दिवसभरात तुम्ही कितीही बिझी राहत असाल पण फिटनेसकडे लक्ष देत नसाल तर तुमच्या तब्येतीवर याचा खास परिणाम होणार नाही. (Health Tips) तुम्ही ऑफिस वर्किंग असाल किंवा घरात काम करत असाल तर तब्येतीकडे लक्ष द्यायलाच हवं. फिट, एक्टिव्ह राहण्यासाठी नेहमी जीमला जायलाच हवं असं नाही तुम्ही तुमच्या व्यस्त जीवनशैलीतून वेळात वेळ काढून वॉक करू शकता. (Health Tips) ज्याचे बरेच फायदे मिळतील. रोज दररोज सकाळी किंवा संध्याकाळच्यावेळी चालायला जातात पण इतकं चालूनही त्याचा उपयोग होत नाही. पोट कमीच होत नाही अशी अनेकांची तक्रार असते. वजन कमी करण्यासाठी चालण्याची योग्य पद्धत माहित असायला हवी. (Which Is The Right Way to Walk For Weigh Loss)
इटिंग वेलच्या रिपोर्टनुसार डॉक्टर सांगतात की रोज १० हजार पाऊलं चालायला हवं. कमीत कमी ८ हजार स्टेप्स नक्कीच चाला. रोज दिवसभरात अर्धा तास चालल्यानेही शरीर एक्टिव्ह राहण्यास मदत होते आणि शरीर हेल्दी आणि चांगले राहते. आजारांपासूनही बचाव होतो आणि दिवसभर हलकं वाटतं. रोज सकाळी चालल्याने हार्ट डिसिज, डायजेस्टिव्ह सिस्टीमशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. तुम्ही सकाळच्यावेळी बाहेर पडू शकत नसाल तर संध्याकाळी चालू शकता.
चालल्याने शरीराला कोणकोणते फायदे मिळतात?
लोक फिट राहण्यााठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम योगासनं करतात पण वॉक करणं तुमच्या तब्येतीसाठी उत्तम ठरतं. नियमित चालल्याने बॅड कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका उद्भवत नाही. वॉक केल्याने मेटाबॉलिझ्म मजबूत होतो आणि त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो आणइ तुम्ही हेल्दी राहता.
वॉक केल्याने चांगली झोप येते. वॉक केल्याने हॅप्पी हॉर्मोन्स रिलीज होतात ज्यामुळे स्ट्रेस कमी होतो आणि चांगली झोप येते. रोज पायी चालल्याने शरीराला चांगला ऑक्सिजन मिळतो आणि फुप्फुसं निरोगी राहतात. याशिवाय पोट साफ होण्यासही मदत होते. रोज न चुकता ८ ते १० हजार पाऊलं चाला.
कमीत कमी ३० मिनिटं चालण्याचा प्रयत्न करा. सकाळी रिकाम्यापोटी चालल्याने शरीराला भरपूर फायदे मिळतात पण जर तुम्हाला सकाळी चालायला जमत नसेल तर संध्याकाळी न चुकता चाला. संध्याकाळी जमले नाही तर रात्री चाला. दिवसभरात तुम्हाला जेव्हाही कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही चालू शकता.