Lokmat Sakhi >Fitness > सद्गुरु सांगतात, आजारच होऊ नयेत असं वाटत असेल तर रोज २ गोष्टी करा! शरीर कायमच राहील तंदुरुस्त

सद्गुरु सांगतात, आजारच होऊ नयेत असं वाटत असेल तर रोज २ गोष्टी करा! शरीर कायमच राहील तंदुरुस्त

Sadguru Jaggi Vasudev Health Tips : चालण्यामुळे व्यक्तीचे ९० टक्के शरीर निरोगी राहू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 01:08 PM2024-10-10T13:08:07+5:302024-10-10T15:08:44+5:30

Sadguru Jaggi Vasudev Health Tips : चालण्यामुळे व्यक्तीचे ९० टक्के शरीर निरोगी राहू शकते.

Sadguru Jaggi Vasudev Health Tips : Health Sadguru Says Prevent 90 Percent Disease With These Two Things | सद्गुरु सांगतात, आजारच होऊ नयेत असं वाटत असेल तर रोज २ गोष्टी करा! शरीर कायमच राहील तंदुरुस्त

सद्गुरु सांगतात, आजारच होऊ नयेत असं वाटत असेल तर रोज २ गोष्टी करा! शरीर कायमच राहील तंदुरुस्त

प्रत्येकालाच निरोगी आयुष्य हवं असतं. पण सध्याच्या स्थितीत प्रत्येकासाठीच अशक्य वाटतं. आध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासूदेव सांगतात की तुम्हाला हेल्दी लाईफ हवं असेल तर  काही गोष्टी अगदी शिस्तीत करायल्या हव्या, जीवनशैली बदलायला हवी. यासाठी आपल्याला फक्त २ गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. (Health Sadguru Says Prevent 90 Percent Disease With These Two Things)

सद्गुरूंनी सांगितले की तुम्ही शरीराला पूर्णपणे काम करू द्याल तर शरीर निरोगी राहील. पूर्वी लोक किती चालत, २०-२५ किलोमीटर सहज चालत. आज वाहनं नसती तर लोक तसे चालत आले असते. शरीर चालतं राहिलं पाहिजे. चालण्यामुळे माणसाचे आरोग्य उत्तम राहते.

शरीरात रक्तच नाही? आचार्य बाळकृष्ण सांगतात आयर्नचं टॉनिक असलेला १ पदार्थ खा, रक्त वाढेल

सद्गुरू सांगतात की आज जास्तीत जास्त लोक बसून काम करतात ज्यामुळे आपल्या शरीराचा पुरेपूर वापर होत नाही.  सद्गुरू सांगतात तुम्ही जिथे बसला आहात तिथून हात उचला आणि हाताची मूठ बांधून खोला. हाताची मूठ वारंवार उघडून बंद केल्यानं  संपूर्ण दिवसात तुम्ही १००० वेळा करू शकता.  हा उपाय केल्यानंतर ३० दिवसांत तुम्हाला एनर्जेटीक वाटेल.

३ दिवसांत डार्क सर्कल्स घालेवल 'हा' खास उपाय; दसऱ्याला चेहऱ्यावर येईल तेज-सुंदर दिसाल

सदगुरू सांगतात की मला एकदा एका कार्यक्रमाला जायचे होते. मी त्या ठिकाणी शिक्षक होतो आणि मला स्वयंपाकघर सांभाळायचं होतं. मला स्वंयपाक घर सांभाळण्यासाठी  बिल्डींगमध्ये वर-खाली जावं लागायचं. त्या दरम्यान मी शिड्या चढायचो. तेव्हा मला खूप एनर्जी यायची.

आधी लोक ६० वर्षांचे असताना जे काम करायचे ते आता २० वर्षीय व्यक्ती पण करू शकत नाही. सद्गुरू सांगतात की तुम्ही शरीराचा पुरेपूर वापर केला तर  आजार दूर होतील.  आजार हेल्दी खाण्यापिण्यानं नियंत्रणात ठेवता येतील.

Web Title: Sadguru Jaggi Vasudev Health Tips : Health Sadguru Says Prevent 90 Percent Disease With These Two Things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.