Lokmat Sakhi >Fitness > ओटी पोट कमीच होत नाही? रामदेव बाबा सांगतात सकाळ संध्याकाळ ४ गोष्टी करा-स्लिम व्हा

ओटी पोट कमीच होत नाही? रामदेव बाबा सांगतात सकाळ संध्याकाळ ४ गोष्टी करा-स्लिम व्हा

Ways to Lose Weight Naturally : (Pot kas kami karave) : लिंबू पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 01:14 PM2023-10-13T13:14:37+5:302023-10-13T15:44:54+5:30

Ways to Lose Weight Naturally : (Pot kas kami karave) : लिंबू पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होते.

Ramdev Baba says do 4 things in the morning and evening, you will get slim-fit | ओटी पोट कमीच होत नाही? रामदेव बाबा सांगतात सकाळ संध्याकाळ ४ गोष्टी करा-स्लिम व्हा

ओटी पोट कमीच होत नाही? रामदेव बाबा सांगतात सकाळ संध्याकाळ ४ गोष्टी करा-स्लिम व्हा

लठ्ठपणा हा सगळ्यात मोठा आजार बनत चालला आहे. वजन वाढल्यामुळे डायबिटीस, कोलेस्टेरॉल, स्ट्रोक इतकंच नाही तर इन्फर्टिलिटीसारख्या मोठ्या मोठ्या समस्या उद्भवत आहेत. (Successful weight loss Tips) वेळीच लठ्ठपणावर उपचार केले नाही तर आरोग्याच्या गंभीर समस्याही उद्भवू शकता. वजन कमी कमी करण्यासाठी लोक व्यायामाबरोबरच डाएटचा आहारात समावेश करतात. (Ramdev Baba says do 4 things in the morning and evening, you will get slim-fit)

हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करतात.  योग गुरू बाबा रामदेव(Yog Guru Baba Ramdev) यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत  ४ गोष्टींचा सल्ला दिला आहे. ज्या फॉलो  करून तुम्ही हळूहळू आपलं वजन कमी करू शकता. जर तुम्ही नियमित योगासनं केली याशिवाय डाएट केले तर नक्कीच फायदा मिळेल. (Weight Loss Tips) 

सकाळी लिंबू पाणी प्या

लिंबू पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होते. अभ्यासानुसार पुरेसं पाणी प्यायल्यान चयापचन वेगानं होण्यास मदत होते. पिण्याच्या पाण्यात  थर्मोजेनेसिसचे मेटाबॉलिझ्म वाढवते. यामुळे उष्णता तयार होते आणि कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. (Four Ways to Lose Weight Naturally)

रात्रीच्या उरलेल्या खिचडीचा करा कुरकुरीत डोसा; झटपट बनेल नाश्ता-पाहा एकदम सोपी रेसिपी

जेवणात सॅलेड्सचा समावेश करा
 

जेवण्याआधी किंवा जेवताना तुम्ही आहारात सॅलेडचा समावेश केला तर पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होईल.  जर पोटभर सॅलेड खाल्ले तर तुम्ही ओव्हरइंटींग पासून वाचू शकता. यामुळे पोट फुगणं, पोटाचे त्रास कमी होऊ सकतात. तुम्ही कमी कॅलरीजचे सेवन करता. 

कोण म्हणतं फक्त बदामातून प्रोटीन मिळतं? मूठभर शेंगदाणे रोज खा, भरपूर कॅल्शियम मिळेल

रात्रीच्या जेवणात चपाती आणि भात खाऊ नका

तांदूळ आणि चपाती या दोन्हींमध्ये कार्ब्स असतात. रात्री कार्ब्सयुक्त पदार्थ खाल्ल्याने  ब्लोटींगशिवाय वजन वाढूही शकता.  म्हणूनच नेहमी ताजा शिजवलेलाच भात खायला हवा. शिळा भात खाल्ल्याने सर्दी, खोकला यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर  व्हाईट राईसऐवजी ब्राऊन राईसचा आहारात समावेश करा. यातून तुम्हाला जास्त फायबर्स मिळतील. ओव्हरवेट असलेल्यांनी रात्रीच्या जेवणात चुकूनही भात खाऊ नये. 

संध्याकाळी ७ च्या आधी जेवा

अभ्यासनुसार उशिरा जेवल्याने फक्त वजन वाढत नाही तर ब्लड शुगर लेव्हलही वाढते. उशीरा जेवल्याने शरीराची फॅट्स  बर्न करण्याची क्षमता कमी होते.  लवकर जेवल्याने शरीरातील फॅट्स एनर्जीत कन्वर्ट होतात. रात्री वेळेवर न जेवल्यामुळे एसिडीटीसुद्धा होऊ शकते. 

Web Title: Ramdev Baba says do 4 things in the morning and evening, you will get slim-fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.