने काही व्यायाम केले. ती म्हणते की ती जे व्यायाम करतेय, तो जेटलॅग आणि बॉडी स्टिफनेस कमी करण्याचा सगळ्यात वेगवान उपाय आहे.
यास्मिन कराचीवाला यांच्या जीममधल्या अनेक महागड्या उपकरणांच्या मदतीने तिचा व्यायाम सुरू आहे. आता ही मशिनरी काही आपल्या घरी नसतात. किंवा लहान शहरातल्या जीममध्येही नसतात.
मांगटिका एकाजागी राहत नाही, सारखा सरकतो? १ खास सोपी ट्रिक- न हलता मांगटिका बसेल परफेक्ट
त्यामुळे अशावेळी तुम्ही पर्वतासन करू शकता. कारण प्रिटीने जो व्यायाम केला आहे, तो पर्वतासनाशी मिळताजुळता आहे. पर्वतासन करून त्या अवस्थेत एकानंतर एक पाय वर उचलणे, पायांचे स्ट्रेचिंग करणे असे व्यायाम करावेत. या व्यायामामुळे जेटलॅगचा त्रास कमी होईल, असं प्रिटीचं म्हणणं आहे.