Lokmat Sakhi >Fitness > करा रोज फक्त १ आसन, स्किनवर ग्लो - मासिक पाळीचा त्रास होईल कमी...

करा रोज फक्त १ आसन, स्किनवर ग्लो - मासिक पाळीचा त्रास होईल कमी...

All You Need To Know About Surya Namaskar And Its Health Benefits : योग्य पद्धतीने सूर्य नमस्कार केल्यास त्याचा आपल्याला नेमका काय फायदा होतो ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2023 09:20 AM2023-06-04T09:20:00+5:302023-06-04T09:20:01+5:30

All You Need To Know About Surya Namaskar And Its Health Benefits : योग्य पद्धतीने सूर्य नमस्कार केल्यास त्याचा आपल्याला नेमका काय फायदा होतो ?

Reasons Why You Should Perform Surya Namaskar Daily | करा रोज फक्त १ आसन, स्किनवर ग्लो - मासिक पाळीचा त्रास होईल कमी...

करा रोज फक्त १ आसन, स्किनवर ग्लो - मासिक पाळीचा त्रास होईल कमी...

सूर्यनमस्कार हा बारा योगासनांनी बनलेला एक योग प्रकार आहे. सूर्यनमस्काराच्या बारा योगासनांचा नियमितपणे सराव केल्याने आपले मन सक्रिय आणि एकाग्र होते. सूर्यनमस्काराला सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार असे म्हणतात. या मध्ये सूर्यनारायणाची उपासना आहे म्हणजेच प्रत्येक नमस्कार घालताना सूर्यनारायणाचे नाव घेतले जाते. त्याचबरोबर यामध्ये वेगवेगळ्या आसनांची मालिकाच असते. सूर्यनमस्कार हे घरातील प्रत्येक व्यक्ती स्त्री, पुरुष अशा सर्वांकरिता अतिशय उपयुक्त आहेत.

सूर्यनमस्काराचे महत्व आणि फायदे काय आहेत हे आपण प्रत्येकानेच आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींकडून ऐकले असतील. आजकाल आपल्याला फिट राहण्यासाठी जिममध्ये मशीन एक्सरसाइज सोबत सूर्यनमस्कार घालण्याचे सल्ले दिले जातात. सुर्यनमस्कार घालणे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी एक उत्तम व्यायाम मानला जातो. रोज सकाळी झोपेतून उठल्यावर अनशापोटी सूर्यासमोर मोकळया पटांगणात सूर्यनमस्कार करायला हवा. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी आपल्याला वेळ मिळत नाही, अशी तक्रार केली जाते. अशा वेळी किमान सूर्यनमस्कार घातले तरी त्याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी होतो. सूर्यनमस्कार घालण्यासाठी सराव फार महत्त्वाचा असतो. किती सूर्यनमस्कार घातले यापेक्षा त्यातील प्रत्येक आसन किती अचूकपणे केली आहेत हे पाहणे महत्त्वाचे असते. घाईघाईने सूर्यनमस्कार आटोपून मोकळे होण्याऐवजी त्यातील नेमकेपणा अंगी बाणवणे गरजेचे असते(All You Need To Know About Surya Namaskar And Its Health Benefits).
 
योग्य पद्धतीने सूर्य नमस्कार केल्यास त्याचा आपल्याला नेमका काय फायदा होतो ? 

१. स्किन ग्लो :- दररोज सूर्यनमस्कार केल्याने आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाला चालना मिळते. ज्यामुळे आपली त्वचा आणि चेहेऱ्याची चमक परत येते. वाढत्या वयानुसार चेहेऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे टाळण्यासाठी रोज सूर्यनमस्कार घालणे फायद्याचे ठरते असेही म्हटले जाते. वयाचा प्रभाव चेहेऱ्यावर कमी दिसावा असे वाटत असेल तर सूर्यनमस्कार नियमित करावेत.

कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच....

२. पचनक्रिया सुरळीत चालण्यास मदत होते :- सूर्यनमस्कारामुळे पचनक्रिया सुरळीत चालण्यास मदत होते. तसेच, ते पचनसंस्थेत रक्तप्रवाह वाढवण्याचे काम करते. यामुळे आतड्यांचे कार्य देखील सुधारते. सूर्यनमस्कार घालत असताना पोट आणि पोटांच्या स्नायूंवर बराचसा ताण पडतो, यामुळे जर आपल्याला गॅस, बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर हा योग प्रकार नियमित न चुकता करावा.

३. मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त :- जर आपल्याला स्वतःचे मानसिक आरोग्य सुधारायचे असेल तर सूर्य नमस्कार नियमित घालावेत. यामुळे आपल्याला  शारीरिक स्वरुपातच नाही तर तुमच्या मानसिक स्वरुपातही फरक झालेला दिसेल. हे योगासन केल्याने मज्जासंस्था, मानसिक व शारीरिक स्वास्थ सुधारण्यास उपयुक्त ठरते. आपल्या डोक्यातील व मनातील दिवसभराचा ताण - तणाव, चिंता, स्ट्रेस यांपासून दूर ठेवण्यास हे असं फायदेशीर ठरते. 

सूर्यनमस्कार घालतााना श्वास नेमका कधी घ्यावा, कधी सोडावा? पाहा व्हिडिओ...

व्यायाम केल्यानंतर कोणते हेल्दी ड्रिंक पिणे फायद्याचे? भाग्यश्री सांगते तिचे खास सिक्रेट ड्रिंक....

४. स्त्रियांच्या मासिक पाळीत फायदेशीर ठरते :- सूर्यनमस्कारामुळे मासिक पाळीचे चांगले नियमन होण्यासही मदत होते. हे आसन केल्याने ओटीपोटाचे स्नायू मजबूत होतात आणि मासिक पाळीतील वेदना देखील कमी करते. यासाठी तुम्हाला फक्त सकाळी थोडे लवकर उठून योग्य पद्धतीने हे आसन करावे लागेल. यामुळे मासिक पाळीच्या काळात पोटात दुखण्याच्या समस्येपासून आराम तर मिळेलच पण रक्तप्रवाहही सुरळीत होईल.

सूर्यनमस्कार कोणी-कधी- कसे करावेत? मनाला वाट्टेल तेव्हा घातले सूर्यनमस्कार तर...

Web Title: Reasons Why You Should Perform Surya Namaskar Daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.