Join us  

१ रुपयाही खर्च न करता सुटलेलं पोट कमी करायचं? वाचा विराट कोहलीच्या न्यूट्रिशनिस्टने दिलेला सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2024 1:19 PM

Ryan Fernando's Quick and Easy Tips for Weight Loss : सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टचा खर्च भरपूर, पण 'या' प्रसिद्ध पोषणतज्ज्ञांनी वेट लॉसचचे ४ सोपे मार्ग शेअर केले..

लठ्ठपणा ही आजच्या काळात जागतिक समस्या बनली आहे (Weight Loss). वजन वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात. वजन कमी करण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो. जिम, योग, डाएट यासह वेट लॉस करण्याचे अनेक औषधं बाजारात उपलब्ध आहेत (Fitness). पण हवा तसा रिझल्ट आपल्याला लवकर दिसून येत नाही. बरेच सेलिब्रिटी कायम फिट असतात. ते पोषणतज्ज्ञांनी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करतात.

पण सेलिब्रिटी डायटिशियनचा (Celebrity Dietician) खर्च हा खूप जास्त असतो. जर आपल्याला सेलिब्रिटींप्रमाणे कायम फिट राहायचं असेल तर, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रयान फर्नांडो यांनी शेअर केलेल्या काही वेट लॉस टिप्स फॉलो करा. त्यांनी काही दिवसांपूर्वी यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये त्यांनी एक रुपये न खर्च करताही वजन भरभर कसे कमी करावे याची माहिती दिली आहे(Ryan Fernando's Quick and Easy Tips for Weight Loss).

एक रुपये न खर्च करता वजन कसे कमी करावे?

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रयान फर्नांडो आपल्या सोशल मिडीयावर कायम सक्रीय असतात. त्यात ते वेट लॉसबाबत अनेक गोष्टी शेअर करतात. ते अनेक दिग्गजांचे सेलिब्रिटी डायटिशियन आहेत. त्यांनी आतापर्यंत क्रिकेटर विराट कोहली ते अभिनेता शाहीद कपूर यासह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींना आपला डाएट शेअर केला आहे. त्यांनी नुकतंच आपल्या यूट्यूबवर वेट लॉससंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी पैसे खर्च न करता वेट लॉस कसं करायचं याची माहिती दिली.

कमीतकमी वेळात जास्त वजन कसे घटवाल? ५ सोपे हेल्दी बदल - आठवडाभरात दिसेल फरक-स्किनही चमकेल

- न्यूट्रिशनिस्ट रयान सांगतात, ब्रेकफास्टचा आपला टाईम थोडा पुढे करून त्या वेळेत जास्तीचा व्यायाम करा.

- ब्रेकफास्टमध्ये काही खाण्याऐवजी ग्रीन टी किंवा कोणतीही वेट लॉस ड्रिंक प्या. जे फॅट बर्न आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत करतील.

किती आणि कधी पाणी प्यायल्याने पोटावरची चरबी कमी होते? तज्ज्ञ सांगतात, पोट थुलथुलीत असेल तर..

- लंचमध्ये पौष्टीक आहार खा. चपाती आणि भाताचे पोर्शन कमी  करा, त्याऐवजी डाळ आणि भाजी जास्त प्रमाणात खा. आपल्या आहारात अधिक प्रोटीनचा समावेश करा.

- डिनर नेहमी सूर्यास्तापूर्वी करावे. सूर्यास्तानंतर काहीही खाऊ नये. जर आपल्याला भूक जास्त लागली असेल तर, लिक्विड गोष्टी पिण्याचा प्रयत्न करा. शिवाय आपण कॅमोमाइल किंवा पेपरमिंट चहा देखील पिऊ शकता. मुख्य म्हणजे जेवल्यानंतर लगेच शतपावली करा. 

टॅग्स :विराट कोहलीशाहिद कपूरवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स