Lokmat Sakhi >Fitness > काय बिघडलं रात्री व्यायाम केला तर? फायदा नाही नुकसानच होईल कारण रात्री व्यायाम केल्यानं...

काय बिघडलं रात्री व्यायाम केला तर? फायदा नाही नुकसानच होईल कारण रात्री व्यायाम केल्यानं...

What are the side effects of working out at night : लेट नाईट एक्सरसाईज करण्याची सवय वाईट, फायद्या ऐवजी होईल नुकसान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2024 07:08 PM2024-07-16T19:08:35+5:302024-07-16T19:19:27+5:30

What are the side effects of working out at night : लेट नाईट एक्सरसाईज करण्याची सवय वाईट, फायद्या ऐवजी होईल नुकसान...

reasons why you should not exercise before going to bed What are the side effects of working out at night | काय बिघडलं रात्री व्यायाम केला तर? फायदा नाही नुकसानच होईल कारण रात्री व्यायाम केल्यानं...

काय बिघडलं रात्री व्यायाम केला तर? फायदा नाही नुकसानच होईल कारण रात्री व्यायाम केल्यानं...

सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये आपल्याला फिटनेस, आरोग्याकडे एकूणच स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. रोजच्या डेली रुटीनमध्ये आपण इतके बिझी असतो की आपण स्वतःच्या शरीराची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतो. स्वतःला निरोगी राहण्यासाठी शरीराला योग्य आहार आणि व्यायामाची (Excercise) गरज असते. यासाठी आपल्यापैकी अनेकजण फिट राहण्यासाठी आपल्या बिझी शेड्युल मधून थोडासा वेळ काढतात. या दिवसभराच्या बिझी लाईफस्टाईलमुळे आपल्याला व्यायाम करण्यासाठी पुरेसा असा वेळच नसतो. अशावेळी काहीजण आपल्या सोयीनुसार वेळ मिळेल (Is it bad to exercise late at night) तसा व्यायाम करणे पसंत करतात. 

काहीजण ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी जिमला जातात. तसेच काहीजण आपले बिझी रुटीन उशिरा पर्यंत संपवून मग व्यायाम करतात. परंतु दिवसांतील अशा कोणत्याही वेळी व्यायाम करणे योग्य की अयोग्य ? बहुतेकजणांना आपले काम संपवून रात्री व्यायाम करण्याची सवय असते. परंतु रात्रीच्या वेळी - अवेळी  असा कधीही व्यायाम करणे आपल्या (What are the side effects of working out at night) शरीरासाठी योग्य नसते. रात्रीच्या वेळी असा व्यायाम केल्याने शरीराला त्याचे फायदे होण्याऐवजी नुकसानच भरपूर होऊ शकते. रात्री व्यायाम केल्याने त्याचे आपल्या शरीरावर अनेक वाईट परिणाम होऊन, अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रात्री लेट नाईट व्यायाम केल्याने नेमके काय होते ते पाहूयात(reasons why you should not exercise before going to bed).

रात्री एक्सरसाइज केल्याने काय होते ? 

१. रात्रीच्या झोपेत व्यत्यय :- रात्री एक्सरसाइज केल्याने सगळ्यात आधी त्याचा वाईट परिणाम आपल्या झोपेवर होऊ शकतो. रात्री उशिरा एक्सरसाइज  केल्याने शरीरातील एड्रेनालिन आणि कोर्टिसोलची पातळी वाढू शकते, ज्यामुळे तुम्हाला रात्री झोप लागणे कठीण होते आणि यामुळे तुमच्या रात्रीच्या झोपेत अनेक अडथळे येऊ शकतात. 

२. शारीरिक थकवा जाणवतो :- रात्रीच्या वेळी एक्सरसाइज केल्याने आपले शरीर अधिक जास्त प्रमाणात थकते. ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी अधिक जास्त प्रमाणात थकवा जाणवू शकतो. याचबरोबर सुस्त, आळस आल्यासारखे वाटू शकते. याचा तुमच्या डेली रुटींवर परिणाम होऊ शकतो. 

राधिका मर्चण्टची मेकअप आर्टिस्ट सांगतेय योगाचा एक भन्नाट प्रकार, आजार राहतील लांब-मूडही होतो छान...

३. पचन समस्या कमकुवत होऊ शकते :- रात्री एक्सरसाइज केल्याने पचनसंस्थेवरही खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे आम्लपित्त, अपचन आणि पचनासंबंधित इतर समस्या निर्माण होतात. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही होऊ शकतो.

४. हार्मोनल इम्बॅलेन्स :- रात्री उशिरा एक्सरसाइज केल्याने हार्मोनल असंतुलन होऊ शकते. शरीरातील हार्मोन्सची पातळी बिघडू शकते. यामुळे तुमच्या रात्रीच्या झोपेत तसेच तुमच्या वागण्यात किंवा मूडमध्ये अनेक बदल होऊ शकतात. 

५. मानसिक ताण :-  रात्री उशिरा एक्सरसाइज केल्याने मानसिक ताण वाढू शकतो, ज्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

विराट कोहलीला आवडते तसे ‘प्रोटीन सॅलेड’ करा, वजन राहते नियंत्रणात आणि पचायला हलके-पौष्टिकही...

Web Title: reasons why you should not exercise before going to bed What are the side effects of working out at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.