Lokmat Sakhi >Fitness > कोरोनानंतर लवकर रिकव्हरी व्हायला हवी, एनर्जी वाढायला हवी तर नियमित करा ३ आसनं

कोरोनानंतर लवकर रिकव्हरी व्हायला हवी, एनर्जी वाढायला हवी तर नियमित करा ३ आसनं

आजारपणातून उठल्यावर येणारा थकवा घालवण्यासाठी अगदी कमी वेळात होणारी सोपी आसने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2022 02:32 PM2022-01-31T14:32:16+5:302022-01-31T14:39:33+5:30

आजारपणातून उठल्यावर येणारा थकवा घालवण्यासाठी अगदी कमी वेळात होणारी सोपी आसने...

Recovery should be done soon after corona, if you want to increase energy, do 3 asanas regularly | कोरोनानंतर लवकर रिकव्हरी व्हायला हवी, एनर्जी वाढायला हवी तर नियमित करा ३ आसनं

कोरोनानंतर लवकर रिकव्हरी व्हायला हवी, एनर्जी वाढायला हवी तर नियमित करा ३ आसनं

Highlightsआजारपणामुळे आलेला थकवा घालवण्यासाठी करा सोपी आसनेघरच्या घरी कोणत्याही वेळेत करता येतील अशा आसने करा आणि तंदुरुस्त राहा...

नवीन वर्षाचा पहिला महिने संपत आला तसे अनेकांचे व्यायाम कऱण्याचे संकल्पही मागे पडले. सर्दी, खोकला, ताप (Viral infections) यांसारख्या संसर्गाने आणि ओमायक्रॉनमुळे (omicron) आपल्यातील अनेकांना हैराण करुन सोडले. घरोघरी बरेच जण या समस्यांनी त्रस्त असल्याने व्यायाम एव्हाना बराच मागे पडला असेल. पण या आजारांतून लवकर बाहेर यायचे असेल आणि आपली नेहमीची एनर्जी पुन्हा मिळवायची असेल तर घरच्या घरी अगदी कमी वेळात करता येतील असे व्यायामप्रकार आपण नक्कीच करु शकतो. यामुळे नव्या उत्साहाने आपण कामाला लागू शकतो, इतकेच नाही आजारपणामुळे आपली गेलेली ताकद पुन्हा मिळण्यासही नक्कीच मदत होईल.

सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) या सोशल मिडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असतात. आपल्या फॅन्सना त्या आहार आणि व्यायामाविषयी वेगवेगळी माहिती देत त्या नेहमीच गाईड करत असतात. तुकतीच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टद्वारे त्यांनी अगदी कमी वेळात होऊ शकतील अशी तीन आसने सांगितली आहेत. नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांनी १२ आठवड्यांचा फिटनेस प्रोजेक्ट जाहीर केला असून त्यातील ४ थ्या आठवड्याचा व्हिडिओ ऋजुता यांनी नुकताच पोस्ट केला. आपल्याला सध्या जाणवत असलेली वेगवेगळी दुखणी दूर करण्यासाठी तसेच आजारपणाचे फिलिंग कमी करण्यासाठीचे अतिशय महत्त्वपूर्ण व्यायाम (Excersises) त्यांनी यामध्ये सांगितले आहेत. विशेषत: ज्या महिलांना PCOD, थायरॉईड यांसारख्या समस्या आहेत त्यांनी ही आसने (Yoga) आवर्जून करायला हवीत. वर्क फ्रॉम होममुळेही ज्यांची पाठ, मान, पाय दुखतात त्यांच्यासाठीही ही आसने अतिशय उत्तम उपाय ठरु शकतात. पाहूयात ही आसने कोणती....

(Image : Google)
(Image : Google)

१. जमिनीवर किंवा बेडवर मांडी घालून पाठ टेकवून बसा. त्यानंतर दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन स्ट्रेचिंग करा. पृष्ठभाग जमिनीवरुन वर उचलण्याचा प्रयत्न करा. पोट, छाती हा भाग वरच्या दिशेने उचलण्याचा प्रयत्न करा आणि पाठीचा भाग खालच्या दिशेने स्ट्रेच होईल असे करा. हात बाजूला घेऊन मागे स्ट्रेच करा. अशापद्धतीने किमान ५ मिनिटे बसा.

२. आहात त्याच पोझिशनमध्ये गुडघ्याच्या खाली हात घालून पाय गुडघ्यातून दुमडा. दोन्ही पावले एकमेकांना जोडून घ्या. पावले बाहेरच्या बाजूला उघडल्यासारखी करा. गुडघे जमिनीला किंवा गादीवर टेकलेले राहतील याची काळजी घ्या. या आसनातही छातीचा भाग मागच्या बाजूला ताणा. यामध्ये तुम्हाला गुडघे किंवा मांड्यांमध्ये क्रॅम्प आल्यासारखे वाटत असेल तर त्याखाली उशी घेऊन सपोर्ट द्या. 

३. आजारपणानंतर किंवा एरवीही आपली पाठ खूप दुखते. त्यामुळे पाठीला आराम मिळावा यासाठी एक व्यायाम अतिशय गरजेचा आहे. तो म्हणजे पाठीवर झोपावे. दोन्ही पाय सोफा, बेड, खुर्ची यांच्यावर ठेवावेत. यातही मांड्यांचा भाग बेड किंवा सोफा याला समांतर असेल असे ठेवावेत. अनेकदा आपण पाय सरळ ठेऊन झोपतो तेव्हा आपल्या पाठीचा मधला भाग म्हणजेच कंबरेचा भाग वर उचललेला असल्याने तो जास्त दुखतो. पण या आसनामध्ये कंबरेच्या भागाला आराम मिळण्यास मदत होते. 

Web Title: Recovery should be done soon after corona, if you want to increase energy, do 3 asanas regularly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.