बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक जण वजनवाढीच्या समस्येमुळे हैराण आहेत. काही जण व्यवस्थित डाएट आणि व्यायाम करून वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवतात. पण बहुतांश लोक सध्या असे आहेत की त्यांना एकतर त्यांच्या रुटीनमधून व्यायाम करण्यासाठी वेळ काढणं खरोखरच अवघड जातं तर काही जण असे आहेत ज्यांच्याकडे वेळ असतो पण त्यांना एकेक तास व्यायाम करत बसण्याचा प्रचंड कंटाळा येतो. अशा दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी सांगितलेला उपाय फायदेशीर ठरणारा आहे..(Quick Workout Routine for Busy People) कमीतकमी वेळात योग्य व्यायाम करून फिट कसं राहता येईल याविषयी त्यांनी माहिती सांगितली आहे..(quick exercise that gives maximum health benefits)
कमीतकमी वेळात जास्तीतजास्त फायदे देणारे व्यायाम
ऋजुता यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्या सांगतात की जर तुम्हाला तुमच्या कामामुळे कधी व्यायाम करणे शक्य झाले नाही तर अशावेळी व्यायामाला पुर्णपणे सुट्टी देऊ नका. त्याऐवजी सुर्यनमस्काराचा पटापट हाेणारा व्यायाम करा.
पोटाचा घेर वाढायला लागला? 'हा' पदार्थ खायला आतापासूनच सुरुवात करा- फिगर बिघडणार नाही
तुम्ही अगदी ३ सुर्यनमस्कार व्यवस्थितपणे घातले तरी ते अशावेळी पुरेसे ठरू शकते. काहीच व्यायाम न करण्यापेक्षा ३ सुर्यनमस्कार घालणे कधीही चांगलेच..यामुळे शरीराला बरेच फायदे होतात. शिवाय एक सुर्यनमस्कार घालण्यासाठी तुम्हाला एक ते दिड मिनिटाचा वेळ लागतो. त्यामुळे अवघ्या ५ मिनिटांत ३ ते ४ सुर्यनमस्कार तुम्ही घालू शकता.
सुर्य नमस्कार घालण्याचे फायदे
ऋजुता दिवेकर यांनी सुर्यनमस्कार घालण्याचे काही फायदे सांगितले आहेत. ते नेमके कोणते ते पाहूया..
१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सुर्यनमस्कार हा एक पुर्ण व्यायाम म्हणून ओळखला जातो. म्हणजेच तो असा व्यायाम आहे ज्यामुळे तुमच्या सगळ्या शरीराचाच व्यायाम होतो.
२. सुर्यनमस्कारामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागाचे उत्तम स्ट्रेचिंग होते. त्यामुळे अंग मोकळे होण्यास मदत होते.
३. सुर्यनमस्कारामुळे पायाच्या स्नायूंनाही भरपूर व्यायाम होतो.
४. स्टॅमिना तसेच फिटनेस वाढविणे आणि तो टिकवून ठेवणे यासाठी सुर्यनमस्कार घालणे फायद्याचे ठरते.