Lokmat Sakhi >Fitness > खूप थकवा आला- डोकंही ठणकतंय? फक्त २ ठिकाणी हेड मसाज करा- चटकन फ्रेश वाटेल

खूप थकवा आला- डोकंही ठणकतंय? फक्त २ ठिकाणी हेड मसाज करा- चटकन फ्रेश वाटेल

Proper Method Of Head Massage According to Ayurveda: थकवा, डोकेदुखी, एन्झायटी यासारखे त्रास कमी करण्यासाठी आयुर्वेदानुसार हेड मसाज करण्याची योग्य पद्धत कोणती ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2024 12:42 PM2024-01-24T12:42:45+5:302024-01-24T12:43:29+5:30

Proper Method Of Head Massage According to Ayurveda: थकवा, डोकेदुखी, एन्झायटी यासारखे त्रास कमी करण्यासाठी आयुर्वेदानुसार हेड मसाज करण्याची योग्य पद्धत कोणती ते पाहा...

Proper method of head massage according to Ayurveda, How to do head massage for reducing stress, headache and anxiety? | खूप थकवा आला- डोकंही ठणकतंय? फक्त २ ठिकाणी हेड मसाज करा- चटकन फ्रेश वाटेल

खूप थकवा आला- डोकंही ठणकतंय? फक्त २ ठिकाणी हेड मसाज करा- चटकन फ्रेश वाटेल

Highlightsहेड मसाज करण्याची योग्य पद्धत कोणती ते पाहा... बघा या पद्धतीने हेड मसाज केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच अगदी फ्रेश वाटू लागेल.

हल्ली प्रत्येकाचं शेड्यूल खूप धावपळीचं झालं आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकाच्या मागे कसला ना कसला ताण असतोच. कधी कधी हा ताण असह्य झाल्यामुळे, खूप अंगमेहनत झाल्याने किंवा इतर काही वेगळ्या कारणांमुळे खूप थकवा येतो. डोकेदुखीचा त्रास तर अनेकजणांना नेहमीच होतो. यात महिलांचं प्रमाण तर जास्तच आहे. शिवाय हल्ली एन्झायटीचा त्रासही वाढला आहे. आता थकवा आलेला असो किंवा डोकेदुखी असो किंवा मग एन्झायटीचा त्रास असो... तुमचे हे तिन्ही प्रकारचे त्रास अगदी काही मिनिटांतच दूर करायचे असतील तर त्यासाठी हेड मसाज करण्याची योग्य पद्धत कोणती ते पाहा... बघा या पद्धतीने हेड मसाज केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच अगदी फ्रेश वाटू लागेल.

 

डोकेदुखी, थकवा घालविण्यासाठी हेड मसाज करण्याची योग्य पद्धत

डोकेदुखी, थकवा किंवा एन्झायटीचा त्रास, स्ट्रेस कमी करण्यासाठी हेड मसाज कशा पद्धतीने करावी, याची माहिती chitchatrajlavi and dr.manisha.mishra या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. डोक्याला मालिश करण्याची ही एक आयुर्वेदिक पद्धती आहे. 

भरपूर भाज्या घालून केलेली मिक्स व्हेज करंजी, खमंग- खुसखुशीत, सगळेच आवडीने खातील- घ्या रेसिपी

वरील त्रास कमी करण्यासाठी आपल्या मस्तकावर असणाऱ्या २ प्रेशर पॉईंट्सवर मसाज करणं गरजेचं असतं. यापैकी पहिला पॉईंट आहे अधिपती मर्म. हा पॉईंट नेमका कोणता ते ओळखण्यासाठी आपल्या कपाळावर आपली ४ बोटं ठेवा. सगळ्यात खालची करंगळी ही आपल्या भुवयांच्या वर असावी. त्यानंतर त्याच्यावर दुसऱ्या हाताची आणखी चार बोटं ठेवा. यानंतर डोक्याचा जो भाग येईल, त्याच्या मधोमध असणारा पाॅईंट म्हणजे अधिपती मर्म. या पॉईंटवर तेल लावून मसाज केल्यास एन्झायटी, डोकेदुखी कमी होते. शिवाय झोप चांगली लागते आणि केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.

 

या पाॅईंटनंतर सिमांतक मर्म याठिकाणी मालिश करा. या पॉईंटवर जाण्यासाठी आपण ज्या अधिपती मर्मवर मसाज केली त्याच्यानंतर पुन्हा आपल्या हाताची ४ बोटं डोक्यावर ठेवा.

केस धुण्यापुर्वी शाम्पूमध्ये टाका फक्त २ पदार्थ, भराभर वाढून लांबसडक होतील केस- गळणंही थांबेल

या बोटांच्यानंतर डोक्याचा जो भाग येईल तो आहे सिमांतक मर्म. याठिकाणी तेल लावून मसाज केल्यास थकवा दूर होतो तसेच डोकेदुखी थांबते. 

 

Web Title: Proper method of head massage according to Ayurveda, How to do head massage for reducing stress, headache and anxiety?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.