वजन कमी करण्याासाठी लोक बरीच मेहनत घेतात. व्यायाम, डाएटमध्ये बदल करण्याव्यतिरिक्त इतरही उपाय सुरूच असतात. पण वजन कमी करण्यासाठी सगळ्यात आधी तुमचा बॉडी टाईप समजून घेणं गरजेचं आहे. बॉडी टाईपनुसार व्यायाम आणि डाएटची निवड केल्यास तुम्हाला चांगेल परीणाम दिसून येतील. (Weight loss Tips) वजन कमी करताना काही चुका केल्यानं वजन कमी करणं कठीण होतं.
वजन कमी करण्यासाठी वॉक करणं कितपत योग्य ठरतं वॉक केल्यानं खरंच वजन कमी होतं का असे प्रश्न लोक विचारतात. (Walking for weight loss 8 tips to burn fat) न्युट्रिशनिस्ट आणि लाईफस्टाईल कोच सिमरन कौर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Right way of walking for weight loss by expert)
१) फक्त रोज चालायला जाता म्हणजे तुमचं वजन कमी होईल असं अजिबात नाही. यासाठी चालण्याचा वेग, नियमितासुद्धा लक्षात घ्यायला हवी. वॉकींगचा डेली रुटीनमध्ये समावेश करा. याशिवाय डाएट आणि व्यायामसुद्धा करा. दिवसभरात कमीत ४ हजार ते ५ हजार पाऊलं चालण्याची सवय ठेवा. जास्त वेगानं वॉक करू नका किंवा जास्त हळूही चालू नका. वॉक करताना एकाच गतीत वॉक केल्यानंतर हळूहळू वेग वाढवा.
एक्सपर्ट्सच्या मते योग्य परीणामांसाठी आठवड्यातून कमीत कमी १५० मिनिटं वॉक करायला हवं. जर तुम्ही किती वजन किती कमी करायचं हे आधीच ठरवलं असेल तर रोज १०००० पाऊलं चालण्याचा प्रयत्न करा. सकाळी किंवा संध्याकाळी कधीही तुम्ही वॉक करू शकता. तुमच्या सोयीनुसार चालण्याची सवय ठेवा. अन्न खाल्ल्यानंतर काही पावले चालणे देखील खूप महत्वाचे आहे. हे पचन सुधारते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते.
शरीर सडपातळ पण पोट सुटत चाल्लंय? दिवसभरात 'या' ५ चुका टाळा; स्लिम- मेंटेन राहाल
चालण्याने तणाव देखील दूर होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते. वॉक करण्यासाठी तुम्ही उंच रस्त्याची निवड करू शकता. वॉक करण्याआधी ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी प्या. रोज ६ हजार ते १० हजार पाऊलं चाला. रोज चालल्यानं फक्त वजन कमी होत नाही तर ब्लड शुगर लेव्हलही नियंत्रणात राहते.