Lokmat Sakhi >Fitness > Protein and Calcium Foods : कॅल्शियम, प्रोटिन्सचा खजिना आहे स्वयंपाकघरातला १ पदार्थ; रोज खाल तर म्हातारेहोईपर्यंत हाडं राहतील मजबूत

Protein and Calcium Foods : कॅल्शियम, प्रोटिन्सचा खजिना आहे स्वयंपाकघरातला १ पदार्थ; रोज खाल तर म्हातारेहोईपर्यंत हाडं राहतील मजबूत

Protein and Calcium Foods : लोक सहसा फक्त मसूर, मूग किंवा तूर सारख्या कडधान्यांचे सेवन करतात. पण  चवळीमध्ये  फायबर आणि प्रोटीन देखील भरपूर असते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 12:19 PM2022-04-21T12:19:21+5:302022-04-21T12:34:30+5:30

Protein and Calcium Foods : लोक सहसा फक्त मसूर, मूग किंवा तूर सारख्या कडधान्यांचे सेवन करतात. पण  चवळीमध्ये  फायबर आणि प्रोटीन देखील भरपूर असते. 

Protein and Calcium Foods : Include protein and calcium rich black eyed peas or cowpeas in your diet to  weakness bones | Protein and Calcium Foods : कॅल्शियम, प्रोटिन्सचा खजिना आहे स्वयंपाकघरातला १ पदार्थ; रोज खाल तर म्हातारेहोईपर्यंत हाडं राहतील मजबूत

Protein and Calcium Foods : कॅल्शियम, प्रोटिन्सचा खजिना आहे स्वयंपाकघरातला १ पदार्थ; रोज खाल तर म्हातारेहोईपर्यंत हाडं राहतील मजबूत

डाळी आणि शेंगा आरोग्यासाठी सर्व प्रकारे फायदेशीर आहेत. प्रथिने आणि कॅल्शियम व्यतिरिक्त, त्यात जीवनसत्त्वे, लोह, मॅग्नेशियम, जस्त आणि फायबर सारखे घटक असतात, जे शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असतात. डाळींचे नियमित सेवन केल्याने जीवनशैलीतील अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. अशीच एक उत्तम डाळ म्हणजे चवळी. जी  केवळ चवदारच नाही तर आरोग्याचा खजिना देखील आहे.(Include protein and calcium rich black eyed peas or cowpeas in your diet)

लोक सहसा फक्त मसूर, मूग किंवा तूर सारख्या कडधान्यांचे सेवन करतात. पण  चवळीमध्ये (Black eyed peas Benefits)  फायबर आणि प्रोटीन देखील भरपूर असते. वेबएमडीच्या रिपोर्टनुसार, शिजवलेल्या चवळीच्या कपमध्ये कॅलरीज-99, प्रोटीन-7 ग्रॅम, फॅट-0 ग्रॅम, कार्बोहायड्रेट-18 ग्रॅम, फायबर-6 ग्रॅम, प्रोटीन-8 ग्रॅम आणि कॅल्शियम- 42.55 मिलीग्राम असतात. कॉम्प्लेक्स कर्बोदकांचा हा एक उत्तम स्रोत आहे. याशिवाय ते अधिक फायबर प्रदान करते, ज्यामुळे ते वजन कमी करण्यास आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्या टाळण्यास मदत होते.

शरीराल उर्जा मिळते

चवळीमध्ये मॅंगनीज आढळते, जे अँटिऑक्सिडेंट आहे. हे तुमच्या शरीराची ऊर्जा निर्माण करण्यासाठी जबाबदार असलेल्या पेशींच्या संरचनेचे संरक्षण करते. चवळीमध्ये असलेले प्रथिने तुमची ऊर्जा पातळी वाढवण्यासही मदत करतात.

निपल कव्हर वापरण्याचा नवा ट्रेण्ड, हा प्रकार नक्की काय असतो? फायदे-तोटे कोणते?

हाडं चांगली राहतात

अर्धा कप चवळीच्या डाळीमध्ये दररोज शिफारस केलेल्या कॅल्शियमच्या 8 टक्के प्रमाण असते. कॅल्शियम हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे हाडांच्या मजबुतीसाठी महत्वाचे आहे. जर तुम्हाला वारंवार हाडांमध्ये कमजोरी किंवा दुखत असेल तर याचे सेवन करा.

वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते

चवळी खाऊन तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकता. चवळीमध्ये फायबर भरपूर असतात जे वजन नियंत्रित करतात. त्यात प्रथिने आणि हळूहळू पचणारे कर्बोदके असतात, जे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करतात.

डायबिटीसचा धोका कमी होतो

चवळी एक असा पदार्थ आहे, ज्यामध्ये डाएटरी फायबर असतात, जे पचनक्रिया चांगली ठेवतात. ज्यामुळे शरीराला रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत होते. जर तुम्ही डायबिटीसचे रुग्ण असाल तर तुम्ही तुमच्या जेवणात हे नक्की सेवन करा.

फक्त ३ महिन्यात कमी होईल पोटाचा वाढलेला घेर; ४ सोपे उपाय नेहमी दिसाल स्लिम, फिट

गॅस आणि मुळव्याधावर परिणामकारक

चवळीमध्ये डायटरी फायबर असतात. याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता यांसारख्या गंभीर समस्या टाळण्यास मदत होते कारण ते जड मल हलके करते, जे बाहेर जाण्यास सोपे होते. पोटाच्या आतड्यांचे कार्य सुधारण्यासाठी आपण दररोज याचे सेवन केले पाहिजे.

Web Title: Protein and Calcium Foods : Include protein and calcium rich black eyed peas or cowpeas in your diet to  weakness bones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.