बॉलीवूडच्या क्युट कपलमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) यांचा समावेश आहे. हे दोघेही लवकर आई - बाबा होणार आहेत. एकीकडे रणवीर आपल्या घरात नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी सज्ज झाला आहे तर, दुसरीकडे आगामी चित्रपटासाठी रणवीर वजन वाढवताना दिसत आहे (Weight Gain). अलीकडेच शोभा डे यांनी तिच्या इन्स्टाग्रामवर रणवीर सिंहसोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे.
शोभा डे यांच्या म्हणण्यानुसार, रणवीरला त्याच्या नवीन प्रोजेक्टसाठी १५ किलो वजन वाढवायचे आहे (Health Care). यासाठी तो आपल्या आहारात कार्ब्सचा समावेश करीत आहे. काही पुरुषांना वजन वाढवणं कठीण जातं. जर आपल्याला रणवीर सिंहप्रमाणे वजन वाढवायचं असेल तर, आहारात आणि जीवनशैलीत काही बदल करा. वजन नक्कीच वाढेल(Ranveer Singh to gain 15 kgs for his next project).
पुरुषांना वजन वाढवण्यात अडचणी का येतात?
जरा चाललं की लगेच दम लागतो? रोज खा ५ पैकी १ पदार्थ; वाढेल स्टॅमिना - हाडंही राहतील मजबूत
मॉलिक्युलर मेटाबोलिझम जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, पुरुषांपेक्षा महिलांचे वजन झपाट्याने वाढते. रिसर्चनुसार, आपल्या कॅलरीज इनटेकवर मेंदू कण्ट्रोल करते. मेंदूच्या या भागातील पेशी ओपियोमेलानोकोर्टिन पेप्टाइड्स नामक ब्रेन हार्मोन तयार करतात. जे आपली भूक, शारीरिक हालचाल आणि वजन कमी किंवा वाढवण्यास कण्ट्रोल ठेवतात.
कॅलरीचे सेवन वाढवा
पोषण तज्ज्ञ डॉ रचना श्रीवास्तव यांच्या मते, जर आपल्याला दोन महिन्यात वजन वाढवायचं असेल तर, दररोज २५० ते ५०० कॅलरीज इनटेक करा. यामुळे वजन वाढवण्यास मदत होऊ शकते. याशिवाय प्रोटीनचे प्रमाणही वाढवा. दररोज आपण २ ग्रॅम प्रथिनांचे सेवन करायला हवे.
डाएट प्लॅन तयार करा
आपल्या नोटबुकमध्ये डाएट प्लॅन तयार करा. यामुळे आपल्याला कधी आणि काय खायचं आहे, हे लक्षात राहील. आठवडाभर आपल्याला काय खायचं? नाश्ता, लंच आणि डिनरमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा, हे आपण त्यात लिहून ठेऊ शकता.
हेल्दी पदार्थ खा
सद्गुरू सांगतात, कुळीथ डाळ आणि उकडलेले शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे; मिळेल ताकद इतकी की..
वजन वाढवण्यासाठी हेल्दी पदार्थ खा. वजन वाढवण्य्साठी आपण आपल्या आहारात प्रथिनेयुक्त पदार्थ, फळे आणि भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश करू शकता. शिवाय जास्त कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करू शकता. चपातीऐवजी फूट फॅट पनीर पराठा आणि हलवा खाल्ल्यास वजन वाढण्यास मदत होईल.
व्यायाम करा
वजन वाढवण्यासाठी व्यायामाला आपल्याला दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवा. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे स्नायू वाढण्यास खूप मदत होते.