Lokmat Sakhi >Fitness > पंजाबी कुडी रकुल प्रीत सिंह वेट लॉससाठी पिते बुलेटप्रूफ कॉफी, ब्लॅक कॉफीमध्ये मिसळते तूप, हा कॉफीचा कोणता प्रकार?

पंजाबी कुडी रकुल प्रीत सिंह वेट लॉससाठी पिते बुलेटप्रूफ कॉफी, ब्लॅक कॉफीमध्ये मिसळते तूप, हा कॉफीचा कोणता प्रकार?

Rakul Preet Singh Bulletproof coffee for sylphlike figure & weight loss : रिकाम्या पोटी तुपाची कॉफी प्या, अन् वजन घटवा, पाहा रकुलची फेवरीट बुलेटप्रूफ कॉफीची सोपी कृती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2023 03:48 PM2023-11-22T15:48:13+5:302023-11-22T16:38:07+5:30

Rakul Preet Singh Bulletproof coffee for sylphlike figure & weight loss : रिकाम्या पोटी तुपाची कॉफी प्या, अन् वजन घटवा, पाहा रकुलची फेवरीट बुलेटप्रूफ कॉफीची सोपी कृती..

Rakul Preet Singh Bulletproof coffee for sylphlike figure & weight loss | पंजाबी कुडी रकुल प्रीत सिंह वेट लॉससाठी पिते बुलेटप्रूफ कॉफी, ब्लॅक कॉफीमध्ये मिसळते तूप, हा कॉफीचा कोणता प्रकार?

पंजाबी कुडी रकुल प्रीत सिंह वेट लॉससाठी पिते बुलेटप्रूफ कॉफी, ब्लॅक कॉफीमध्ये मिसळते तूप, हा कॉफीचा कोणता प्रकार?

पंजाबी गर्ल आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) आपल्या निखळ सौंदर्य आणि अदाकारीसाठी ओळखली जाते. तिने कमी वयात सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. टॉलीवूडसह बॉलीवूडमध्ये देखील तिने आपल्या अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवलं आहे. ती दिसायला सुंदर-सोजवळ तर आहेच, पण तिच्या फिटनेसचं (Fitness) रहस्य काय? हे फार कमी लोकांना माहित आहे. पंजाबी लोकं आवडते पदार्थ दाबून खातात, पण रकुल ही एक फिटनेस फ्रिक आहे. ती बरेच तास जिममध्ये राहून वर्कआउट करते. ती आपल्या फिटनेसकडे बारकाईने लक्ष देते.

व्यायामासह ती आपल्या वेट लॉस रुटीनमध्ये घी कॉफी म्हणजेच बुलेटप्रूफ कॉफीचा (Ghee Coffee) समावेश करते. बुलेटप्रूफ कॉफी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे काम करण्याची उर्जाही वाढते. याचे अनेक फायदे आहेत. चला तर मग रकुलची फेवरीट बुलेट कॉफी नक्की करायची कशी पाहूयात(Rakul Preet Singh Bulletproof coffee for sylphlike figure & weight loss).

बुलेट कॉफी करण्यासाठी लागणारं साहित्य

कॉफी

तूप

कोलेजन पावडर

लग्न जवळ आलं पण अद्यापही वजन कमी झाले नाही? लाईफस्टाईलमध्ये करा ८ सोपे बदल, वजन होईल झरझर कमी

गरम पाणी

कृती

सर्वप्रथम, कॉफी मगमध्ये एक चमचा तूप घाला, नंतर त्यात एक टेबलस्पून कॉफी, एक टेबलस्पून कोलेजन पावडर आणि गरम पाणी घालून चमच्याने मिक्स करा. अशा प्रकारे घी कॉफी रेडी.

बुलेटप्रूफ कॉफी पिण्याचे फायदे

हेल्थ शॉट्स या वेबसाईटला मदरहुड हॉस्पिटलमधील पोषणतज्ज्ञ रूपश्री जयसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एक कप कॉफी शरीराचा थकवा दूर करते. यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. तुपामध्ये ओमेगा ३, ६, ९ व व्हिटॅमिन ए, ई आणि के सारखे निरोगी घटक असतात. ज्यामुळे चयापचय, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या दूर होते. शिवाय वजन कमी करण्यास मदत होते.'

वजन कमी करायचं, पण व्यायाम-डाएट फॉलो होत नाही? झोपताना न चुकता करा १ सोपा उपाय, झरझर घटेल वजन

- रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. पण कॉफीमध्ये तूप मिक्स करून प्यायल्याने पचनसंस्था उत्तमरित्या कार्य करते. शिवाय पोटाचे विकारही दूर होतात.

- सकाळी रिकाम्या पोटी बुलेटप्रूफ कॉफी प्यायल्याने, दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. शिवाय मूडही उत्तम राहतो.

Web Title: Rakul Preet Singh Bulletproof coffee for sylphlike figure & weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.