Lokmat Sakhi >Fitness > रश्मी देसाई जेव्हा स्वीकारते फिटनेस चॅलेंज, पहा व्हायरल व्हिडिओ - मेहनत इतकी की..

रश्मी देसाई जेव्हा स्वीकारते फिटनेस चॅलेंज, पहा व्हायरल व्हिडिओ - मेहनत इतकी की..

बारीक असणं नव्हे तर कोणत्याही गोष्टी सहजतेने, चपळतेनं करता येणं म्हणजे फिटनेस. अशा फिटनेससाठीच व्यायाम ( exercise for fitness) करायचा असतो असं म्हणणाऱ्या रश्मी देसाईचा आणखी एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत रश्मी 'लेग एक्सरसाइज' (leg exercise) करताना दिसते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2022 03:54 PM2022-08-22T15:54:10+5:302022-08-22T16:09:52+5:30

बारीक असणं नव्हे तर कोणत्याही गोष्टी सहजतेने, चपळतेनं करता येणं म्हणजे फिटनेस. अशा फिटनेससाठीच व्यायाम ( exercise for fitness) करायचा असतो असं म्हणणाऱ्या रश्मी देसाईचा आणखी एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत रश्मी 'लेग एक्सरसाइज' (leg exercise) करताना दिसते.

Rashmi Desai enjoy to accept fitness challenges . Her new exercise video gives fitness inspiration | रश्मी देसाई जेव्हा स्वीकारते फिटनेस चॅलेंज, पहा व्हायरल व्हिडिओ - मेहनत इतकी की..

रश्मी देसाई जेव्हा स्वीकारते फिटनेस चॅलेंज, पहा व्हायरल व्हिडिओ - मेहनत इतकी की..

Highlightsरश्मी देसाईच्या मते जोपर्यंत आपण एखादी गोष्ट करुन बघत नाही तोपर्यंत त्यातली गंमत कळत नाही. फिटनेस चॅलेन्जेसच्या बाबतीतही तसंच आहे. आपल्या लेग एक्सरसाइजच्या व्हिडीओद्वारे रश्मीनं पायाच्या व्यायामाकडे लक्ष वेधलं आहे.

आपल्याला जगण्याचा समरसून आनंद घेण्याचा छंद आहे असं म्हणणारी उतरन फेम अभिनेत्री रश्मी देसाई (Rashmi Desai)  कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मकतेनंच बघते. तीची ही सवय तिच्या फॅन्सला आणि इतर स्टार्सनांही खूप आवडते.  जास्त वजनामुळे  अनेकदा बाॅडी शेमिंगचा (body shaming)  सामना करावा लागत असूनही आपली फिटनेसची  (fitness) आवड आणि त्यासाठी ती घेत असलेले कष्ट तिने कधीही लपवून ठेवले नाहीत.  फिटनेसच्या बाबतीत मलायका अरोरा आणि शिल्पा शेट्टीला आपला आदर्श मानणारी रश्मी फिटनेसकडे गांभीर्यानं बघते. नवनवीन फिटनेस चॅलेन्जेस (fitness challenges)  घेत अवघड व्यायाम प्रकारही आनंदानं करते. तिच्या लेखी फिटनेस म्हणजे केवळ बारीक असणं नव्हे तर कोणत्याही गोष्टी सहजतेने, चपळतेनं करता येणं म्हणजे फिटनेस. अशा फिटनेससाठीच व्यायाम करायचा असतो असं म्हणणाऱ्या रश्मी देसाईचा आणखी एक व्हिडीओ  (Rashmi Desai viral video of leg exercise )समाज माध्यमांवर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत रश्मी 'लेग एक्सरसाइज' करताना दिसते. 

Image: Google

फिटनेस चॅलेन्जेस स्वीकारण्याची आवड असणारी रश्मी म्हणते की एखादं  फिटनेस चॅलेन्ज बघताना खूप अवघड वाटतं, पण ते करताना प्रत्यक्ष काय वाटतं, तो अनुभव कसा असतो हे जोपर्यंत आपण ती गोष्ट करुन बघत नाही तोपर्यंत कळत नाही. फिटनेस बाबतीतलं कोणतंही चॅलेन्ज हे भारीच असतं असं रश्मी मानते. फिट राहाण्यासाठी, वजन वाढू न देण्यासाठी शरीराच्या प्रत्येक अवयवाचा व्यायाम महत्वाचा असतो. आपल्या लेग एक्सरसाइजच्या व्हिडीओद्वारे रश्मीनं पायाच्या व्यायामाकडे लक्ष वेधलं आहे.

पायकडील भागात शरीरासाठी महत्वाच्या स्नायुंचा समूह असतो. शरीराच्या एकूणच फिटनेससाठी मांडी, पाय, पोटऱ्या यांचे स्नायू मजबूत असणं महत्वाचं असतं. शरीराची लवचिकता वाढण्यासाठी पायाच्या स्नायुंचा व्यायाम होणं महत्वाचं असतं. पायाचे विशिष्ट व्यायाम करुन पायाचे स्नायू मजबूत आणि लवचिक करता येतात. कंबरेखालचा शरीराचा भाग मजबूत होण्यासाठी पायाचे व्यायाम महत्वाचे असतात, रश्मी देसाई फिटनेस वाढवण्यासाठी आणि पायाचे स्नायू मजबूत करण्यासाठी लेग एक्सरसाईजेस करताना दिसते. या व्हिडीओला तिने ' मी टू मी; नो पेन नो गेन' अशी कॅप्शन दिली आहे. 

Image: Google

रोजचा व्यायाम कधी तोच तोचपणामुळे कंटाळवाणा वाटतो तर कधी व्यायाम करण्याला प्रेरणाच मिळत नाही. अशा वेळेस सेलिब्रेटींचे एक्सरसाइज व्हिडीओ बघून व्यायाम करण्याची प्रेरणा तर मिळ्तेच सोबतच व्यायामाचे नवनवीन प्रकारही कळतात. रश्मी देसाईचा लेग एक्सरसाइजचा व्हिडीओ असाच पाहाणाऱ्याला प्रेरणा देणारा आणि नवीन काही शिकवणारा आहे.

Web Title: Rashmi Desai enjoy to accept fitness challenges . Her new exercise video gives fitness inspiration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.