सध्याच्या काळात आजारांपासून बचावासाठी आणि दीर्घकाळ फिट राहण्यासाठी व्यायामाशिवाय पर्याय नाही. विज्ञानानुसार दिवसातून ३० मिनिटांचा वर्कआऊट करणं प्रत्येकासाठी फायद्याचं ठरतं. खूप कमी लोक असे आहेत जे रूटीन फॉलो करतात. बाकींना वजन वाढल्यानं वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. २४ तासांपैकी कमीत कमी १ तास तरी आपण स्वतःला द्यायला हवा.
जे रोज व्यायाम करतात किंवा कधीतरी मूडनुसार करतात त्यांच्या मनात वर्कआऊट रूटीनबाबत अनेक प्रश्न असतात. जसं की रनिंग करण्याआधी काही खायला हवं की नाही? जर खाल्लं तर काय खायला हवं. याबाबत एक्सपर्ट्सनी माहिती दिली आहे.
धावण्याआधी काही खाऊ शकतो का?
अलीकडेच, मुंबईतील डॉक्टर सलील पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात ते धावपटूंच्या मनात चाललेल्या काही प्रश्नांची उत्तरे देताना दिसले. या व्हिडिओमध्ये डॉ सांगत होते की अनेक लोकांना प्रश्न पडतो की धावण्यापूर्वी काहीतरी खाणं योग्य ठरतं की नाही? डॉक्टारांनी सांगितले की जर तुम्ही 30 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर चालणार असाल तर तुम्ही हलका नाश्ता करू शकता, ज्यामुळे ऊर्जा मिळते. त्याच वेळी, 5 किंवा 10 किलोमीटर सारख्या कमी अंतरावर धावताना, आपण ते रिकाम्या पोटी करू शकता.
धावण्याआधी काय खायचं?
तज्ञांच्या मते, जर तुम्हाला रिकाम्या पोटी लांब पल्ल्याची धावपळ करणं त्रासदायक वाटत असेल तर तुम्ही काही आहार घेऊ शकता. आहाराचा अर्थ असा नाही की आपण जास्त खायचं. ३० किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त धावण्यापूर्वी, आपण सफरचंद, केळी, ब्रेड, टोस्ट सारख्या गोष्टींचा आहारात समावेश करू शकता. तसंच, धावताना पाण्याचे सेवन करा जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही.
धावताना या गोष्टींची काळजी घ्या
१) खूप लोक धावताना आधीच वेगानं धावायला सुरूवात करतात हे अजिबात योग्य नाही.
२) धावण्याआधी व्यवस्थित वार्मअप एक्सरसाईज करायला हव्यात.
३) धावताना रनिंग शूजचा वापर करा, चप्पलचा वापर करू नका. अन्यथा गुडघ्यावर जास्त भार आल्यानं वेदना होऊ शकतात.
४) धावताना पाय किंवा टाचा जमिनीवर घासू नका. त्यामुळे गुडघ्यात वेदना होऊ शकतात.
५) धावल्यानंतर पायांची स्ट्रेचिंग करा.