Join us  

कडक डाएट - व्यायाम न करताही वजन कमी करता येतं; फिट राहणयासाठी ७ नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 9:30 AM

व्यायाम आणि डाएटिंग न करताही वजन कमी करता ( loose weight without diet and exercise) येतं का? या प्रश्नाचं उत्तर हो आहे. पण म्हणजे काहीही न करता वजन कमी करता येतं किंवा नियंत्रित ठेवता येतं असा त्याचा अर्थ नाही. वैज्ञानिक दृष्ट्या निरोगी जीवनशैलीचं (healthy lifestyle for loose weight) पालन करुन वजन कमी करता येतं. निरोगी जीवनशैलीचे 8 नियम वजन कमी करण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

ठळक मुद्देवजन कमी करण्यासाठी आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी पाण्याची भूमिका महत्वाची असते.झोप पूर्ण न होणं हे वजन वाढण्यामागचं कारण आहे.जास्त ताण घेण्याचा परिणाम झोपेवर होतो.

वजन कमी करायचं असेल किंवा वजन नियंत्रित ठेवायचं असेल तर व्यायामाला आणि आहाराचे नियम पाळण्याला पर्याय नाही हा समज नसला तरी हे पूर्ण सत्य नाही. व्यायाम आणि डाएटिंग न करताही वजन कमी ( weight loss without diet and exercise)  करता येतं का? असा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर हो आहे. पण म्हणजे काहीही न करता वजन कमी करता येतं किंवा नियंत्रित ठेवता येतं असा त्याचा अर्थ नाही. वैज्ञानिक दृष्ट्या व्यायाम किंवा विशिष्ट डाएटिंग न करताही निरोगी जीवनशैलीचं ( healthy life style for weight loss) पालन करुन वजन कमी करता येतं.  निरोगी जीवनशैलीचे 8 नियम वजन कमी करण्यास आणि वजन नियंत्रित (rules for weight loss without exercise and diet) ठेवण्यास मदत करतात.

Image: Google

वजन कमी करण्याचे नियम 

1. दिवसभरात पुरेसं पाणी प्यायला हवं. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यानं आरोग्यास विविध लाभ होतात. वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी पाण्याची भूमिका महत्वाची असते. 'नॅशनल सेंटर फाॅर बायोटेक्नाॅलाॅजी इन्फर्मेशन' च्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीरात पुरेसा ओलावा राहातो. भूक नियंत्रणात राहाते. त्यामुळेच पाणी जर पुरेसं प्यायलं तर वजनही नियंत्रणात राहातं.

2. 'नॅशनल सेंटर फाॅर बायोटेक्नाॅलाॅजी इन्फर्मेशन' च्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार वजन कमी करण्यासाठी आहारात प्रथिनांचं प्रमाण जास्त असायला हवं. विशेषत: सकाळी नाश्त्याला प्रथिनंयुक्त पदार्त्ज अवश्य असायला हवेत. आहारात दूध, दही, सोयाबीन, पनीर, डाळी, सुकामेवा, भूईमूग, टोफू, डांगराच्या बिया, हरभरे, फ्लाॅवर, पालक यात प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं. असे प्रथिनंयुक्त पदार्थ रोजच्या आहारात असल्यास वजन कमी करण्यासाठी विशिष्ट डाएटिंगची किंवा व्यायामाची गरज भासत नाही. 

3. दोन्ही वेळेसच्या जेवणात फायबरयुक्त पदार्थ असावेत. जेवणात शेंगवर्गीय भाज्या, डाळी, सॅलेड, हिरव्या भाज्या, सुकामेवा, ज्यूस, स्मूदी हे फायबरयुक्त पदार्थ असावेत. फायबरयुक्त आहारानं चयापचय क्रिया सुधारते, गतीशील होते, पचन व्यवस्था सुधारते आणि यामुळे वजन कमी होण्यास/ नियंत्रित राहाण्यास मदत होते. 

4. जेवताना शांतपणे जेवावं, प्रत्येक घास चावून खावा. अन्न व्यवस्थित चावून खाल्ल्यास ते नीट पचतं आणि ॲसिडिटीसारख्या समस्या निर्माण होत नाही. 

5. वजन कमी करायचं असल्यास सकाळी नाश्ता करणं अजिबात चुकवू नये. सकाळच्या नाश्त्यामुळे चयापचयाच्या क्रियेला गती मिळते. 

Image: Google

6. झोप पूर्ण न होणं हे वजन वाढण्यामागचं कारण आहे. नॅशनल सेंटर फाॅर बायोटेक्नाॅलाॅजी इन्फर्मेशन' च्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार आपण किती तास झोपतो याचा परिणाम वजनावर होतो. झोप जर अपूरी होत असेल आणि हे जर दीर्घकाळ होत असेल तर त्याचा परिणाम म्हणून वजन वाढतं. रोज 7 ते 8 तासांची शांत झोप  निरोगी आरोग्य आणि नियंत्रित वजनासाठी आवश्यक असते. 

Image: Google

7. अति ताण घेण्याचा परिणाम म्हणूनही वजन वाढतं. जास्त ताण घेण्याचा परिणाम झोपेवर होतो. अनिद्रेची समस्या उद्भवते. ताणामुळे इमोशनल इटींंग वाढतं आणि त्याचा परिणाम वजन वाढण्यावर होतो. ध्यान धारणा करुन, योग करुन ताण कमी करता येतो. 

8. शीत पेयं, सोडायुक्त पेयं पिणं टाळावं. या पेयांमध्ये साखरेच प्रमाण जास्त असतं. याचा परिणाम शरीरातील फॅट्स वाढतात. शीत पेयं, सोडायुक्त पेयं पिण्याचा पर्याय टाळून नारळ पाणी पिण्याचा, साखर न घालता फळांचं ज्यूस पिण्याचा पर्याय योग्य ठरतो. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआहार योजनाहेल्थ टिप्स