वजन कमी करण्यासाठी आहारात बदल करणं फार महत्वाचे आहे. (Weight Loss Tips) अन्हेल्दी पदार्थांपासून लांब राहून हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करावा. ज्यामुळे वजन कमी करणं सहज सोपं होतं. ज्या पदार्थांमध्ये फायबर्सचे प्रमाण अधिक असते ते खाल्ल्याने पोट जास्तवेळ भरलेलं राहतं आणि अन्हेल्दी खाण्याचे क्रेव्हींग्स होत नाहीत. वजन कमी करणंही सहज शक्य होतं. वजन कमी करण्यासाठी शरीरात योग्य पोषक तत्व असणं आणि क्रेव्हिंग्स कंट्रोल करणं फार महत्वाचे असते. यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची काही गरज नाही. (Ragi Laddu Benefits Health Benefits)
रोज सकाळच्या नाश्त्याला लाडू खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरलेलं राहील आणइ शरीरात न्युट्रिएंट्सची कमतरता भासणार नाही आणि वजन कमी करणं सोपं जाईल. डायटिशियन सिमर कौर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. सिरमन सर्टिफाईट आहारततज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ आहेत.
फूड साईन्स एण्ड टेक्नोलॉजीच्या रिपोर्टनुसार नाचणी हाय फायबर फूड आहे. यातून कार्ब्स, फायबर्स, मिळतात. ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होतं (Ref). ज्यामुळे ओव्हर इटींग टाळता येतं. नाचणीचा समावेश मिलेट्समध्ये होतो. नाचणीच्या सेवनानं शरीराला मिनरल्स आणि प्रोटीन्सही मिळतात.
वजन कमी करण्यासाठी नाचणीचे लाडू खाण्याचे फायदे
नाचणीचं पीठ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते, यात फायबर्सचे प्रमाण अधिक असते. ग्लुटेन फ्री असते ज्यामुळे अन्न सहज पचते. शरीरात कॅल्शियमची कमतरता भासल्यास लाडू खाणं फायदेशीर ठरतं. मेनोपॉज, हॉर्मोनल बॅलेन्स आणि पीएमएस या लक्षणांना कमी करण्यासाठी हे लाडू फायदेशीर ठरतात. बदलत्या वातावरणात अनेक आजार होतात या आजारांशी लढण्यासाठी आणि इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी हे लाडू फायदेशीर ठरतात. काजू, बदाम, अक्रोड याचा वपर केला जातो. या हेल्दी फॅट्स भरपूर असतात.
ड्रायफ्रुट्समुळे शरीराला एनर्जी मिळते आणि पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. ज्या लोकांना थकवा, कमकुवतपणा जाणवतो त्यांनी १ ते २ लाडू खायला हवेत. हे लाडू खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं अन्हेल्दी खाण्याचं क्रेव्हिंग होत नाही.
नाचणीचे लाडू करण्यासाठी नट्स आणि सिड्सना भाजून घ्या आणि हे वाटून वेगवेगळे ठेवा. पॅनमध्ये साजूक तूप आणि नाचणीचं पीठ घालून व्यवस्थित भाजून घ्या आता त्यात गुळ पावडर घाला. नंतर थंड होऊ द्या मग सर्व जिन्नस एकत्र करून लाडू बांधा. सकाळी नाश्त्याला १ ते २ लाडू खा किंवा दिवसातून कधीही तुम्ही हे लाडू खाऊ शकता.