हाडांमधून किंवा सांध्यांमधून (Bone Cracking Sound) आवाज येणं खूप कॉमन आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हाडांचा गंभीर आजार आहे. असा आवाज येण्याची अनेक कारणं असू शकतात. २०१८ च्या एका अभ्यासानुसार सांध्यांमधून असा आवाज येण्यामागे अनेक वैज्ञानिक कारणं असू शकतात. (Bone Cracking Sound Or Joint Popping) एक्सपर्ट्स सांगतात की वाढत्या वयात हाडांमधून असा आवाज येण्याचं प्रमाण वाढू शकतं. याचं कारण असं की वाढत्या वयात काही कार्टिलेज खराब होऊ लागतात. अनेकदा या वेदना, सूजेसह उद्भवतात. अशा स्थितीत डॉक्टरांशी संपर्क साधणं उत्तम ठरतं. (Reasons For Bone Cracking Sound Or Joint Popping And Their Treatment And Home Remedies)
हाडांमधून असा आवज येण्याला क्रॅकिंग किंवा पॉपिंग असं म्हणतात. मेडीकल परिभाषेत याला क्रेपिटस असंही म्हटलं जातं (Ref). २०१७ मध्ये छोट्या अध्ययनात संयुक्त राज्य अमेरिकेत २५ टक्क्यांपैकी ४५ टक्के अशा केसेस पाहायला मिळाल्या. ज्यांच्या हाडांमधून असा आवाज येतो त्यांना इतर समस्या उद्भवण्याचा धोका असतो.
यावर उपाय काय
जर तुम्हाला बोट मोडण्याची सवय असेल तर असं करणं टाळायला हवं. कमीत कमी लक्ष बोटांकडे हवं. फिजिकल एक्टिव्हीज करून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. जर तुम्ही जास्तवेळ उभं राहत असाल किंवा जास्त वेळ बसत असाल तर सांध्यांमधून असा आवाज येऊ शकतो. चालण्यासाठी सतत ब्रेक घ्या. जर तुम्ही पूर्ण दिवस डेस्कवर बसत असाल तर कमीत कमी अर्ध्या तासातून एकदा उठा. या त्रासापासून बचावाचा प्रभावी उपाय म्हणजे स्ट्रेचिंग, तुम्ही स्ट्रेचिंग करून सांधेदुखीच्या वेदना कमी करू शकता.
रोज काहीवेळ स्ट्रेचिंग एक्सरसाईज केल्यानं हाडं चांगली राहतात. ताण-तणाव कमी करण्यासाठी दीर्घ श्वास घ्या. ध्यान करणं किंवा स्ट्रेस बॉलचा आधार घेणं यांसारखे उपाय करायला हवे. हेल्दी आणि फिट राहण्यासाठी दर आठवड्याला १५० मिनिटं व्यायाम करण्याच्या प्रयत्न करायला हवा. आपलं वय आणि जीवनशैली अनुकूल असे पाहा. शारीरिक व्यायाम, घरकाम, बागकाम किंवा वॉकिंग तुमच्या दिनचर्येचा भाग असायला हवं.