Lokmat Sakhi >Fitness > रकुल प्रीत सिंहच्या परफेक्ट फिगरचं खास सिक्रेट; पाहा तिचं वर्कआऊट रुटीन...

रकुल प्रीत सिंहच्या परफेक्ट फिगरचं खास सिक्रेट; पाहा तिचं वर्कआऊट रुटीन...

Rakul Preet Singh Fitness routine : रकुल प्रीत नियमितपणे नेमका कोणता व्यायाम करते पाहूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2024 06:27 PM2024-02-23T18:27:06+5:302024-02-23T18:28:37+5:30

Rakul Preet Singh Fitness routine : रकुल प्रीत नियमितपणे नेमका कोणता व्यायाम करते पाहूया...

Rakul Preet Singh Fitness routine : The special secret of Rakul Preet Singh's perfect figure; Check out her workout routine... | रकुल प्रीत सिंहच्या परफेक्ट फिगरचं खास सिक्रेट; पाहा तिचं वर्कआऊट रुटीन...

रकुल प्रीत सिंहच्या परफेक्ट फिगरचं खास सिक्रेट; पाहा तिचं वर्कआऊट रुटीन...

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंह तिच्या अभिनयासोबतच सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. रकुल प्रीत फिटनेसबाबतही तितकीच जागरुक असल्याचे दिसते. नुकतीच रकुल प्रीतने जॅकी भगनानीसोबत लग्नगाठ बांधली असून सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. लग्नाच्या वेळीही रकुल प्रीत अतिशय सुंदर दिसत होती. उंच असल्याने तिचे व्यक्तीमत्त्व आधीच छाप पाडणारे ठरते, त्यात तिच्या फिगरमुळे चाहते तिच्यावर फिदा असतात. तिच्या फिटनेसबाबतही चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असल्याचे पाहायला मिळते. रकुल प्रीतही सोशल मीडियावर आपल्या फिटनेसबाबतचे काही ना काही शेअर करत असते.  अभिनेत्रींना फिगर मेंटेन ठेवण्यासाठी तर व्यायाम करावाच लागतो पण फिटनेस चांगले राहावे यासाठीही त्या नियमितपणे व्यायाम करताना दिसतात. हैद्राबादमध्ये रकुलच्या स्वत:च्या २ जीम असून तिचे फिटनेस प्रेम यातून दिसून येते. रकुल प्रीत नियमितपणे नेमका कोणता व्यायाम करते पाहूया (Rakul Preet Singh Fitness routine)...

१. रकुल नियमितपणे एरियल योगा, योगा, दोरीच्या उड्या, किक बॉक्सिंग आणि स्ट्रेचिंग यांसारखे व्यायामप्रकार करते. 

(Image : Google)
(Image : Google)

२. फिटनेससाठी उपयुक्त असे कार्डियो आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगही ती नियमित करते.  

३. पारंपरिक सूर्यनमस्कारासारखा व्यायाम करण्यालाही रकुल विशेष महत्त्व देते. याचे व्हिडीओही तिने सोशल मीडियावर टाकलेले दिसतात. यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

४. लोअर बॉडी वर्कआऊट करतानाचेही तिचे बरेच व्हिडिओ इन्स्टाग्रामवर दिसतात. यामुळे पायांमधील ताकद वाढण्यास मदत होते. तसेच जास्तीच्या कॅलरीज बर्न होण्यासाठीही या प्रकारचे व्यायाम उपयुक्त असतात. 

५. व्यायामामध्ये शक्य तितकी नियमितता महत्त्वाची असल्याचे रकुलचे म्हणणे आहे. त्यामुळेच तुमचा फिटनेस चांगला राहण्यास मदत होते. व्यायामासोबत चांगले डाएट घेण्याचे महत्त्वही ती सांगते. 

Web Title: Rakul Preet Singh Fitness routine : The special secret of Rakul Preet Singh's perfect figure; Check out her workout routine...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.