Chia Seeds Water : 2024 मध्ये फिटनेस आणि हेल्थ विश्वात चिया सीड्सची चांगलीच चर्चा झाली. लोक गुगलवरही चिया सीड्सचं पाणी कसं बनवतात हे शोधत होते. कारण चिया सीड्स पौष्टिक असण्यासोबतच वजन कमी करण्यास मदत करतात. जर तुम्हीही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तर चिया सीड्स पाणी तयार करण्याची योग्य पद्धत जाणून घेतली पाहिजे. चिया सीड्सच्या मदतीने हाडं मजूबत होण्यासही मदत मिळते.
चिया सीड्सच्या पाण्यात दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे चिया सीड्स दुसरी म्हणजे पाणी. चिया सीड्समध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्यात प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, फॉस्पोरस, आयर्न, मॅग्नेशिअम, झिंक आणि व्हिटॅमिन बी यांचा समावेश आहे.
चिया सीड्सचं पाणी एक हेल्दी आणि पॉवरफुल ड्रिंक आहे. जगभरातील लोक याची रेसिपी शोधत आहे. यावर्षी गुगलच्या इअर सर्च २०२४ च्या ग्लोबल फूड अॅन्ड ड्रिंक रेसिपीमध्ये हे सातव्या स्थानावर आहे.
हे पाणी बनवताना काय चूक करू नये?
जास्तीत जास्त लोक चिया सीड्सचं पाणी बनवताना काही चुका करतात. जसे की, जास्त चिया सीड्सचं वापर करणं, पाणी कमी घेणं किंवा जास्त वेळ भिजवून ठेवणं. असं केल्याने ते हेल्दी राहत नाही आणि फायदेशीरही होत नाही.
चिया सीड्सचं पाणी बनवण्याची योग्य पद्धत
ग्लासमध्ये १ कप किंवा साधारण २५० मिली पाणी घ्या. यात एक ते दोन चमचे चिया सीड्स टाका. नंतर चमच्याने पाण्यात चांगल्याप्रकारे मिक्स करा. हे भिजवण्यासाठी केवळ दोन मिनिटेच पुरेसे आहेत. जास्तवेळ भिजवून ठेवाल तर चिया सीड्स जास्त फुगतील आणि चांगले लागणार नाही.
चिया सीड्सचं पाणी पिण्याची योग्य पद्धत
जर चिया सीड्सचं पाणी पित असाल तर तुम्हाला योग्य पद्धत माहीत असली पाहिजे. हे पाणी सकाळी किंवा दुपारी पिणं फायदेशीर मानलं जातं. सोबतच दिवसभर साधं पाणीही पित रहा. कारण याने पोटातील आणि आतड्यांमधील पाणी शोषलं जातं. ज्यामुळे बद्धकोष्ठता किंवा पोटदुखीची समस्या होऊ शकते.
वजन होईल कमी
चिया सीड्सचं पाणी एक चांगलं वेट लॉस ड्रिंक आहे. National Center For Biotechnology Information च्या एका शोधानुसार, याने पोट दिवसभर भरलेलं राहतं. ज्यामुळे कॅलरी इनटेक कमी होतं. जर तुम्ही योग्य डाएट आणि फिजिकल रूटीनसोबत याचं सेवन कराल तर वजन वेगाने कमी होण्यास मदत मिळेल.
हाडं होतील मजबूत
चिया सीड्समध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. सोबतच यातून अल्फा लिनोलेनिक अॅसिडही मिळतं. हे दोन्ही पोषक तत्व हाडं मजबूत करण्यास मदत करतात. हे दोन तत्व कमी झाले तर हाडं कमजोर होऊ शकतात.