Lokmat Sakhi >Fitness > रश्मिका मंदानाचा डाएट- वर्कआऊट प्लॅन; तिच्या सौंदर्याचं खास सिक्रेट

रश्मिका मंदानाचा डाएट- वर्कआऊट प्लॅन; तिच्या सौंदर्याचं खास सिक्रेट

Fitness tips: दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिची सध्या जबरदस्त क्रेझ आहे... म्हणूनच तर तिचा डाएट प्लॅन, वर्कआऊट सेशन, स्किन केअर रुटीन याबाबत माहिती घेण्यासाठी अनेक जण उत्सूक असतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 07:30 PM2022-01-27T19:30:19+5:302022-01-27T19:48:49+5:30

Fitness tips: दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिची सध्या जबरदस्त क्रेझ आहे... म्हणूनच तर तिचा डाएट प्लॅन, वर्कआऊट सेशन, स्किन केअर रुटीन याबाबत माहिती घेण्यासाठी अनेक जण उत्सूक असतात..

Rashmika Mandana's Diet - Workout Plan; A special secret of her beauty | रश्मिका मंदानाचा डाएट- वर्कआऊट प्लॅन; तिच्या सौंदर्याचं खास सिक्रेट

रश्मिका मंदानाचा डाएट- वर्कआऊट प्लॅन; तिच्या सौंदर्याचं खास सिक्रेट

Highlightsरश्मिकाचा डाएट आणि वर्कआऊट प्लॅन नुकताच सोशल मिडियावर व्हायरल झाला असून यातच तिच्या सौंदर्याचं सिक्रेट दडलेलं आहे. 

गोड हास्य, जबरदस्त फिटनेस आणि प्रगल्भ अभिनय यामुळे दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे. सध्या काही चित्रपटांमुळे रश्मिका सोशल मिडियावर जबरदस्त चर्चेत असून तिच्या विषयी माहिती घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सूक असतात. बॉलीवूडच्या इतर अभिनेत्रींप्रमाणेच रश्मिकाही तिच्या फिटनेस आणि डाएटविषयी कमालीची आग्रही असते. अर्थात त्यामुळेच तर तिचे सौंदर्य आणि तिची ग्लोईंग स्किन (glowing skin) हे तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचे विषय ठरतात. रश्मिकाचा डाएट आणि वर्कआऊट प्लॅन नुकताच सोशल मिडियावर व्हायरल झाला असून यातच तिच्या सौंदर्याचं सिक्रेट दडलेलं आहे. 

 

१. फिटनेससाठी असं वर्कआऊट करते रश्मिका...(workout plan of actress Rashmika Mandanna )
स्लिम आणि झीरो फिगर असणं हे रश्मिकाला मान्य नाही. तिला वाटतं की स्लिम राहण्यापेक्षा आपण निरोगी आणि सशक्त असणं अधिक गरजेचं आहे. हा उद्देश समोर ठेवूनच तिने तिचं वर्कआऊट प्लॅन केलं आहे. किकबॉक्सिंग, दोरीवरच्या उड्या, नृत्य किंवा एरोबिक्स, स्विमिंग, योगा आणि वॉकींग हे सगळे व्यायाम प्रकार ती आलटून पालटून प्रत्येक आठवड्यात करत असते. कार्डिओ हेल्थसाठी ती वेटलिफ्टिंग देखील करते. वॉर्मअप, हिप थ्रस्ट्स, हाफ नीलिंग बँड रो, मेडिसीन बॉल स्लॅम, बेंच पुशअप्स, डंबेल्स असे व्यायाम करण्यावर तिचा भर असतो. 

 

२. रश्मिकाचा डाएट प्लॅन (diet plan of actress Rashmika Mandanna)
रश्मिका तिच्या डाएटबाबतही अतिशय पर्टीक्युलर आहे. ती हल्ली पुर्णपणे शाकाहारी डाएट प्लॅन फॉलो करत असते. रोज सकाळी नियमितपणे ती कोमट पाणी घेऊनच दिवसाची सुरुवात करते. काकडी, बटाटे, सिमला मिरची आणि टोमॅटो या पदार्थांची तिचा ॲलर्जी असल्याने ती हे पदार्थ खाणे टाळते. भरपूर पाणी पिणे हे मात्र ती अगदी कटाक्षाने पाळते. तिचे दुपारचे जेवण साऊथ इंडियन पद्धतीचे असते. त्यात ती भात खाणे टाळते. तसेच भाज्यांचे सूप आणि फळे हे तिचे रात्रीचे डाएट असते. 

 

३. रश्मिकाचे स्किन केअर रुटीनही आहे खास (skin care routine of actress Rashmika Mandanna)
आहार, व्यायाम यातून रश्मिका तिचे सौंदर्य जपण्याचा प्रयत्न तर करतेच. पण त्यासोबतच ती काही ब्यूटी टिप्सही नियमितपणे फॉलो करते. सर्वसामान्य तरूणींनाही रश्मिकाप्रमाणे स्किन केअर रुटीन फॉलो करता येईल, एवढे ते सोपे आणि सहज जमण्यासारखे आहे. रात्री झोपण्यापुर्वी क्लिनिंग, टोनिंग आणि मॉईश्चरायझिंग या ३ गोष्टी ती नियमितपणे करत असते. जेवढे काही नैसर्गिक सौंदर्योपचार आहेत, ते करायला रश्मिकाला विशेष आवडते आणि नैसर्गिक उपायांवर तिचा विश्वासही आहे 
 
 

Web Title: Rashmika Mandana's Diet - Workout Plan; A special secret of her beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.