Lokmat Sakhi >Fitness > शरीराला भरभरून प्रोटिन्स देतात 6 व्हेज पदार्थ; शाकाहारींसाठी प्रोटिन्सचा उत्तम स्त्रोत

शरीराला भरभरून प्रोटिन्स देतात 6 व्हेज पदार्थ; शाकाहारींसाठी प्रोटिन्सचा उत्तम स्त्रोत

Protein Rich Food Fruits and Vegetables : काही फळे आणि भाज्यांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. या गोष्टींना आपल्या रोजच्या आहाराचा भाग बनवून आपण प्रथिनांची कमतरता टाळू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 03:39 PM2022-12-26T15:39:50+5:302022-12-26T16:33:16+5:30

Protein Rich Food Fruits and Vegetables : काही फळे आणि भाज्यांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. या गोष्टींना आपल्या रोजच्या आहाराचा भाग बनवून आपण प्रथिनांची कमतरता टाळू शकता.

Protein rich food fruits and vegetables to avoid protein deficiency | शरीराला भरभरून प्रोटिन्स देतात 6 व्हेज पदार्थ; शाकाहारींसाठी प्रोटिन्सचा उत्तम स्त्रोत

शरीराला भरभरून प्रोटिन्स देतात 6 व्हेज पदार्थ; शाकाहारींसाठी प्रोटिन्सचा उत्तम स्त्रोत

बळकट शरीरासाठी आणि चांगल्या तब्येतीसाठी शरीराला प्रोटिन्स, कॅल्शियमची गरज असते. (Protein Foods)   फक्त मासाहारी पदार्थ खाल्ल्यानं भरपूर प्रोटिन मिळतं असा बऱ्याचजणांचा गैरसमज असतो. मांस आणि मासे हे प्रथिनांचे सर्वोत्तम स्त्रोत मानले जातात. या पदार्थांमध्ये भरपूर प्रोटीन असते.  काही फळे आणि भाज्यांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. या गोष्टींना आपल्या रोजच्या आहाराचा भाग बनवून आपण प्रथिनांची कमतरता टाळू शकता. यामुळे स्नायूंची ताकद वाढून सतत थकवा येणं, अशक्तपणाचा त्रास कमी होतो. (Protein rich food fruits and vegetables to avoid protein deficiency)

पेरू

पेरू खायला खूप चवदार लागतात. हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. पेरूमध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात आढळतात. पेरूची भाजी आणि रस यांचाही आहारात समावेश करता येईल.

मटार

लोकांच्या आवडत्या भाज्यांच्या यादीत मटारचा समावेश होतो. हिवाळ्यात वाटाणा जवळजवळ प्रत्येक घरात भाजी आणि पुलाव बनवण्यासाठी वापरला जातो. वाटाणे हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. प्रोटीनची कमतरता टाळायची असेल तर वाटाणे खाणे फायदेशीर आहे. तुम्ही रोज उकळलेले वाटाणे खाऊ शकता.

संत्री

संत्रा हे पोषक तत्वांचे भांडार आहे. संत्र्यामध्ये असलेले पोषक घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सही भरपूर असतात. संत्री खाल्ल्याने प्रथिनांच्या कमतरतेवर मात करता येते. याशिवाय पोटही व्यवस्थित राहते. 

पालक

पालक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये असलेले पोषक तत्व अनेक आजार बरे करण्यास मदत करतात. यामध्ये लोह आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. पालक खाल्ल्याने प्रोटीनची कमतरता दूर होते. तुम्ही पालक सूप किंवा पालकाची भाजी खाऊ शकता. 

केळी

केळीचे नाव अनेकांच्या आवडत्या फळांच्या यादीत समाविष्ट आहे. हे पोटॅशियम, फायबर आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत मानले जाते. केळीमध्ये प्रोटीनही मुबलक प्रमाणात असतात. रोज दुधासोबत केळी खाणे फायदेशीर मानले जाते. हे शरीर निरोगी ठेवण्याचे काम करते.

किव्ही

किव्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. किवीमध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि फायबर देखील मुबलक प्रमाणात असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. किवी खाल्ल्याने शरीरात प्रोटीनची कमतरता जाणवत नाही.

Web Title: Protein rich food fruits and vegetables to avoid protein deficiency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.