Lokmat Sakhi >Fitness > झटपट कमी होतं ते वजन असतं की शरीरावरची सूज? तज्ज्ञ सांगतात, वजन घटवताना काय माहिती हवंच..

झटपट कमी होतं ते वजन असतं की शरीरावरची सूज? तज्ज्ञ सांगतात, वजन घटवताना काय माहिती हवंच..

Weight Loss tips: झटपट वजन कमी करण्याचा दावा अनेक जण करतात. पण अशा पद्धतीने वजन खरंच कमी होतं का, ते वजन असतं की शरीरावरची सूज? बघा आहारतज्ज्ञ याविषयी काय सांगत आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2022 08:14 AM2022-11-05T08:14:57+5:302022-11-05T08:15:01+5:30

Weight Loss tips: झटपट वजन कमी करण्याचा दावा अनेक जण करतात. पण अशा पद्धतीने वजन खरंच कमी होतं का, ते वजन असतं की शरीरावरची सूज? बघा आहारतज्ज्ञ याविषयी काय सांगत आहेत.

Quick weight loss within few days is really possible? Expert's opinion about quick weight loss | झटपट कमी होतं ते वजन असतं की शरीरावरची सूज? तज्ज्ञ सांगतात, वजन घटवताना काय माहिती हवंच..

झटपट कमी होतं ते वजन असतं की शरीरावरची सूज? तज्ज्ञ सांगतात, वजन घटवताना काय माहिती हवंच..

Highlightsया उपायांमुळे शरीरावर नेमका कसा परिणाम होतो, याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी दिलेली ही विशेष माहिती.

चुकीच्या जीवनशैलीमुळे सध्या वजन वाढीची (weight gain) समस्या अनेकांना भेडसावते आहे. यात महिला तर जास्त अग्रेसर आहेत. स्त्रियांच्या बाबतीत वजनाचा संबंध थेट सौंदर्याशी जोडला जाण्याची आपल्याकडे जणू प्रथाच आहे. त्यामुळे स्वत:च्या दिसण्याबाबत अधिक दक्ष असलेल्या अनेक मैत्रिणी थोडंसं वजन वाढलं तरी खूप अस्वस्थ होऊन जातात. त्यातही वजन कमी करण्यासाठी (Weight Loss tips) व्यायाम करण्याची  अनेकींची तयारी नसते. म्हणून मग कमी दिवसांत झटपट वजन कमी कसं करायचं, याच्या शोधात त्या असतात आणि त्यांना तसे उपायही सापडतात. पण या उपायांमुळे नेमका शरीरावर कसा परिणाम होतो (Quick weight loss within few days is really possible?), याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी दिलेली ही विशेष माहिती.

 

The Mindful Diet या यु ट्यूब चॅनलवर त्यांनी याविषयीची माहिती शेअर केली आहे. यामध्ये त्या सांगतात की आजकाल  आठवडाभरात ५ किलो वजन कमी करा किंवा अमूक दिवसांत झटपट वजन घटवा, अशा प्रकारचे डाएट  प्लॅन देणारे अनेक जणं आहेत. पण एवढ्या लवकर वजन कमी होणं, ही खरोखरच अशक्य गोष्ट आहे असं त्याचं मत आहे. तुम्ही जोपर्यंत काही दिवस नियमितपणे योग्य आहार घेत नाही. तुमच्या जीवनशैलीमध्ये आरोग्यदायी बदल करत नाही, रोज व्यायाम करत नाही, तोपर्यंत वजन कमी होत नाही. त्यासाठी काही महिने सातत्यपुर्ण प्रयत्न होणं गरजेचं आहे.

 

खरच वजन कमी होतं का?
झटपट उपाय केल्याने खरंच वजन कमी होतं का, याविषयी सांगताना मंजिरी म्हणाल्या की चुकीच्या आहार पद्धतीमुळे किंवा चुकीच्या दिनचर्येमुळे शरीरावर सूज आलेली असते. त्यामुळे व्यक्ती लठ्ठ दिसते. यालाच आपण इन्फ्लामेशन म्हणतो. जेव्हा वजन कमी करण्यासाठी आपण काही प्रयत्न सुरू करतो, तेव्हा सगळ्यात आधी शरीरावरची ही सूज कमी होण्यास सुरुवात होते. यालाच आपण वजन कमी होत आहे, असं समजतो.  

 

Web Title: Quick weight loss within few days is really possible? Expert's opinion about quick weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.