Join us  

रोज वॉक करता तरी वजन कमी होतच नाही? पाहा चालण्याची योग्य पद्धत, भराभर वजन कमी होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 8:38 AM

How To Walk For Weight Loss : वेट लॉसबाबत लोकांच्या मनात  बरेच प्रश्न असतात वजन कमी करण्यादरम्यान काही चुका केल्यास तब्येतीवर याचा चुकीचा परिणाम होतो.

ब्रिस्क वॉक असो किंवा पायी चालणं दोन्ही वेळेस पोश्चर योग्य असणं गरजेचं असतं. जितकं वेगानं चालाल  शरीराचा तितकाच फायदा होतो.  शारीरिक क्षमतेनुसार पायी चाला. पायी चालणं हा उत्तम व्यायाम आहे. पायी चालल्यानं ९० टक्के फायदे मिळतात. (Health Tips) चालल्यामुळे योग्य मुव्हमेंट होते आणि स्ट्रेचिंगसुद्धा होते. ज्यामुळे शरीराला  फायदे मिळतात.  वेट लॉसबाबत लोकांच्या मनात  बरेच प्रश्न असतात वजन कमी करण्यादरम्यान काही चुका केल्यास तब्येतीवर याचा चुकीचा परिणाम होतो. न्युट्रिशनिस्ट सिमरन कौर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (How To Walk For Weight Loss)

वजन कमी करण्यासाठी चालणे चांगले आहे पण फक्त चालल्याने वजन कमी करता येत नाही. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये रोज चालण्याचा समावेश करा पण आहार आणि व्यायामाचीही काळजी घ्या. दिवसातून किमान 4000-5000 पावले चालण्याचा प्रयत्न करा. योग्य आणि चांगल्या परिणामांसाठी, चालताना वेगवान गती राखा, म्हणजेच तुम्ही खूप वेगाने चालू नका किंवा खूप हळू चालू नका.

1) चालताना ठराविक गतीनेच चालावे. तज्ञांच्या मते, सर्वोत्तम परिणामांसाठी तुम्ही दर आठवड्याला सुमारे 150 मिनिटे चालले पाहिजे.

2) जर तुम्ही स्वतःसाठी वजन कमी करण्याचे ध्येय ठेवले असेल किंवा तुम्हाला कमी वेळेत जास्त वजन कमी करायचे असेल तर तुम्ही दररोज 10,000 पावले चालण्याचा प्रयत्न करा.

3) सकाळ आणि संध्याकाळ हे दोन्ही वेळा चालण्यासाठी उत्तम मानल्या जातात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही चालू शकता.

4) खाल्ल्यानंतर काही पावले चालणे खूप महत्वाचे आहे. हे पचन सुधारते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते.

5) चालण्याने तणाव देखील कमी होतो आणि मानसिक आरोग्य देखील सुधारते.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य